Breaking News

महत्वाच्या बातम्या

शिवणकाम प्रमाणपत्राचे वितरण

मोहोपाडा : प्रतिनिधी पेहचान प्रोजेक्ट इदेमित्सु ल्युब प्रा. लि. व येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील अतिरिक्त एमआयडीसीतील जांभिवली येथे टेलरिंग प्रशिक्षण देण्यात आले होते. या शिवणकाम प्रमाणपत्राचे वितरण सरपंच रिया कोंडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाबाबत देवदास झेंडे यांनी टेलरिंग या व्यवसायातून महिलांनी आपल्या …

Read More »

कामोठे 11 मधील समस्या मार्गी; नगरसेविका हेमलता गोवारी यांचा पाठपुरावा

कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे से. 11 मधील सेक्टर 5 व 9 या भागातील विविध नागरी समस्या सोडविण्यात आल्या आहेत. या कामी नगरसेविका हेमलता गोवारी व सामाजिक कार्यकर्ते रवी गोवारी यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यानिमित्त येथील नागरिकांनी गोवारी दाम्पत्याचे जाहीर आभार मानले आहेत. कामोठे शहरातील अतिशय दुर्लक्षित असा भाग …

Read More »

भाजप भटके विमुक्त सेलची बैठक; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप कोकण प्रदेश विभागीय भटके विमुक्त सेलची रविवारी (दि. 21) भाजप मध्यवर्ती कार्यालयात झाली. या बैठकीला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांचे स्वागत करण्यात आली. बैठकीमध्ये कमिटीच्या रचनेसंदर्भात चर्चा करण्यात आली असून बुथ आघाडीतील सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रदेश …

Read More »

लसीकरणासाठी लकी ड्रॉची नामी शक्कल

मुरूड : प्रतिनिधी मुरूड नगर परिषद हद्दीतील कोविड लसीकरणाचे काम 85 टक्के पूर्ण झाले आहे. शहरातील 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण 100 टक्के पूर्ण व्हावे या उद्देशाने शहरात राहणार्‍या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी दि. 18  नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत पहिला व दुसरा डोस घेणार्‍या व्यक्तींचे लकी ड्रा काढण्यात येणार आहेत. यामध्ये 20 …

Read More »

धुळीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चिंचवली शेनगाव ते मानकीवली रस्त्यावर धुळीचे प्रचंड प्रमाणात धुळीचे साम्राज्य असून, या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनचालक, तसेच परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धुळीमुळे धोक्यात आले आहे. नगरपालिका हद्दीतील काही भाग व पुढे जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील हा रस्ता येथून जाणार्‍या दगड खाणीच्या वाहनांमुळे धोकादायक झाला आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे …

Read More »

खालापुरात बारवर छापा

चार बारबालांसह व्यवस्थापकावर गुन्हा खोपोली : प्रतिनिधी कलोते गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या पुनम ऑर्केस्ट्रा बारवर पोलीसांनी छापा टाकला. या वेळी अश्लील हावभाव करून संगीताच्या तालावर नृत्य करीत आरडाओरडा करणार्‍या चार बारबालांसह बारच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हॉटेलसाठी दिलेल्या परवान्याच्या अटी व शर्तीचे उल्लंघन पूनम ऑर्केस्ट्रा बारमध्ये होत असल्याची तक्रार …

Read More »

भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा

धाटाव : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्ताने शनिवारी (दि. 20) भाजप युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या माध्यमातून अलिबाग परहुर पाडा येथील श्री संत गाडगेबाबा वृद्धधाम येथील वृद्धांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. या वेळी युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित घाग, …

Read More »

पालीत शिवसेनेचे ‘एकला चलो रे’

विष्णुभाई पाटील यांची पत्रकार परिषदेत घोषणा पाली : प्रतिनिधी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे, मात्र आगामी पाली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत आहे, शिवसेना पक्षसंघटना मजबूत व बलाढ्य असून पाली नगरपंचायत निवडणूक शिवसेना स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा शिवसेना माजी जिल्हाप्रमुख विष्णुभाई …

Read More »

कर्जत नगर परिषद कचरामुक्त शहरांमध्ये कोकणात अव्वल

कर्जत : बातमीदार स्वच्छ सर्वेक्षण 2021मध्ये कोकणातील नगर परिषदांमध्ये रायगड जिल्ह्यातील कर्जत नगर परिषद अव्वल ठरली आहे. अमृत नॉन कचरामुक्त शहरात कर्जत नगर परिषदेला थ्री स्टार नामांकन मिळाले होते आणि त्याबद्दल कर्जत नगर परिषदेचा नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे …

Read More »

चंद्रशेखर भडसावळे यांना पुरस्कार जाहीर

कर्जत : बातमीदार कृषिरत्न तसेच कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी शेखर भडसावळे (नेरळ, ता. कर्जत) यांना वंदे मातरम संस्थेने वंदे मातरम किसान सन्मान पुरस्कार जाहीर केला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते भडसावळे यांना हा सन्मान राजभवन येथे 1 डिसेंबर रोजी होणार्‍या कार्यक्रमात सन्मानपूर्वक दिला जाणार आहे. चंद्रशेखर हरिभाऊ भडसावळे यांनी …

Read More »