आठवण मी शिवाजीराजे भोसले बोलतोयची महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने महेश मांजरेकर यांनी पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाची घोषणा ही गोष्ट आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल मिडियातून सर्वदूर पोहचली आहेच. महाराष्ट्र फक्त महाराजांनाच ऐकतो, म्हणूनच पुन्हा शिवरायांची महाराष्ट्राला गरज आहे, असे सांगत महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचा सामाजिक आणि भावनिक गाभा स्पष्ट केला. …
Read More »माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे मान्यवरांसह कार्यकर्त्यांकडून अभीष्टचिंतन
वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांची रेलचेल पनवेल ः रामप्रहर वृत्तसामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहरात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तसेच वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देत त्यांचे अभीष्टचिंतन केले.समाजसेवेच्या ध्येयाने …
Read More »शूर सैनिकांच्या गौरवार्थ पनवेलमध्ये भव्य तिरंगा यात्रा
’ऑपरेशन सिंदूर’मुळे प्रत्येक भारतीयाचे मस्तक अभिमानाने उंचावले- आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्तजम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांना उद्ध्वस्त करून समाचार घेतला. त्या अनुषंगाने ऑपरेशन सिंदूर या लष्करी मोहिमेतील भारतीय सशस्त्र दलाच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करण्यासाठी आणि पंतप्रधान …
Read More »पनवेलमध्ये आंबा महोत्सवाला सुरुवात : सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमासह कोकणमेव्याची पर्वणी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल शहरात प्रथमच तीन दिवस ‘आंबा महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून, या महोत्सवाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे. लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पक्ष पनवेल शहरच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील डॉ. पटवर्धन हॉस्पिटल समोरील गुजराती शाळेच्या मैदानावर सुरू झालेल्या या महोत्सवाचे …
Read More »जांभिवली आणि भोकरपाडा येथील शेकाप, ठाकरे गटातील कार्यकर्ते भाजपत
पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. पक्षाच्या समक्ष नेतृत्वावर विश्वास ठेऊन उरण मतदार संघातील जांभिवली आणि भोकरपाडा येथील शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रमुख पदाधिकारी तसेच विद्यमान ग्रामपंचाय सदस्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.सर्व प्रवेश कर्त्यांचे उरणचे आमदार महेश बालदी …
Read More »विकासकामांचा प्रवाह अविरतपणे सुरू राहील -आमदार प्रशांत ठाकूर
खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमधील विविध गृहसंकुलांमधील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या वेळी त्यांनी विकासकामांचा प्रवाह अविरतपणे सुरू राहील, अशी ग्वाही दिली. पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत …
Read More »परेश ठाकूर यांच्याकडून सामाजिक कार्यासह क्रीडा क्षेत्राची उंची वाढविण्याचे काम
भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे गौरवोद्गार; पनवेल फुटबॉल लीगचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्तयुवा नेते परेश ठाकूर यांचे समाजातील प्रत्येक घटकाबरोबर चांगले नाते असून युवा शक्ती त्यांच्या पाठिशी आहे. सामाजिक कार्यासह क्रीडा क्षेत्राची उंची वाढविण्याचे काम परेश ठाकूर यांनी केले असल्याचे गौरवोद्गार भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष व …
Read More »पनवेल तालुक्यातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करणार
आमदार प्रशांत ठाकूर यांचा अधिकार्यांना इशारा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 15) पनवेल पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि पंचायत समितीच्या अधिकार्यांसोबत तातडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आमदार ठाकूर यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने …
Read More »संदीप पाटील यांचा सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तसंदीप पाटील सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असतात त्यामुळे ते वयाच्या पन्नाशीनंतरही आणखी जोमाने आणि उमेदीने कार्यरत राहतील, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल येथे केले. ते माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महिलांसाठी कबड्डी स्पर्धेवेळी बोलत होते.या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचादहावी सीबीएसई परीक्षेत 100 टक्के निकाल
पनवेल : रामप्रहर वृत्तसीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेला इयत्ता दहावीच्या परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा निकाल पहिल्याच वर्षी 100 टक्के लागला आहे. या यशाबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले.विद्यालयातून 37 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper