Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवी मुंबईत रक्तदान, हृदय तपासणी शिबिर

भाजपच्या उपक्रमाला प्रतिसाद नवी मुंबई ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र 34च्या विद्यमाने गणेश नाईक ब्लड डोनेशन चैन यांच्या वतीने रक्तदान शिबिर आणि 55 वर्षांच्या वरील व्यक्तींसाठी मोफत हृदय तपासणी शिबिराचे आयोजन नेरूळ एल मार्केट सेक्टर 8मधील भाजप कार्यालय येथे अ‍ॅड. गणेश रसाळ यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. या …

Read More »

राज्य सरकारी कर्मचारी आक्रमक

मागण्या मान्य न झाल्यास 2 मेपासून काम बंद आंदोलन उरण : प्रतिनिधी राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य न झाल्यास 2 मेपासून महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत. या लढ्यासाठी सज्ज रहा, असे महाराष्ट्र राज्य नगरपंचायत, नगर परिषद व संवर्ग कर्मचारी समितीचे मुख्य संघटक संतोष पवार यांनी …

Read More »

पोलखोल तर होणारच

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्या आजवरच्या कारभाराची चिरफाड होणार या विचाराने सत्ताधारी भ्रष्टाचार्‍यांच्या गोटात अस्वस्थता पसरणे स्वाभाविकच होते. त्यामुळेच भाजपच्या पोलखोल मोहिमेतील रथाची काही अज्ञातांनी सोमवारी मध्यरात्री तोडफोड केली. भाजपची ही रथयात्रा मंगळवारी मुंबईतील चेंबूर कॅम्प येथील भाजप कार्यालयातून सुरू व्हावयाची होती. अर्थात, भाजप अशा भ्याड हल्ल्यांनी मागे हटणार …

Read More »

नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर फ्लेमिंगो करताहेत स्वागत

ऐरोली-मुलुंड मार्गावर साकारल्या प्रतिकृती   नवी मुंबई ः प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियान 2022 अंतर्गत नवी मुंबई पालिकेच्या वतीने ठिकठिकाणी रंगरगोटी, विद्युत रोषणाई, विविध प्रकारची शिल्प, संतवचने यांनी नवी मुंबईचे रुपडे पालटले आहे. यातच नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या ऐरोली-मुलुंड मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनालगत पालिकेच्या स्थापत्य विभागाने उभारलेल्या सुमारे 15 …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रोपण करण्याच्या हेतूने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त)च्या एनसीसी विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. 14) महाविद्यालयाच्या संकुलात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी पनवेल रोटरी क्लबचे सदस्य राजीव राघवन यांची …

Read More »

पनवेल महापालिका उपायुक्तपदी कल्पिता पिंपळे

पनवेल : रामप्रहर वृत्त ठाण्याच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता किशोर पिंपळे यांची पनवेल महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली असून, मंगळवारी (दि. 19) आयुक्त गणेश देशमुख यांनी त्यांचे महापालिकेत स्वागत केले. या वेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार आदी उपस्थित होते. कल्पिता किशोर पिंपळे …

Read More »

पेण वाशी विभागात गढूळ पाणी

ग्रामीण जलपुरवठा विभागाचे ढिसाळ नियोजन; नागरिक संतप्त पेण ः प्रतिनिधी तालुक्यातील खारेपाट भागामध्ये सध्या यात्रांचा हंगाम जोरात सुरू झाला आहे, मात्र भाविकांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गढूळ पाणी प्यावे लागल्याने संतापाची लाट पसरली. मागील अनेक वर्षांपासून खारेपाट विभागातील वाशी, वढाव, भाल, काळेश्री, विठ्ठल वाडी, बोर्झे, लाखोले, बहिराम कोटक, तामसीबंदर, तुकाराम वाडी, …

Read More »

खोपोली भाजपतर्फे सामाजिक न्याय पंधरवड्यानिमित्त उपक्रम

खोपोली ः प्रतिनिधी केंद्र शासन, पंतप्रधान नरेंद्र मोदी व बालकल्याण विभाग यांच्यातर्फे भारतात कुपोषित बालकांची संख्या कमी होण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून केंद्र शासन प्रयत्नशील आहे. त्यातील प्रमुख अंगणवाडीतील बालकांना पोषणमूल्य आहार देण्यासंदर्भात हा कार्यक्रम रायगड जिल्ह्यात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांच्या आदेशानुसार महिला मोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी …

Read More »

कर्जतमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

10 आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी कर्जत ः बातमीदार तालुक्यातील गौरकामत गावातील एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना सोमवारी (दि. 18) समोर आली. काही तरुणांनी इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर या शाळकरी मुलीची फसवणूक करून बलात्कार केला असून या प्रकरणी कर्जत पोलिसांनी 20 ते 30 वयोगटातील 10 तरुणांना ताब्यात घेतले. या …

Read More »

चिंध्रण सरपंच कमला देशेकर यांच्या प्रयत्नातून लोहार समाजाला निधीवाटप

कळंबोली ः प्रतिनिधी चिंध्रण सरपंच कमला देशेकर यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायतीच्या 2022-23 या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाच्या 15 टक्के निधीतून एनटीबी विश्वकर्मा लोहार समाजाला भांड्यांच्या स्वरूपात वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे अपंगांना पाच टक्के निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य व ओबीसी …

Read More »