Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

मतदारांच्या रांगा

वावंजे (ता. पनवेल) : ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया झाली. या वेळी मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. (छाया : लक्ष्मण ठाकूर)

Read More »

ज्येष्ठांची सामाजिक बांधिलकी

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सामाजिक बांधिलकीचे भान राखूऩ पनवेल तालुक्यातील स्वयंसेवी सामाजिक संस्थांना संघातर्फे आर्थिक सहाय्य देण्याचा कार्यक्रम नुकताच संघाच्या सभागृहात पार पडला. प्रथम पुलवामा भ्याड हल्ल्याचा निषेध करून शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या उपायुक्त संध्या …

Read More »

भावे नाट्यगृहाचा होणार कायापालट

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील वाशी येथील एकमेव अशा विष्णुदास भावे नाट्यगृहाचा कायापालट होणार आहे. सिडकोकडून 1996 साली बांधलेल्या नाट्यगृहानंतर अद्याप मोठ्या प्रमाणात त्याचे नुतनीकरण झालेले नाही. त्यामुळे नुतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 11 कोटी 51 लाख 47 हजार 81 रुपये खर्च करण्यात येणार आहेत. नुतनीकरणासाठी चार ते …

Read More »

सोनारीत 96 टक्के मतदान; आज मतमोजणी

उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक आज 24 फेब्रुवारी 2919 रोजी घेण्यात आली असून, सोनारी ग्रामपंचायतीच्या सरपंच व 9 सदस्य पदासाठी झालेल्या निवडणूकीतील एकूण 20 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून,महिला 866 व पुरुष 854 असे एकूण 1720 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सरासरी 96 टक्के …

Read More »

कळंबोलीत शिवजयंती साजरी

पनवेल : वार्ताहर कळंबोली शहर शिवजयंती उत्सव 2019 या मंडळाच्या माध्यमातून सेक्टर 1 येथील शिवाजी महाराज मैदानात मंदिर येथे नागरिकांनी एकत्र येऊन एक शहर एक रॅली काढली. डोक्यात हेल्मेट घालून वाहने चालवावी व अपघातापासून आपले संरक्षण करावे हा संदेश 150 वाहनचालकांनी कळंबोली पोलिसांच्या सहकार्याने डोक्यात हेल्मेट घालून रॅलीत सहभागी होत …

Read More »

सारडे विकास मंचतर्फे प्लॅस्टिकमुक्त गाव उपक्रम

उरण : बातमीदार स्वच्छतेतून समृद्धीकडे हा मूलमंत्र अंगीकारून  उरण पूर्व विभागातील सारडे विकास मंचने ‘प्लॅस्टिकमुक्त गाव’चा निर्धार केला आहे. या अंतर्गत नुकताच आवरे गावात उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास राजू मुंबईकर, शिक्षक कौशिक ठाकूर उपस्थित होते. या वेळी सामाजिक संघटना, व्यक्तींना कापडी पिशवीचे वाटप करून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थितांचे …

Read More »

सामुदायिक मुंडण करून शहिदांना श्रद्धांजली

कळंबोली : प्रतिनिधी जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशाचे सुमारे 40 जवान शहीद झाले. त्याला रविवारी (दि. 24) 10 दिवस पूर्ण झाल्यामुळे भारतीय रीतिरिवाज व परंपरेनुसार कळंबोली कॉलनी येथे सामुदायिक मुंडण करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे आयोजन श्री संत सेवालाल …

Read More »

बेवारस वाहनांबाबत संपर्काचे आवाहन

पनवेल : बातमीदार पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची 22 वाहने बर्‍याच दिवसांपासून बेवारस स्थितीमध्ये पडून आहेत. या वाहनाच्या मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. शहर पोलीस ठाण्याच्या आवारात बजाज डिस्कव्हर, पल्सर, महिंद्रा सेन्च्युरो, करिझ्मा, हीरो होंडा स्प्लेंडर, लाल कायनेटिक, स्प्लेंडर प्लस, पल्सर काळी, पॅशन प्रो, हीरो …

Read More »

चिरनेर परिसरात आंबा मोहर करपला

चिरनेर : प्रतिनिधी भातशेतीत दरवर्षी तोटा होत असल्याने चिरनेर विभागातील शेतकर्‍यांनी हापूस आंब्यांची बागायत शेती मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. यंदा आम्रवृक्ष मोहरून गेले होेते. त्यामुळे आंब्याचे चांगले उत्पादन होईल या आनंदात शेतकरी असतानाच बदलत्या हवामानामुळे या बागायतीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादूर्भाव होऊन आंब्याचा मोहर करपून गेला आहे. परिणामी बळीराजा हवालदिल …

Read More »

कोप्रोली आरोग्य केंद्र आजारी

डॉक्टरांची वानवा, सुविधांचा अभाव; रुग्णांची होतेय हेळसांड जेएनपीटी : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणार्‍या कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या सुविधांचा अभाव, डॉक्टर वर्गाची वानवा, तसेच परिचारिकांची व  कर्मचारी वर्गाची रिक्त पदे अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे या रुग्णालयात उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांची हेळसांड होत आहे. उरण तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकास …

Read More »