उरण : वार्ताहर येथील यूईएस स्कूल अॅण्ड कॉलेजमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विमला तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याजवळ विद्यार्थी व पालकगण पारंपरिक वेषभूषेत जमले होते. यूईएस संस्थेच्या विश्वस्त, पदाधिकार्यांनी शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ढोल-ताशा व लेझीमच्या लयबद्ध वाद्यवृंदासह शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक …
Read More »विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचे स्नेहसंमेलन साजरे रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘आविष्कार’या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन गुरुवारी (दि. 21) करण्यात आले होते. हा कार्यक्रम ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »अभिनेता सलमान खान बिईंग ह्युमन ट्रस्टच्या वतीने मदतीचा धनादेश
पनवेल : अभिनेता सलमान खान बिईंग ह्युमन ट्रस्टच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून संदीप टेमकर यांना वैद्यकीय उपचारार्थ 20 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. टेमकर हे नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार घेत असल्याने मदतीचा धनादेश नगरसेवक राजू सोनी यांनी भाजप शहर उपाध्यक्ष भीमराव पोवार यांच्याकडे सुपूर्द केला.
Read More »उसर्ली पेस सेंटर येथे प्रमाणपत्र वितरण
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील उसर्ली येथील प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन पेस सेंटरमध्ये इलेक्ट्रिकल व ऑटोमोटिव्ह या कौशल्य विकासाचे प्रशिक्षण पूर्ण करणार्या युवक-युवतींना नुकतेच प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. पेस सेंटरमध्ये दोन कोर्सचे निवासी प्रशिक्षण दिले जाते. या कोर्ससाठी होल्टास कंपनी सहकार्य करीत आहे. यामध्ये केवळ प्रशिक्षण न देता त्यांना नोकरीसाठी सहकार्य …
Read More »कर्नाळा किल्ल्यावर अडकलेल्या चौघांची सुखरूप सुटका
पनवेल : बातमीदार कर्नाळा किल्ल्यावर अडकून पडलेल्या चौघांना तालुका पोलीस, वन विभाग आणि निसर्ग मित्र सह्याद्री प्रतिष्ठान ट्रेकर्सच्या मदतीने सुखरूप खाली उतरवण्यात आले आहे. हे चौघेही एका कार्यालयात काम करीत होते. बापू चव्हाण (कामोठे), सायली जाधव (ऐरोली), श्रुती कदम (मुंबई सेंट्रल), कीर्ती पुरोहित (खारघर) अशी या चौघांची नावे आहेत. कर्नाळा …
Read More »महसुली अधिकार्यांच्या बदल्या
उपजिल्हाधिकारी दर्जाच्या 27 अधिकार्यांचा समावेश पनवेल : बातमीदार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागाच्या महसूल विभागात उपजिल्हाधिकारी संवर्गांतील बदल्यांचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले. नियमाप्रमाणे करण्यात आलेल्या या बदल्यांमध्ये उपजिल्हाधिकारी दर्जाच्या तब्बल 27 अधिकार्यांचा समावेश आहे. ठाणे, कोकण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई या सहा जिल्ह्यांत बदल्या करण्यात आल्या आहेत. निवडणुकीशी संबंधित …
Read More »भाजप नगरसेवकांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा शेकापचा प्रयत्न
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीतील भाजपच्या नगरसेवकांनी पाठपुरावा करून केलेल्या कामांचे श्रेय मिळवण्यासाठी शेकापकडून पूर्वीच झालेल्या कामांचे भूमिपूजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. आपला निधी कोठे वापरता येतो याबाबतचे शेकापच्या नगरसेविकेचे अज्ञान यानिमित्ताने उघड झाले असल्याचे भाजपचे प्रवक्ते नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी म्हटले आहे. पनवेल महापालिका हद्दीतील विकासकामाचा शुभारंभ …
Read More »पनवेल महापालिकेची इमारत कात टाकणार
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेची इमारत कात टाकणार असून, नव्या स्वरूपातील आकर्षक व सुंदर इमारत लवकरच पाहायला मिळेल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांनी गुरुवारी (दि. 21) दिली. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी दुपारी अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका भवनात झाली. या सभेस सभागृह नेते परेश …
Read More »उरणमधील नवघर, कुंडेगावात शिरले उधाणाचे पाणी
जेएनपीटी : प्रतिनिधी समुद्राच्या भरतीचे खारे पाणी उरण तालुक्यातील कुंडेगाव, नवघर, फुंडे, भेंडखळ गावांतील अनेक घरात शिरल्याची घटना बुधवारी (दि. 20) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. कुंडेगाव तर समुद्राच्या पाण्यात बुडाल्याने ग्रामस्थांना रात्र घरातील पाणी उपसण्यात आणि थंडीत कुडकुडत जागून काढावी लागली. महसूल अधिकार्यांनी समुद्राचे पाणी शिरलेल्या गावांची आणि आर्थिक नुकसान झालेल्या …
Read More »नगरसेवक राजू सोनी यांचा सत्कार
पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्र. 19चे अध्यक्ष नगरसेवक चंद्रकांत (राजू) सोनी यांनी सुशिला रेसिडेन्सी येथील नागरी समस्या सोडविल्याबद्दल त्यांचा विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. सुशीला रेसिडेन्सिला गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न, तसेच ड्रेनेजचा प्रश्न, गटाराचा प्रश्न भेडसावत होता. या संदर्भात त्यांनी नगरसेवक राजू सोनी यांची भेट घेऊन त्यांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper