गव्हाण विद्यालयात एचएससी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्त विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आयुष्यात उत्तुंग भरारी घ्यावी, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत यांनी केले. येथील रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत …
Read More »दागिने खेचून पळणारा सराईत गुन्हेगार गजाआड
पनवेल ः वार्ताहर पनवेल शहर परिसरात तसेच खांदा वसाहत परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पळणार्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीने चार गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या अटकेनंतर आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पनवेल शहर परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे …
Read More »रस्ते अपघातांत पुन्हा वाढ
जेएनपीटी महामार्गावर सर्वाधिक दुचाकी अपघात पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई, पनवेल, उरण या विकासात्मक विभागात निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुन्हा दुचाकी अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक अपघात हे जेएनपीटी महामार्गावर होत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या अहवालातून समोर आले आहे. उरणच्या जेएनपीटी बंदराकडे जाणारे रस्ते चकाचक झाल्याने या भागात …
Read More »पनवेलमध्ये धान्य महोत्सव; 4 ते 6 मार्चपर्यंत तांदूळ थेट शेतकर्यांकडून उपलब्ध
पनवेल ः रामप्रहर वृृत्त महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) रायगड व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा तांदूळ व धान्य महोत्सवाचे आयोजन 4 ते 6 मार्च दरम्यान शहरातील गुजराथी शाळा, डॉ. आंबेडकर रोड येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात महाराष्ट्र शासन …
Read More »विविध कार्यक्रमांची मेजवानी
पनवेल : रामप्रहर वृत्त केदार भगत मित्रपरिवार या संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील 21 महिलांचा सत्कार, हळदी-कुंकू समारंभ आणि चला जिंकूया पैठणी या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि. 6 मार्च) करण्यात आले आहे. व्हि. के. हायस्कूलच्या मागील मैदानावर होणार्या या समारंभास पनवेलमधील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित …
Read More »‘मी घरी आले माझे मित्रही लवकर घरी यावेत’
पनवेल : नितिन देशमुख रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकेले आहेत. भारत सरकार या सर्व विद्यार्थ्यांना सुखरूपणे मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रायगड जिल्ह्यातील काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अजुनही युद्धाच्या ठिणग्या सोसत आहेत, तर काही सुखरुपपणे परतले आहेत. असाच युक्रेन ते भारत या प्रवासातील थरारक अनुभव …
Read More »उलवे नोडमध्ये हनुमान मंदिर बांधकामाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड सेक्टर 17 येथे हनुमान मंदिर बांधकामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि.2) करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील सोसायटींचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …
Read More »दिव्य गर्भसंस्कार दिव्य भारतमुळे गर्भवतींना फायदे -डॉ. भारती पवार
पनवेल महापालिका व प्रजापिता ब्रम्हकुमारीतर्फे शिबिर पनवेल : प्रतिनिधी दिव्य गर्भसंस्कार दिव्य भारत या वर्षभर चालणार्या या कार्यक्रमांमध्ये भयमुक्त, सशक्त आणि निरोगी जीवन जगण्यासाठीच्या विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला असून गर्भवती महिला निरोगी, आनंदी राहण्यासाठी या कार्यक्रमाची मदत होणार आहे. या कार्यक्रमामुळे गर्भवती महिला निरोगी बाळांना जन्म देऊ शकतील आणि …
Read More »महाशिवरात्रीनिमित्त आर्या वनौषधी संस्थेतर्फे बिल्व दिन साजरा
पनवेल ः वार्ताहर महाशिवरात्रीचे औचित्य साधून पनवेल येथील आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने बिल्व दिन साजरा करण्यात आला. यावेळी पेण, पनवेल, गोंदिया, रत्नागिरी, बोईसर, डहाणू, अलिबाग, उरण येथे बेलाची रोपे वाटप व लागवड करण्यात आली. सदर कार्यक्रमात बेलाच्या औषधी गुणधर्मांची माहिती असलेली पत्रकेही वाटण्यात आली. आर्या वनौषधीच्या या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमात वनौषधी तज्ज्ञ …
Read More »मराठी न्यायशब्दकोश समृद्ध होणे गरजेचे -डॉ.अस्मिता वैद्य
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात नुकतेच जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठी वाड्मय मंडळातर्फे ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शासकीय विधी महाविद्यालय मुंबईच्या प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी त्यांचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper