भाजपतर्फे सिडकोकडे पाठपुरावा खारघर : रामप्रहर वृत्त खारघर परिसरात अनेक ठिकाणी गटारे खुली आहेत. तर काहींची झाकणे गायब झाल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. खुल्या गटारात पडून एखादा अपघात होऊ शकतो. सिडकोने याची दखल घेऊन गटारांवर सर्व झाकणे बसवावीत, अशी मागणी भाजपकडून होत आहे. यासंदर्भात भाजप युवा मोर्चा खारघर अध्यक्ष …
Read More »…अन्यथा सिडकोच्या कार्यालयाला टाळे ठोकू -अॅड. मनोज भुजबळ
नवीन पनवेलमधील समस्यांसंदर्भात भाजप आक्रमक पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील तक्रारीकडे दुर्लक्ष करणार्या सिडको अधिकार्यांना समज देण्यासाठी 6 डिसेंबर 2021 रोजी नवीन पनवेल सिडको कार्यालयावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेण्यात येणार आहे. लवकरात लवकर कार्यवाही करा अन्यथा सिडकोेच्या कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष …
Read More »तळोजातील दीपक नायट्राईट वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित
लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना काळामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल तळोजा येथील भारत सकपाळे व दीपक नायट्राईट लि. तळोजा या कंपनीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली असून त्यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंटने सन्मानित केले आहे. या बद्दल त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »बदलत्या वातावरणाचा मच्छीमारांना फटका
मासळीची आवक घटल्याने नौका किनार्यालाच उरण : प्रतिनिधी महाराष्ट्रात सर्वाधिक मच्छीमारांची संख्या असलेल्या उरण तालुक्यातील मच्छीमारांवर सध्या आर्थिक संकट ओढवले आहे. कोरोना, लॉकडाऊन, चक्रीवादळे, खराब हवामान, अतिवृष्टी यांमुळे आधीच कोलमडलेला मच्छीमारी व्यवसाय आता कुठे उभारी घेत होता. त्यात आता पुन्हा बदलत्या वातावरणामुळे समुद्रात मासळीची आवक घटली आहे. त्यामुळे मच्छीमारांवर पुन्हा …
Read More »…म्हणून ओबीसींचे सर्वेक्षण रखडले; भाजप नेते राम शिंदेंचा राज्य सरकारवर आरोप
अहमदनगर : प्रतिनिधी ’ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधीचा इम्पिरिकल डाटा सादर करण्यास सांगितले होते. हे काम राज्य मागासवर्ग आयोगाचे आहे. त्यासाठी 450 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे, मात्र महाविकास आघाडीने आयोगाला हा निधी दिला नाही. त्यामुळे हे काम रखडले आहे,’ असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री …
Read More »पर्यावरण जनजागृतीसाठी उरण ते गोवा सायकल प्रवास
उरण : प्रतिनिधी प्लास्टिकच्या जास्त वापरामुळे पर्यावरणाचा र्हास होत चालला आहे. त्यामुळे प्लास्टिक वापरण्यात बंदी करावी या मुख्य विषयावर जनजागृती करण्याकरिता उरण ते गोवा असा 650 किलोमीटरचा सायकल प्रवास उरण येथील विवेक घरत आणि रोहा येथील सूरज खांडेकर या दोन तरुणांनी केला आहे. प्रदूषण ही समस्या मोठी गंभीर बनली आहे. …
Read More »मराठी विज्ञान परिषदेतर्फे ऑनलाइन विज्ञान परीक्षा
पनवेल : प्रतिनिधी मराठी विज्ञान परिषदेने ‘वेध 2035’ ही ऑनलाइन शालेय विज्ञान परीक्षा आयोजित केली आहे. सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या परीक्षेसाठी लिखित मजकूर, व्हिडीओ व्याख्याने, प्रयोगांचे व्हिडीओ, विज्ञान-कोडी, कूट-प्रश्न, विज्ञान-खेळ अशी भरपूर अभ्यास-सामग्री पुरवली जाईल. यासाठीची प्रवेश प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ऑनलाइन शालेय विज्ञान परीक्षेचे हे …
Read More »राजपत्रित अधिकारी महासंघाची कोकण भवन समन्वय समिती जाहीर
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कोकण भवन समन्वय समितीच्या अध्यक्षपदी माहिती व जनसंपर्क विभागाचे कोकण विभागीय उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांची निवड झाली आहे. ही घोषणा महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी बुधवारी (दि. 24) येथे केली. महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या …
Read More »अपघातग्रस्त दीपक पाटील यांना आर्थिक मदत; आमदार महेश बालदी यांच्या हस्ते धनादेश
उरण : वार्ताहर नवघर येथील मल्टीमोड लॉजिस्टीक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वेअर हाऊसमध्ये अपघात झाला होता. या अपघातात जखमी झालेल्या दीपक महादेव पाटील यांना भाजपच्या पदाधिकार्यांनी उपचारासाठी संबंधित कंपनीकडून आर्थिक मदत मिळवून दिली आहे. या मदतीचा धनादेश आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पाटील यांना देण्यात आला. काही दिवसापूर्वी नवघर येथील मल्टीमोड …
Read More »लघुपट स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभेच्छा
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वसंपन्न कारकिर्दीवर आधारित ‘कर्मयोगी नमो’या लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या, तसेच या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper