Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

सुभाष पुजारी ‘मास्टर भारत श्री’चे मानकरी

पनवेल ः वार्ताहरइंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनच्या वतीने पंजाबमधील लुधियाना येथे आयोजित करण्यात आलेल्या 11व्या मेन्स ज्युनिअर, मास्टर, दिव्यांग, वुमेन ज्युनिअर, ज्युनिअर नॅशनल बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशीप 2021 या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघातून खेळताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष शंकर पुजारी यांनी भारत श्री 2021 किताबावर आपले नाव कोरले. हा किताब फडकविणार पुजारी हे देशातील पहिलेच …

Read More »

घरगुती मसाल्यासाठी गृहिणींची लगबग

उरण : वार्ताहर, मोहोपाडा : प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मिरचीची खरेदी सुरू झाली आहे. पावसाळ्यापूर्वी लाल तिखट मसाला घरी करून ठेवण्याची परंपरा असल्याने गृहिणींनी बाजारात गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. या मसाल्यासाठी लागणारी सामुग्री खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे. दिवसेंदिवस लाल मिरची व गरम मसाल्याच्या वस्तूंचे भाव वाढत …

Read More »

सराईत गुन्हेगार चौकडी अटकेत; साडेसात लाखांचा ऐवज हस्तगत

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीसह इतर गुन्हे करणार्‍या सराईत चौकडीला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तळोजा परिसरातून ताब्यात घेतले. या आरोपींकडून आतापर्यंत सात लाख 41 हजार 500 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महागड्या लोखंडी प्लेट्स …

Read More »

उरणच्या कळंबुसरेजवळ रस्ता खचला; अपघाताची शक्यता; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

उरण : प्रतिनिधी चिरनेर-कोप्रोली-आवरे रस्त्यावरील कळंबुसरे स्मशानभूमीजवळील मोरीवर रस्ता खचला आहे. या खचलेल्या रस्त्याला मोठे भगदाड पडले असूनही सार्वजनिक बांधकाम खाते याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जेएनपीटी बंदराच्या अनुषंगाने उरणच्या पूर्व भागात अनेक सीएफएस एमटी यार्ड गोडाऊन वसले आहे. त्यामुळे या चिरनेर-कोप्रोली …

Read More »

ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी नवीन पॅटर्न; पूर्व नोंदणीशिवायही घेता येईल डोस

पनवेल : प्रतिनिधी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार खाजगी कोविड लसीकरणांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठीच्या अपॉईमेंन्ट-वॉकिंग पॅटर्न (लसीकरणाबाबतचे नियोजन) तयार करण्याबाबत लसीकरण केंद्रांना सूचना देण्याचा निर्णय पालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात आला. या पॅटर्नमध्ये पूर्व नोंदणी न करता लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करून कोविड लशीचा डोस घेता येणार …

Read More »

पिण्याच्या पाइपलाइनची दुरुस्ती

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर पनवेलमधील स्वामी नित्यानंद मार्गावर पिण्याच्या पाइपलाइनची दुरुस्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पाठपुरावा केला आहे. स्वामी नित्यानंद मार्गावर पद्मावती अपार्टमेंटसमोर पिण्याची पाइपलाइन लिकेज होऊन रस्त्यावर पाणी येऊ लागले होते. परिसरातील सोसायटीच्या रहिवाशांनी ही बाब नगरसेवक …

Read More »

रक्त-प्लाझ्मादान शिबिरास प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन 90 वर्षांपूर्वी देशाच्या इतिहासात आपले नाव अजरामर केले. या महान हुतात्म्यांच्या स्मरणार्थ देश व विदेशात रक्तदान व प्लाझ्मादान शिबिर आयोजित करण्यात आले. त्या अनुषंगाने मंगळवारी (दि. 23) पनवेलच्या खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात रक्त व प्लाझ्मादान …

Read More »

रिसवाडी हद्दीत टेम्पोला कंटेनरची धडक

एकाचा जागीच मृत्यू; एक जण जखमी मोहोपाडा : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील रिसवाडी गावाच्या हद्दीत मंगळवारी (दि. 23) सकाळी 6.30च्या सुमारास मालाने भरलेल्या आयसर टेम्पोला मागून कंटेनरने जोरदार धडक दिली. झालेल्या अपघातात टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर धडक देणार्‍या कंटेनर चालकावर एमजीएम हॉस्पिटलात उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी …

Read More »

शासकीय जमिनीवरील खारफुटीची कत्तल

उरणच्या मोठी जुई येथील प्रकार; यंत्रणेचे दुर्लक्ष उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील मोठी जुई गावाच्या हद्दीतील खाडीकिनारी खारफुटीची कत्तल करून सरकारी जमीन हडप करण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यास विरोध करणार्‍या एका सामाजिक कार्यकर्त्यास जमीन हडप करणार्‍या टोळीने बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणात उरण तहसील कार्यालयातील एका माजी अधिकार्‍याचे नाव …

Read More »

तरुणांच्या सक्षमीकरणासाठी आत्मनिर्भर भारत भाजप उत्तर रायगड टीम प्रयत्नशील

पनवेल : रामप्रहर वृत्त तरुणांना उद्योगात सक्षम करण्यासाठी आत्मनिर्भर भारत उत्तर रायगड टीम प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने आत्मनिर्भर भारत महाराष्ट्र कोकण विभागाचे संयोजक विनय सावंत यांनी पनवेल येथे आत्मनिर्भर भारत कमिटीच्या पदाधिकार्‍यांना कामासंदर्भात  मार्गदर्शन केले. आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड …

Read More »