Breaking News

महत्वाच्या बातम्या

नागाव हटाळे बाजारात मतदानाविषयी जागृती

रेवदंडा : प्रतिनिधी प्रिझम सामाजिक विकास संस्थेने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने अलिबाग तालुक्यातील नागाव येथील प्रसिद्ध हटाळा बाजार परिसरात पथनाट्य सादर करून मतदानाविषयीजनजागृती केली. निर्वाचन आयोगामार्फत विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम 2022 राबविण्यात येत असून भारतीय लोकशाही अधिकाधिक निकोप बनविण्यासाठी नागरिकांना मतदान कार्यातील सहभाग अधिक वृद्धिंगत होणे अपेक्षित आहे. याच उद्देशाने …

Read More »

बार्डी गावात ई-श्रमकार्ड नोंदणी शिबिर; 200 जणांनी केली नोंदणी

कर्जत : बातमीदार तालुक्यातील चिंचवली ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील बार्डी गावामधील अंगणवाडीत ई-श्रमकार्ड नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ 200 ग्रामस्थांनी घेतला. बार्डी गावातील निखिल कोळंबे, हेमंत कोंडीलकर, जगदीश मुने, संभाजी धुळे, दर्शन दळवी, तेजस कांबरी  या तरुणांनी गावातील अंगणवाडीत ई-श्रमकार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते. चिंचवली ग्रामपंचायत सदस्य …

Read More »

आंबा पिकाला राज्य शासनाची सापत्न वागणूक

कोकणातील पाच जिल्ह्यांना वेगवेगळे दर म्हसळा : प्रतिनिधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत आंबा व काजू या फळपिकांसाठी राज्य शासनाने पुनर्रचित हवामान आधारित फळ विमा योजना लागू केली आहे. विमा उतरवण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत निश्चित केली आहे, परंतु आंबा पिकासाठी विमा हप्त्याची रक्कम 70 रुपये (प्रति आंबा कलम) वरून विमा कंपन्यांनी …

Read More »

गरज एकीकडे, निधी मात्र दुसरीकडे!

कर्जत तालुक्यात राज्य सरकार आणि स्थानिक आमदार यांच्याकडून राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणला जात आहे, मात्र कर्जत शहरातील विकासकामांना आणलेल्या निधीवरून राज्य सरकारमधील सत्ताधारी आघाडी मधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खटके उडाले आहेत.त्यात गरज नसताना निधी मंजूर केला जात असून ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी निधी आणण्यात …

Read More »

अवकाळी पावसामुळे फळे, भाज्यांचे नुकसान

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त परतीच्या पावसाने कृषिमालाचे मोठे नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झाला असतानाच दोन दिवस अवकाळी पडलेल्या पावसाने हातात आलेल्या शेतमालाचेही नुकसान केले आहे. या पावसामुळे फळ आणि भाज्यांचे नुकसान होऊन त्यांची आवक पुढील महिनाभर कमीच राहणार असल्याचा अंदाज व्यापार्‍यांनी वर्तवला आहे. अवकाळी पावसाचा फटका हंगामी फळांना बसला …

Read More »

नवी मुंबईत बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त; सात जणांना अटक; मुद्देमाल जप्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अमेरिकन नागरिकांना फसवणारे बोगस अ‍ॅमेझॉन कॉल सेंटर नवी मुंबईतून उद्ध्वस्त करण्यात आले आहे. आरोपींकडून 10 लॅपटॉप, दोन राऊटर, आठ मोबाइल फोन, चार हेडफोन जप्त करण्यात आले.रबाळे पोलिसांना शिवशंकर हाईट, से. 20 ऐरोली येथील इमारतीचे फ्लॅटमध्ये अवैधरित्या कॉल सेंटर सुरू असून, त्याद्वारे अमेरिकन नागरिकांची फसवणुक केली …

Read More »

नवी मुंबई स्वच्छ शहरांत अव्वल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त स्वच्छ सर्वेक्षण 2021मध्ये नवी मुंबई महापालिकेने देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांकाचा किताब अखेर प्राप्त केला. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत शहरातील नागरिकांना त्यात सहभागी करून घेतले. त्याचे फलित मिळाले असून नवी मुंबईला गौरवण्यात आले. महानगरपालिकेने शहरात सौंदर्यीकरणाच्या नाविन्यपूर्ण संकल्पना राबविल्या. …

Read More »

शेतकरीहितैषी मोदी सरकार

सबका साथ सबका विकास यासोबतच केंद्रातील मोदी सरकारने सबका विश्वास कारभारचीही पुन्हा एकदा देशवासीयांना प्रचिती दिली आहे. शेतकर्‍यांच्या हितार्थ लागू करण्यात आलेले कृषी कायदे काही शेतकरी संघटनांना मान्य नसल्याने होणारा विरोध आणि हिंसा लक्षात घेता मोदी सरकारने हे कायदे रद्द करून मनाचा मोठेपणा दाखवून दिला आहे. भारत हा कृषिप्रधान देश …

Read More »

ओबीसी जागर अभियान रथयात्रेचा रायगडात शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्याचा निषेध करून या सरकारच्या झारीतील शुक्राचार्याची भूमिका उघड करण्यासाठी आणि ओबीसी समाजाला जागृत करण्याकरिता भाजपच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी जागर अभियान रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील ओबीसी जागर यात्रेला सुरुवात झालीय.ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात …

Read More »

विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही; गुणवंतांचा सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्ततुम्ही सर्व आपापल्या आयुष्यामध्ये पुढे प्रगती करीत राहा. त्या दृष्टिकोनातून वाटचाल करीत असताना आमचे जे सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत राहू, अशी ग्वाही भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे दिली. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आयोजित …

Read More »