Breaking News

महत्वाच्या बातम्या

मुरूडमधील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी 14 उमेदवारी अर्ज दाखल

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीमधील सदस्य पदांच्या 21 रिक्त जागांसाठी 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, राजपुरी, सावली, चोरढे या ग्रामपंचायतीमधील पोटनिवडणुकीसाठी एकही उमेदवारी अर्ज न दाखल झाल्याने त्याठिकाणी निवडणूक होणार नाही. मुरूड तालुक्यातील वावडुंगी, सावली, एकदरा, राजपुरी, मजगाव, उसरोली, चोरढे, कोर्लई या आठ ग्रामपंचायतीमधील सदस्य पदांच्या 21 …

Read More »

कर्जत उपजिल्हा रुग्णालय परिसरातील तीन इमारती धोकादायक

कर्जत : बातमीदार येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरातील तीन  इमारतींना शासनाने धोकादायक ठरवले आहे. त्या इमारती रिकाम्याही करण्यात आल्या आहेत. या धोकादायक इमारती जमीनदोस्त कराव्यात, असे आदेश असूनदेखील संबंधीत विभाग कोणत्याही प्रकारची कार्यवाही करीत नाही. दरम्यान, त्या धोकादायक इमारती जमीनदोस्त कराव्यात आणि संभाव्य धोका टाळावा अशी मागणी सम्यक विद्यार्थी संघटनेने केली …

Read More »

अनधिकृत बांधकामाविरोधात तांबडी ग्रामस्थ आक्रमक

खोपोली नगरपलिकेला दिला आत्मदहनाचा इशारा खोपोली : प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील तांबडी या वसाहतीमध्ये नदाफ नावाच्या रहिवाशाने अनधिकृत घराचे बांधकाम सुरू केले आहे. सदरची जागा वहिवाटीची असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी या जागेवरील अनधिकृत बांधकामाला तीव्र विरोध दर्शवित आत्मदहनाचा इशारा दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. खोपोली नगरपालि का हद्दीतील वासरे …

Read More »

अफवांवर विश्वास ठेवू नये -कादबाने

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटी व मोहल्ला कमिटीची बैठक पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे वेगवेगळे नियम जाहीर करण्यात येत आहेत. हे सर्वांना बंधनकारक असून त्याचे पालन सर्वांनी काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियाद्वारे पसरविण्यात येणार्‍या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. अशा प्रकारच्या अफवा पसरविल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, …

Read More »

महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला आदरांजली

उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब …

Read More »

पनवेलमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग आणि विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणार्‍या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत शनिवारी (दि. 4) सकाळी 11 वाजता गरूड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले. प्रत्येक महिन्याच्या दर शनिवारी व …

Read More »

शासनाचे भूखंड आरक्षणावर निर्बंध

पालिकेच्या विकास आराखड्यावर फिरवले पाणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अडीच वर्षांपूर्वी पालिका सभागृहाने मंजूर केलेल्या विकास आराखड्यात टाकण्यात आलेल्या भूखंडावरील आरक्षणाला नगरविकास विभागाने निर्बंध घातले आहेत. तसेच 500 मीटरवरील क्षेत्राफळाचे भूखंड विकण्याची सिडकोला मुभा दिली आहे. त्यामुळे पालिकेने तयार केलेल्या विकास आराखड्यावर शासनाने पाणी फिरवले आहे. पालिकेला भविष्यात लागणार्‍या …

Read More »

पनवेल मनपा हद्दीतील रस्ते नूतनीकरण व दुरूस्तीसाठी मान्यता

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील रस्ते नूतनीकरण व दुरूस्तीच्या कामासाठी प्रशासकीय खर्चास सोमवारी (दि. 6) रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता पनवेलमधील रस्ते चांगले होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचबरोबर प्रभाग ’क’मधील लेंडाळे तलावही आता सुशोभीत होणार आहे. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक आद्य क्रांतिवीर …

Read More »

उरण विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे

पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील तुरमाळे, बारवई, सांगुर्ली या ठिकाणी रस्ते काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन, लाडीवली येथे पाण्याच्या पाईपलाईनचे लोकार्पण आणि करंजाडे येथे शौचालयाच्या कामाचे भूमिपूजन रविवारी (दि. 5) आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत व इतरांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार बालदी यांनी छळ आणि …

Read More »

पनवेलमध्ये ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल

पनवेल ः रामप्रहर वृत्त ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून पनवेल तालुक्यातील रिक्त झालेल्या जागांसाठीही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार येत्या 21 डिसेंबरला मतदान व 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यासाठी जांभिवली, खानाव आणि कसळखंड या तीन ग्रामपंचायतींमधील भाजपच्या उमेदवारांनी पक्षाचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. …

Read More »