अलिबाग : प्रतिनिधी अंगारकी चतुर्थीचा योग साधत अलिबाग एसटी आगारातील सुमारे 200 कर्मचारी मंगळवारी (दि. 19) कामावर हजर झाले. सेवासमाप्ती झालेल्या 14 जणांनीदेखील पुन्हा सेवेत घेण्यासाठी अर्ज दिले आहेत. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता ठरल्याप्रमाणे एसटी कर्मचारी अलिबाग स्थानकात एकत्र जमले. जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर सारेजण आगारातील गणपती मंदिरात पोहोचले. तेथे …
Read More »मांडवा जेटी रस्त्यालगत आग; संभाव्य मोठी हानी टळली
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील मांडवा जेटीजवळील रिलायन्स कंपनीच्या गॅस स्टेशननजीक सोमवारी (दि. 18) लागलेली आग त्वरित विझविण्यात थळ येथील आरसीएफ कंपनीच्या अग्निशमन दल जवानांना यश आल्याने संभाव्य मोठी हानी टाळता आली. सोमवार दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मांडवा जेटी रस्त्यालगत रिलायन्स कंपनीच्या गॅस स्टेशन जवळ मोठी आग लागल्याची सूचना आरसीएफ थळच्या …
Read More »मुंबई-गोवा चौपदरी महामार्गाला ’स्वराज्य’ राष्ट्रीय महामार्ग नाव द्यावे
भाजप सरचिटणीस महेश शिंदे यांची मागणी महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून, या महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ’स्वराज्य’ राष्ट्रीय महामार्ग असे नामांतर करावे, अशी मागणी भाजपचे महाड तालुका सरचिटणीस महेश शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली आहे. कामाच्या …
Read More »अदानी प्रकल्पाला शेतकर्यांचा विरोध
जनसुनावणीत शेतकरी आक्रमक अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील शहाबाज-शहापूर येथे येऊ घातलेल्या अदानी प्रकल्पाची जनसुनावणी सोमवारी (दि. 18) प्रचंड गदारोळामध्ये पार पडली. या सुनावणीत शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकर्यांनी या सुनावणीमध्ये अदानी प्रकल्पाला आपला तीव्र विरोध दर्शविला. अदानी प्रकल्पाची जनसुनावणी ही पांडवादेवी येथील जयमंगल सभागृहात घेण्यात आली. जनसुनावणीसाठी अध्यक्ष म्हणून …
Read More »अलिबागच्या पांढर्या कांद्याची निर्यात नाही
अलिबाग : प्रतिनिधी भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्यामुळे अलिबागच्या पांढर्या कांद्याच्या निर्यातीसाठी प्रयत्न सुरु झाले होते. मात्र यावर्षी उत्पादन कमी असल्याने अलिबागच्या पांढर्या कांद्याची निर्यात होऊ शकली नाही. रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते मात्र रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळता फारशी पिकं घेतली जात नाहीत. रायगड …
Read More »कोमसाप तळा शाखेचा वर्धापनदिन उत्साहात
माणगाव : प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप)तळा शाखेचा सातवा वर्धापनदिन सोमवारी (दि. 18) इंदापूर येथील एस. एस. निकम इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मान्यवर कविंनी आपल्या कविता सादर केल्या.. कोमसापचे तळा शाखा अध्यक्ष हेमंत बारटक्के यांनी प्रास्ताविकात मागील सात वर्षात राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. आणि कवी …
Read More »खालापूर शहरातील मुख्य रस्त्याची दुरावस्था
खोपोली : प्रतिनिधी शहरातील मुख्य रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे पायी चालणेदेखील अवघड बनले असून, या प्रश्नावर सर्व राजकीय पक्ष मूग गिळून असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी सुस्त झाले आहेत. खालापूर शहरातून जाणारा मुख्य रस्ता जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि वणवे-निंबोडे मार्गे सावरोली-खारपाडा राज्यमार्गाला जोडला गेला आहे. खालापूर शिरवलीवाडी ते वणवे गाव या …
Read More »कालव्याला पाणी सोडा, अन्यथा आंदोलन अमित घाग यांचा इशारा
रोहा पाटबंधारे विभागाच्या कारभाराविरोधात भाजप आक्रमक धाटाव : प्रतिनिधी कोलाड ते भुवनेश्वर आणि कोलाड ते पडम या डाव्या, उजव्या कालव्यांना त्वरीत पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने रोहा पाटबंधारे विभागाकडे सोमवारी (दि. 18) निवेदनाद्वारे करण्यात आली. शेती आणि पिण्यासाठी या दोन्ही कालव्यांना तातडीने पाणी सोडले नाही तर …
Read More »पुस्तक प्रकाशन, ग्रंथव्यवहार आणि तंत्रज्ञान
एक काळ होता की जेव्हा लेखकाचं पुस्तक छापलं जाणं हा परदेशगमनाच्या योगापेक्षाही अवघड योग होता. कितीही उत्तम लिखाण असो लेखकाला ’नाव’ नसेल तर प्रकाशक त्याला उभा करीत नसत. पुस्तक प्रकाशित करणे आणि वाचकांपर्यंत पोहचवणे ही त्या काळी प्रकाशकाची शंभर टक्के मक्तेदारी होती. एखादा नवोदित लेखक हस्तलिखित दाखवायला आला की प्रकाशक …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रसायनीत मिरवणूक
मोहोपाडा ः प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रसायनी परिसरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष आशिष जाधव यांनी रविवारी (दि. 16) मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीत विविध सामाजिक संघटनांसह मोठ्या संख्येने भीमसैनिक सहभागी झाले होते. सेबी रोड येथून मिरवणुकीची सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper