Breaking News

महत्वाच्या बातम्या

काँग्रेसच्या पदयात्रेत मानापमान नाट्य

कल्याण : प्रतिनिधी महागाईच्या विरोधात काँग्रेसने संपूर्ण राज्यात जनजागरण पदयात्रा सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वातील ही पदयात्रा रविवारी (दि. 21) कल्याणमध्ये काढण्यात आली होती, मात्र या यात्रेत मानापमान नाट्य रंगले. काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी या पदयात्रेवर बहिष्कार टाकल्याने काँग्रेसमधील सुंदोपसुंदी उघड झाली आहे. नाना पटोले यांच्या …

Read More »

अमरावती हिंसाचारप्रकरणी एकतर्फी कारवाई होतेय

देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर आरोप अमरावती ः प्रतिनिधीअमरावती हिंसाचारप्रकरणी राज्य सरकारकडून एकतर्फी कारवाई होत आहे. ज्यांचा याच्याशी संबंध नाही अशा हिंदुत्ववादी संघटनांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते रविवारी (दि. 21) अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.अमरावतीला दौर्‍यावर गेलेले देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

पनवेलमध्ये ओबीसी जागर

जनजागरण रथयात्रेस उत्तम प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्तओबीसी जागर अभियान अंतर्गत भाजप उत्तर रायगड व पनवेल शहर ओबीसी मोर्चातर्फे जनजागरण रथयात्रेचे आयोजन रविवारी (दि. 21) पनवेलमध्ये करण्यात आले होते. भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर अध्यक्ष जयंत पगडे …

Read More »

विद्यापीठे, कॉलेज कर्मचार्‍यांचा सोमवारी लाक्षणिक बंद

मुंबई : येथील विद्यापीठासह राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे विविध प्रश्न उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर प्रलंबित आहेत. पाठपुरावा करूनदेखील हे प्रश्न सुटत नसल्याने विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वतीने सोमवारी (दि. 22) राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक बंद करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई विद्यापीठासह राज्यातील सर्व विद्यापीठे व …

Read More »

हवामान खात्याच्या इशार्‍याने समुद्रकिनारी तुरळक पर्यटक

रेवदंडा : प्रतिनिधी गेले तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह वादळी वारा, पावसाचे हवामान खात्यानेनिर्देश दिल्याने लॉकडाऊननंतर नुकताच तेजीत आलेला पर्यटन व्यवसाय पर्यटकांनी पाठ फिरविल्याने मंदित आला आहे. पर्यटकांचे हाऊसफुल्ल शनिवार, रविवार सुद्धा बदलत्या हवामानाने शटडाऊन राहिल्याचे चित्र होते, तर समुद्रकिनारी तुरळक पर्यटक दिसले. अलिबाग तालुक्यातील आवास, सासवणे, अलिबाग, नागाव, रेवदंडा, तसेच …

Read More »

एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनावरून दरेकरांचा इशारा; …तर सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार

मुंबई : प्रतिनिधी राज्यभर सुरू असलेले एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन दडपण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. यवतमाळ, इगतपुरीसह इतर ठिकाणांहून चार बस मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत होत्या, मात्र या कर्मचार्‍यांना डांबून ठेवले आहे. त्यामुळे शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळक लागेल. याची जबाबदारी सर्वस्वी सरकारवर राहील, असा इशारा रविवारी (दि. …

Read More »

अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने कुस्तीच्या खुल्या दंगली (स्पर्धा) आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सोमवारी (दि. 22) दुपारी 1.30 वाजता बेलवली-वारदोली येथील माऊली मैदानात होणार आहे. स्पर्धेचे आयोजक भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील आणि बेलवली अध्यक्ष सतीश …

Read More »

फिटनेससाठी डॉक्टरांचा पुढाकार ; क्रीडा स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबाग ः प्रतिनिधीअलिबाग-मुरूडमधील डॉक्टरांनी डॉक्टर व त्यांच्या कुटुंबीयांसाठी अलिबागजवळील आरसीएफ वसाहतीमधील क्रीडा संकुलात क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वैद्यकीय उपचाराबरोबरच शरीर फिट ठेवण्यासाठी वैयक्तिक व सांघिक खेळ महत्त्वाचे असल्याचा संदेश यातून देण्यात आला. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.अलिबाग व मुरूड मेडिकल असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या क्रीडा स्पर्धेत क्रिकेट, …

Read More »

पनवेलच्या यश वनवेरूची संतोष ट्रॉफी स्पर्धेसाठी निवड

पनवेल ः वार्ताहरफुटबॉलमध्ये महत्त्वाची असलेल्या संतोष ट्रॉफी स्पर्धेसाठी पनवेलमधील यश वनवेरू या युवा खेळाडूची महाराष्ट्र संघात निवडझाली आहे.यश वनवेरू हा रायगडमधून अनेक वर्षांनंतर निवडलेला पहिला खेळाडू आहे. त्याच्याबरोबरच सिद्धार्थ कोलाको, मध्यभागी, अलझार दिल्लीवाला, बचावपटू, अद्वैत शिंदे, मिड फिल्डर (सर्व रा. नवी मुंबई) यांचीसुद्धा संतोष ट्रॉफी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे …

Read More »

‘मएसो’ ज्ञानमंदिरात दीपोत्सवाचा उत्साह

कळंबोली : प्रतिनिधी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानमंदिर कळंबोली विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त दीपोत्सवासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक वामन प्रभाकर भावे, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके व लक्ष्मण नरहरी इंदापूरकर यांनी 1860 साली राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने संस्थेची स्थापना केली. या वर्षी शाळा …

Read More »