Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवी मुंबईत शिवसेनेला धक्का

दिघा विभागातील माजी नगरसेवकांचा भाजपत प्रवेश नवी मुंबई : बातमीदार दिघा विभागातील दिग्गज माजी नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते, दीपा गवते आणि गवते परिवाराने त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह स्वगृही म्हणजेच भारतीय जनता पक्षामध्ये मंगळवारी (दि. 19) प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. माजी प्रभाग समिती सदस्य दामोदर कोटीयन, माजी …

Read More »

बुडत्याचा पाय खोलात

एकंदर राजकारणाच्या पटलावर नजर टाकली की शिवसेनेचे अध:पतन ठळकपणे दिसून येते. अर्थात, येथे शिवसेना या शब्दाचा अर्थ उद्धव ठाकरे समर्थकांचा गट असा घ्यायचा. पक्ष प्रमुखपदी ठाकरे यांचे नाव अजुनही कायम असले तरी पक्षनेतृत्वाचा अक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच निर्देश करताना दिसतो. शिवसेना नेमकी कुणाची या प्रश्नाचे उत्तर बुधवारी सर्वोच्च न्यायालयातील …

Read More »

धोकादायक दरडींवर उपाययोजना आवश्यक

वरंध भोर आणि महाबळेश्वर या दोन्ही घाट मार्गात सातत्याने दरडी कोसळत असल्याने या दोन्ही घाटातील वाहतूक मंदावली आहे. त्यातच प्रशासनाने अवजड वाहतूक बंद केली आहे. भितीपोटी लहान वाहनचालकांनी या घाटाकडे पाठ फिरवली आहे. महाडकरांच्या यातना काही संपता संपत नाहीत तर यामुळे या मार्गावरील पावसाळी पर्यटनालादेखील फटका बसला आहे. मात्र पर्यटकांनाही …

Read More »

प्लास्टिक कचर्‍याने गुरांचे आरोग्य धोक्यात

पाली : प्रतिनिधी सुधागड पालीतील मोकाट गुरे सध्या आपले खाद्य कचरा कुंड्या व डम्पिंग ग्राउंडवर शोधत आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय स्वच्छतेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. पालीतील जुने पोलीस स्थानक, कुंभारआळी, बाजारपेठ, मधलीआळी, बल्लाळेश्वर मंदिर, महाकाली मंदिर परिसर, मिनिडोअर स्टॅन्ड, भोईआळी, आगर आळी या ठिकाणी कचरा कुंड्यांवर …

Read More »

सार्वजनिक बांधकाम खात्याचा दिलासा

मुरूडच्या विहूर पुलावरील खड्डे बुजविले मुरूड : प्रतिनिधी संततधार पावसामुळे तालुक्यातील विहूर येथील छोट्या पुलावर आणि जोड रस्त्यांवर खड्डे पडले होते. या खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्या बाबतचे वृत्त प्रसिध्द होताच सार्वजनिक बांधकाम खात्यास खडबडून जाग आली. खडी व रेंजगा टाकून येथील मोठमोठे खड्डे बुजविण्यात आले आहेत. …

Read More »

पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा शेतीकामात व्यस्त

कर्जत : बातमीदार गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने काहीशी उघडीप घेतली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यात भात शेतीच्या कामांना गती आली आहे. शेतकरी लावणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. कर्जत तालुक्यात सुमारे 9800 हेक्टर जमिनीवर भात शेती केली जाते. कर्जत तालुक्यातील शेतकरी मागील काही वर्षात प्रयोगशील शेती करू लागले असून भाताचे …

Read More »

ताम्हाणी घाटात दरडीचा दगड एसटी बसवर कोसळला

माणगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गोरेगाव-माजलगाव एसटी बसवर ताम्हाणी घाटात कोंडेथर गावाच्या हद्दीत दरडीचा मोठा दगड पडल्याची घटना सोमवारी (दि. 18) सकाळी घडली. या दगडाचे तुकडे चालकाच्या समोरील काचेवर व उजव्या बाजूकडील प्रवासी काचेवर पडून नुकसान झाले. या बसमधून चालक-वाहक आणि 33 प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने यापैकी …

Read More »

राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी भरघोस मतदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे सर्वोच्चपद अर्थात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 18) मतदान प्रक्रिया झाली. या निवडणुकीसाठी देशभरातील आमदार-खासदारांनी मतदान केल्याने भरघोस मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीची मतमोजणी 21 जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलैला शपथ घेतील. या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय …

Read More »

पोलादपूर शहरामध्ये टँकरने दूषित पाणीपुरवठा

नगरपंचायतीच्या विरोधी गटनेत्याकडून आंदोलनाचा इशारा पोलादपूर : प्रतिनिधी नगरपंचायत पोलादपूरकडून गेल्या काही दिवसांपासून शहरातील जयहनुमाननगर भागात टँकरद्वारे गढूळ तसेच अस्वच्छ पाणीपुरवठा होत असून, या पाण्याला उग्र वास येत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. दरम्यान, नगरपंचायतीचे विरोधी गटनेते दिलीप भागवत यांनी शुध्द पाणी मिळेपर्यंत जयहनुमाननगरच्या ग्रामस्थांसोबत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. …

Read More »

शिवसेना खासदारांमध्येही उभी फूट

12 जणांची शिंदे गटाच्या बैठकीला उपस्थिती मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. शिवसेनेचे अनेक आमदार, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्तेदेखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यानंतर आता शिवसेनेच्या खासदारांमध्ये फूट पडली असून 12 खासदार सोमवारी (दि. 18) मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलाविलेल्या बैठकीला उपस्थित होते. …

Read More »