पनवेल : रामप्रहर वृत्त शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना महायुतीचे मावळ मतदारसंघातील उमेदवार तथा खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी शिवसेना, भाजपमधील प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा शेवटच्या टप्प्यात होणार आहेत. त्यामुळे मावळचे राजकीय रण खर्या अर्थाने गाजणार आहे. – ना. नितीन गडकरी शुक्रवारी मोहोपाड्यात मोहोपाडा : मावळ …
Read More »सामाजिक कार्यकर्ते भाजपमध्ये
कळंबोली : सबका साथ सबका विकास या ध्येयाने कार्यरत असलेल्या भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांचा ओघ सातत्याने वाढत असून, कळंबोलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 21) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांची खारघर येथील गुरुद्वारास सदिच्छा भेट
पनवेल : आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर येथील गुरुद्वारास सदिच्छा भेट देत गुरुग्रंथ साहिबा यांचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
Read More »टेनिस अकादमीचे उद्घाटन
उलवे नोड : येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ए.एस.ए. टेनिस अॅकॅडमी नव्याने सुरु करण्यात आली आहे. या अॅकॅडमीचे उद्घाटन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी शेखर टोमसे, अल्पेश गायकवाड, अरुण भोसले, दिलीप म्हात्रे, अमोल दास, फाऊंडर मेंबर किशोर पाटील, हिमांशू …
Read More »पनवेलमध्ये घुमला महायुतीचा आवाज
पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं, मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ रविवारी पनवेलमध्ये महायुतीतर्फे जोरदार बाईक रॅली काढण्यात आली. यामध्ये भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याची ही चित्रमय झलक. (सर्व छाया : लक्ष्मण ठाकूर)
Read More »महायुतीच्या प्रचाराचा जोरदार धडाका
मतदारांच्या वाढत्या प्रतिसादाने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला पनवेल : रामप्रहर वृत्त : शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत उरण, पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात महायुतीतर्फे प्रचाराचा जोरदार धडाका सुरू असून, त्या प्रचाराला मतदारांकडूनदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. गावागावात, वाड्यांवर उमेदवार बारणे यांचे जल्लोषात स्वागत केले जात …
Read More »कामोठेत हनुमान जयंती साजरी
कामोठे : रामप्रहर वृत्त हनुमान जयंती शुक्रवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त कामोठे व जावळे येथील हनुमान मंदिरास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत मनोभावे दर्शन घेतले. या वेळी पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती ‘क’चे अध्यक्ष दिलीप पाटील, नगरसेवक विजय चिपळेकर, …
Read More »तेजश्री व प्रसाद पाटील यांच्या शुभविवाहाप्रसंगी शुभाशीर्वाद
पनवेल ः शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांची सुकन्या तेजश्री व प्रसाद पाटील यांच्या शुभविवाहाप्रसंगी शुभाशीर्वाद देताना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, नगरसेवक अरविंद म्हात्रे, भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे आदी मान्यवर.
Read More »जल्लोषात स्वागत
उरण : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उरण तालुक्यात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत मतदारांनी महायुतीच्या नेत्यांचे असे जल्लोषात स्वागत केले.
Read More »महामानवाला अभिवादन!
कामोठे : सेक्टर 6ए मधील जुई आर्केड सोसायटीच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिवादन केले. या वेळी नगरसेवक विजय चिपळेकर, तसेच हॅप्पी सिंग, मंगेश धिवार, रवी कांबळे, बाळासाहेब पडवळ आदी उपस्थित होते.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper