Breaking News

महत्वाच्या बातम्या

हेरिटेज वारसा : मिनीट्रेन

युनोस्कोच्या हेरिटेजसाठी माथेरानची राणी देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. पर्यटनाला चालना देणारी माथेरानची राणी म्हणजेच मिनिट्रेनने हेरिटेजसाठी युनोस्कोच्या पहिल्या फेरीमध्ये यश संपादन केले असून, दुसर्‍या फेरीकडे योग्य वाटचाल सुरू आहे.  यापूर्वीदेखील 2002 साली युनेस्कोकडून माथेरानच्या मिनिट्रेनला हेरिटेज दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. आताही युनोस्कोच्या हेरिटेज दर्जाचे स्थान मिळविण्यासाठी  मिनिट्रेन …

Read More »

पनवेलमध्ये प्रथमच ‘अग्रज’ची उत्पादने

पनवेल : रामप्रहर वृत्त येथील शिवाजी रोडवरील सिल्हर अपार्टमेंटमध्ये  प्रथमच पुण्याचे प्रसिद्ध अग्रज फुड प्रोसेसर्सची उत्पादने रोहिणी लिमये आणि शीतल लिमये यांनी पनवेलकरांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. या दुकानाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 5) पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल भूषण डॉ. संजीवनी गुणे यांच्या हस्ते झाले. संपूर्ण नवी मुंबईत पनवेल …

Read More »

‘मिसिंग लिंक’च्या ठेकेदाराला मारहाण; दोन जण गंभीर जखमी

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत नवीन मिसिंग लिंक मार्गाचे काम सुरू आहे. चावणी येथे पुलाचे काम सुरू असल्याने सध्या या परिसरात काही तरुण गुंडगिरी करीत असल्याचे समोर येत आहे. मागील दोन दिवसांत येथे शिवीगाळ, मारहाण व धमकावणे, तसेच काम करणार्‍या कंपनीच्या व्यवस्थापक व ठेकेदारांना मारहाण करण्याच्या घटना घडत आहे. …

Read More »

दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी

महाड ः प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड शहरानजीक गांधारपाले गाव हद्दीत शनिवारी (दि. 6) दुपारी एक दुचाकी रस्त्यावर घसरली. या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ज्ञानेश्वर रामचंद्र पाथरटकर आणि हरिश्चंद्र बाळू देवळे (दोघे रा. देहगाव, दापोली) हे दोघे दुचाकी (एमएच 4-जेझेड 5968)वरून दापोली …

Read More »

अवकाळी पावसाचा तडाखा; भातपिकांचे अतोनात नुकसान

अलिबाग : प्रतिनिधी मागील दोन पडलेल्या अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यात भातशेतीचे नुकसान झाले. उभी पिके कोलमडली असून कापलेली पिके व भाताचे भारे पावसाच्या पाण्यात पसरले आहेत. हाती आलेले भातपीक हातचे गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गुरुवार संध्याकाळपासून पावसाने सुरुवात केल्याने भातपिकाची पुरती वाताहत झाली असून शेतकरीवर्गास मोठ्या नुकसानीस सामोरे जावे …

Read More »

केंद्राच्या घोषणेनंतर भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घट

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्राच्या इंधन दरकपातीच्या घोषणेनंतर भाजपाशासित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 8.7 आणि 9.52 रुपये प्रतिलीटरने कमी करण्यात आले आहे. केंद्राने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये, तर डिझेलवरील शुल्कात दहा रुपये कपात केली असून ती गुरुवार (दि. 4)पासून लागू करण्यात आली आहे. ज्या …

Read More »

ऐन दिवाळीत अवकाळी पाऊस; बळीराजा हवालदिल

पाली, मुरूड ः प्रतिनिधीसर्व जण दिवाळीचा उत्सव हर्षोल्हासात साजरा करीत असताना रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 6) सलग दुसर्‍या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली, तर पीक भिजल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.दीपावली पाडव्याच्या दिवशी वातावरण ढगाळ झाले होते. सायंकाळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह जिल्ह्याच्या अनेक भागांत जोरदार …

Read More »

पनवेलच्या ‘दिवाळी पहाट’मध्ये सप्तसुरांची उधळण

स्वरसम्राट राहुल देशपाडेंच्या सुरेल मैफिलने रसिक मंत्रमुग्ध पनवेल ः प्रतिनिधीविरळ धुक्याची झालर, त्यात सुटलेला प्रसन्न वारा, सोबत सूर्याची सोनेरी किरणे आणि क्षितिजाला गवसणी घालणार्‍या स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुमधूर सुरांनी पनवेलकर रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते दिवाळी पहाट कार्यक्रमाचे. या सुरेल मैफिलीचा श्रोत्यांनी कुटुंबासह आणि मित्रपरिवारासोबत मनमुराद आनंद घेतला आणि …

Read More »

रुग्णालयात अग्नितांडव

अहमदनगरमध्ये भीषण आगीत 10 रुग्णांचा मृत्यू अहमदनगर ः प्रतिनिधीयेथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. 6) भीषण आग लागून 10 रुग्णांचा मृत्यू, तर काही जण जखमी झाले आहेत. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली. या विभागात एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते. हे सर्व जण कोरोनाबाधित होते. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेबद्दल …

Read More »

पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला चक्क आशा वर्कर्स, अंगणवाडीसेविकांचा आधार

पेण : रामप्रहर वृत्त पेण तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष म्हणजे नेतेमंडळी हिंगभर, तर कार्यकर्ते मूठभर. तालुक्यात राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी आहे. त्यामुळे कार्यक्रम करायचा तर व्यासपीठासमोर बसायला कार्यकर्तेच नसतात. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी ओढांगीच्या एका कार्यकर्त्या महिलेने वाशी येथे कार्यक्रम घेतला, पण तिला माहीत होते की कार्यक्रमाला गर्दी काही होणार नाही. म्हणून …

Read More »