अलिबाग : प्रतिनिधी राष्ट्रीय बालरोग संघटना रायगड शाखेच्या वतीने गुरुवारी (दि. 25) पीएनपी नाट्यगृह अलिबाग येथे सांयकाळी 5 वाजता ‘मुले अशी का वागतात’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यातील नामांकीत डॉक्टर पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. कोविड परिस्थिती, बदलती कुटुंब व्यवस्था, समाज माध्यमांचा भडिमार, टोकाची स्पर्धा आणि पालकांच्या …
Read More »शिक्षणामुळेच आपल्यामध्ये सुधारणा होते -विक्रम देशमुख
कर्जत : प्रतिनिधी प्रत्येकाने आपला मुलगा किंवा मुलगी असेल त्यांना शिकवले पाहिजे. शिक्षणामुळे आपल्यामध्ये सुधारणा होते, असे मार्गदर्शन कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी केले. उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील आशाणे वाडीमध्ये तहसीलदार विक्रम देशमुख यांनी भेट दिली. या वेळी कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, सामाजिक कार्यकर्त्या मोनिका बडेकर, उद्योजक निलेश …
Read More »भाजप दक्षिण भारत सेलची कर्जत मंडल बैठक
कर्जत : रामप्रहर वृत्त भाजपच्या दक्षिण भारत सेलची कर्जत मंडळ बैठक मंगळवारी (दि. 23) उत्साहात झाली. कर्जत येथील संत सेवालाल नगर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी प्रामुख्याने गुलबर्गा, यादीर, वाडी, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातील तंदूर भागातील 100 हून अधिक दक्षिण भारतीय बंजारा कुटुंबे राहात आहेत. या बैठकीला …
Read More »अपहृत मुलाची अवघ्या चार तासांत सुटका
पनवेल : वार्ताहर एका सहा वर्षीय मुलाचे त्याच्याच नात्यातील माणसांनी लग्नाला विरोध केला म्हणून अपहरण केले होते, परंतु खांदेश्वर पोलिसांनी अवघ्या चार तासांत या मुलाला मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन येथून अपहरणकर्त्यांकडून त्याची सुटका केली. तक्रारदार विनय गामा सिंग (वय 39, रा. विचूंबे) यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांची …
Read More »माथेरानला पर्यावरणपूरक वाहतूक सुरू करण्यासाठी सनियंत्रण समिती अनुकूल
कर्जत : बातमीदार माथेरान हे वाहनमुक्त शहर असल्यामुळे प्रदूषण नाही त्यामुळे वेगळा नावलौकिक मिळालेले पर्यटनस्थळ माथेरानमध्ये पर्यावरण पूरक बदल घडत आहेत. येथील पर्यावरण जपत आता ई-रिक्षा वाहतूक सुरू करण्यासाठी सनियंत्रण समिती अनुकूल असून माथेरानचे पर्यावरण हे मुख्य वैशिट्य जपत हा बदल केला जाणार आहे. दुरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीतून हे संकेत …
Read More »रेशन दुकानदारांचा बंद स्थगित
अलिबाग : प्रतिनिधी राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रेशन दुकानदारांच्या मागण्या सोडविण्याचे आश्वसान दिल्यामुळे अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाने 1 डिसंबरपासून पुकारलेला बंद स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. राज्यभरातील …
Read More »खोपोली चिंचवलीत पाच दुकाने फोडली
खोपोली : प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील चिंचवली शेकीन येथे आयटीआय समोरील इमारतीतील चार ते पाच दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. दुकानदारांनी याबाबत तक्रारच दिली नसल्याने, किती माल चोरीस गेला हे समजू शकले नाही. यासंदर्भात पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्याशी संपर्क साधला असता, घटना घडल्याबाबत दुजोरा दिला, मात्र काहीच …
Read More »असंख्य भाविकांनी घेतले बाप्पाचे दर्शन; अंगारक संकष्ट चतुर्थीचा साधला योग; मंदिरांत गर्दी
उरण : वार्ताहर,प्रतिनिधी अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या चिरनेरच्या महागणपतीचरणी नतमस्तक होण्यासाठी नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, पेण व उरण येथील अनेक भक्तांनी मंगळवारी (दि. 23) गर्दी केली होती. निसर्गरम्य डोंगर कुशीत वसलेल्या उरण तालुक्यातील चिरनेर या गावावर निसर्ग देवतेची अविरत कृपा आहे. या गावात असणारे महागणपती …
Read More »भरकटलेल्या कासवाला पालीत तरुणांनी दिले जीवदान
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली तहसील कार्यालयाबाहेर रस्त्यावर रात्री काही तरुणांना एक भरकटलेले कासव दिसले. या तरुणांनी ताबडतोब शिवऋण प्रतिष्ठान या व्हॉट्सअप ग्रुपवर ही माहिती कळवली व कासवाला वाचविण्याचे आवाहन केले. त्यानंतर पालीतील शंतनु लिमये या प्राणीमित्र युवकाने तेथे जाऊन कासवाला ताब्यात घेतले. त्यानंतर या कासवाला सुरक्षितपणे विहिरीमध्ये सोडले, …
Read More »स्थलांतरीत पक्ष्यांनी उरणचे खाडी-किनारे गजबजले
उरण : वार्ताहर थंडीची चाहूल लागताच उरण परिसरातील विस्तीर्ण जलाशये, समुद्री खाड्या तसेच समुद्र खाडी किनार्यावर विविध स्थलांतरीत जलचर पक्षांची गर्दी वाढली आहे. या विविध प्रकारच्या आकर्षक पक्षांमध्ये अग्निपंखी, पेलिकन, करकोचा, सिगल आदी स्थलांतरित पक्षांबरोबरच काही दुर्मीळ पक्षांचाही समावेश आहे. उरण परिसरातील पाणजे, डोंगरी, बेलपाडा, दास्तान फाटा, रांजणपाडा, जसखार, बोकडवीरा-बीपीसीएल, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper