भाजप किसान मोर्चाची मागणी; कर्जत तहसीलदारांना निवेदन कर्जत : रामप्रहर वृत्त कर्जत तालुक्यातील शेतकर्यांचे भात हमीभावाने खरेदी केंद्रावर खरेदी करा, अशी मागणी भाजप किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात कर्जत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शेतकर्यांचे भात हमीभावाने कर्जत तालुक्यातील अनेक केंद्रावर खरेदी केली जाते. परंतु अनेक शेतकर्यांनी तकार …
Read More »कर्जतमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती कर्जत : रामप्रहर वृत्त आर झुनझुंनवाला व लोटस फाऊंडेशन, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शास्त्रक्रिया आणि चष्मे वाटप गुरुवारी (दि. 11) आयोजित करण्यात आले होते. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कर्जत तालुक्यातील किरवली …
Read More »राज्य सरकारकडून एसटी कर्मचार्यांवर जुलमी कारवाई
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा घणाघात मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचार्यांचे राज्यभरात तीव्र आंदोलन सुरू आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचार्यांची संप पुकारला आहे. संप मागे घेण्यासाठी शासनाने निलंबनाच्या कारवाईचा बडगा कर्मचार्यांवर उचलण्यात आला आहे. त्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य …
Read More »संगीत मैफिलीने अलिबागकर मंत्रमुग्ध
अलिबाग ़: प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगड जिल्हा आणि सांस्कृतिक विभाग यांच्यातर्फे आयोजित दीपसंध्या या कार्यक्रमात बुधवारी (दि. 10) सायंकाळी उदयोन्मुख गायक ओमकार प्रभुघाटे आणि कल्याणी शेट्ये यांनी गाणी सादर करून अलिबागकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. अलिबाग येथील भाजप मुख्यालयासमोर या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला अलिबागकर रसिकांनी …
Read More »महाविद्यालय प्रवेश देण्याच्या नावाखाली तीन लाखांची फसवणूक
खोपोली : प्रतिनिधी पॅरामेडीकल कोर्स करीता प्रवेश मिळवून देतो, असे सांगून एका भामट्याने सुमारे तीन लाख 26 हजार 980 रुपये उकळण्याची घटना खालापूर तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून फसवणूक करणारा आरोपी यासिन करीम शेख (रा. उल्हासनगर, जि. ठाणे) याच्या विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला …
Read More »केळवलीजवळ ऑइल टँकर आग; कर्जत-खोपोली रस्त्यावरील दुर्घटना
खोपोली ़: प्रतिनिधी कर्जत-खोपोली रस्त्यावर केळवली गावाजवळ काल रात्री एका ऑइल टँकरला आग लागली. या टँकरमध्ये खोबरेल तेल असल्याने, काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे परिसरात आगीचे लोट उठले होते. अग्निशमन दल व बचाव पथकाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. खोबरेल तेल भरलेला टँकर (एनएल-01,एई-9039) कर्जतकडून …
Read More »एसटीचा संप चौथ्या दिवशीही कायम
रोहे ः प्रतिनिधी एसटी कर्मचार्यांच्या मागण्या रास्त असून, त्याबाबत राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन एसटी कामगार युनियनचे अध्यक्ष शंशाक राव यांनी रोहा येथे केले. एसटी कर्मचार्यांना राज्य सरकारचा कर्मचारी घोषित करावे, वेतन निश्चीती करावी, थकबाकी तातडीने द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचार्यांनी आंदोलन सुरू आहे. एसटीच्या रोहा …
Read More »पेणमध्ये कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर
पेण : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पेण विधी सेवा समिती तर्फे तालुक्यातील वरवणे ग्रामपंचायत हद्दीतील झापडी गावामध्ये कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्यात अॅड. आर. एच. म्हात्रे यांनी कुळकायद्याविषयी आणि अॅड. भक्ती पाटील यांनी महिलांचे अधिकार, कौटुंबिक हिंसाचार याबाबत मार्गदर्शन केले. वरवणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदिप तोंडीलकर यांनी …
Read More »खोपोलीच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयात वाचनालय; सहजसेवा फाउंडेशनचा उपक्रम
खालापूर : प्रतिनिधी सहजसेवा फाउंडेशनने खोपोली नगर परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात वाचनालय सुरू केले असून, त्याचा शुभारंभ फाउंडेशनचे मार्गदर्शक अनिल देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 11) करण्यात आला. खालापूर येथील कारागृहात वाचनालय सुरू केल्यानंतर सहजसेवा फाउंडेशनने सामाजिक जाणिवेतून खोपोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात वाचनालयात सुरू केले आहे. त्याचा शुभारंभ …
Read More »रोहा तहसील कार्यालय परिसरात कचर्याचे साम्राज्य
रोहे ः प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील रोहा तहसील कार्यालयाच्या रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा पडला आहे. घंटागाडी दारोदारी येत असतानासुध्दा रस्त्याच्या बाजूला कचरा पसरला असल्याने नागरिकच स्वच्छता अभियानास हरताळ फासत असल्याचे चित्र दिसत आहे. रोहा शहरात जनजागृती रॅली काढून तसेच ठिकठिकाणी फलक लावून नागरिकांत स्वच्छतेबाबत जागृती करण्यात येत आहे. स्वच्छता अभियानही राबविण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper