Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

आकुर्लीत तरुणाच्या हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप आणि दंड

पनवेल : तालुक्यातील आकुर्ली येथील एका 17 वर्षीय तरुणाची हत्या करणार्‍या आरोपींना अलिबाग न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.   आकुर्ली येथील आदित्य म्हसकर हा 23 जून 2013 रोजी घरातून आईसाठी औषध आणण्यासाठी बाहेर पडला होता, मात्र तो घरी परत आला नव्हता. त्यामुळे तो हरवल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली …

Read More »

पारितोषिक वितरण समारंभात शिक्षक-विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पनवेल ः खारघर ओवेपेठ येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 18वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा गुणगौरव सोहळा आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा चिंतन सोहळ्याचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते …

Read More »

भाषा टिकली तर संस्कृती टिकेल -मुळे

पनवेल : एखाद्या गोष्टीची माहिती मिळविण्यासाठी गुगल सर्च केले जाते, परंतु तुमच्या ज्ञानात कायमस्वरूपी भर टाकायची असेल तर गुगल सर्चवर अवलंबून न राहता पुस्तके वाचा. मराठी पुस्तके खरेदी करा. यामुळे भाषाही टिकेल आणि आपली संस्कृतीदेखील टिकेल, असे प्रतिपादन माहिती संचालनालयाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले. कोकण मराठी साहित्य …

Read More »

भाजपात कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच

उलवे नोडचे शेकाप कार्यकर्ते दाखल पनवेल ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची घोडदौड सुरू असून गुरुवारी (दि. 28) उलवे नोड येथील शेकाप पदाधिकार्‍यांनी भाजपात प्रवेश करून कमळ हाती घेतले.पनवेल मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या प्रांगणात …

Read More »

पत्रकार चषकात कोप्रोली संघाची बाजी

पनवेल : बातमीदार पत्रकार मयूर तांबडे यांच्या वाढदिवसानिमित्त नेरेपाडा येथील मैदानावर पत्रकार चषक 2019चे आयोजन करण्यात आले होते. या चषकावर कोप्रोली संघाने आपले नाव कोरले, तर पाली संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 27 फेब्रुवारी रोजी पत्रकार मयूर तांबडे यांच्या वाढदिवसानिमित्त एकदिवसीय क्रिकेट …

Read More »

पी. जे. पाटील म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रशंसोद्गार, अमृत महोत्सवानिमित्त सत्कार

उरण : वार्ताहर पी. जे. पाटील म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असल्याचे प्रशंसोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले. जसखार गावचे  सुपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे नेते व शिक्षणप्रेमी पी. जे. पाटील यांचा अमृत महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा मंगळवारी (दि. 26) श्री रत्नेश्वरी देवी मंदिर मैदान जसखार येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी …

Read More »

‘रयत’चा लौकिक वाढवा : रामशेठ ठाकूर

वडगाव येथील ‘रयत’च्या न्यू इंग्लिश स्कूल इमारतीचे उद्घाटन पुणे : प्रतिनिधी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या शैक्षणिक उद्धारासाठी ज्या हेतूने रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्या रयत शिक्षण संस्थेचा लौकिक या संस्थेतील शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी वाढवावा, असे आवाहन संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. …

Read More »

कळंबोलीतील पायाभूत सुविधांची दुरुस्ती

सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा पुढाकार पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारामुळे कळंबोली वसाहतीत पायाभूत सुविधांची तातडीने दुरुस्ती केली जाणार असून, त्यासाठी 10 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावात नवीन जलवाहिन्या टाकणे, मलनिःसारण वाहिन्यांची हायफ्लो सफाई आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. …

Read More »

पनवेलमध्ये भारतमातेचा जयजयकार

भारतीय वायुसेनेच्या कामगिरीला भाजपचा सलाम पनवेल : रामप्रहर वृत्त भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करून सुमारे 350 दहशतवाद्यांचा खात्मा केला. याबद्दल पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय वायुसेनेचे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करून जल्लोष करण्यात आला. …

Read More »

शिरवली ग्रामपंचायतीमध्ये ‘कमळ’ फुलले

भाजपच्या रखमाबाई बोंडे सरपंचपदी पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या अनेक वर्षांपासून शिरवली ग्रामपंचायतीवर असलेली शेतकरी कामगार पक्षाची सत्ता भारतीय जनता पक्षाने उलथवून दणदणीत विजय साकारला आहे. शिरवलीत भाजपच्या थेट सरपंचपदाच्या उमेदवार रखमाबाई बोंडे, तसेच सदस्यपदाच्या आठ उमेदवारांनी भरघोस मतांनी विजय मिळवत शेकापचा दारुण पराभव केला. शिरवली ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल …

Read More »