पटवर्धन काकूंची तब्येत गेले काही दिवस बरी नव्हती. आज पहाटे त्या गेल्या. मला त्यांची पहिली भेट आजही लख्ख आठवतेयं. आमचे लग्न ठरल्यावर मी पहिल्यांदा पनवेलला आले, तेव्हा माझी ओळख करून घ्यायला काकू घरी आल्या होत्या. गोरापान गोल चेहरा, हसरी तरी करारी नजर, बघताक्षणी एक आदरयुक्त जिव्हाळा वाटला. नवीन सुनेसाठी म्हणून …
Read More »सिलिंडरने भरलेल्या ट्रकला आग
अग्निशमन दलाची तत्परता; अनर्थ टळला पनवेल : वार्ताहर पनवेल ओएनजीसीजवळ रविवारी (दि. 11) घरगुती सिलिंडरने भरलेल्या ट्रकच्या ड्रायव्हर केबिनला आग लागली होती. घटनास्थळी सिडको व पनवेल महापालिका अग्नीशमन दलाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी दाखल होत तत्काळ आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. एचपी गॅस सिलिंडरने भरलेला शुभम ट्रान्स्पोर्ट कंपनीचा ट्रक (एमएच …
Read More »कडक निर्बंधांमुळे बाजार समितीत भाज्यांची आवक घटली
नवी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त शासनाने कडक निर्बंध लागू केल्यामुळे शनिवार आणि रविवारी मुंबई बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये, तसेच पनवेल बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक घटलेली पहावयास मिळाली. बाजार समितीमध्ये आवक कमी झाली असली तरी त्याचा परिणाम बाजारभावावर फारसा झाला नव्हता. ग्राहकांना आवश्यक तेवढा पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती व्यापार्यांनी …
Read More »करंजाडे वसाहतीत विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यासह करंजाडे वसाहतीत हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असतानादेखील नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे लक्षात आल्याने नियमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात कठोर कारवाई कारण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार तहसील, ग्रामपंचायत आणि पोलिसांकडून धडक कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यानुसार गेल्या चार दिवसांत 30 जणांवर कारवाई करण्यात आली. कोरोना व्हायरसने संपूर्ण …
Read More »तळोजा कारागृहातील कैद्यांचेही होणार लसीकरण
पनवेल : वार्ताहर राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढले आहे. कोरोना रुग्णाच्या मृत्यूसंख्येतही भर पडली आहे. कोरोना लसीकरणाचे प्रमाणही वाढवले जात आहे, तळोजा कारागृहातील 60 वर्षांवरील आणि 45 वर्षांवरील सहव्याधी 321 कैदी असून त्या कैद्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तळोजा कारागृह प्रशासनाने पनवेल महापालिकेबरोबर चर्चा केली असून लवकरच पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून …
Read More »पनवेल मनपा क्षेत्रात आजपासून लसीकरण कार्यक्रम पुन्हा सुरू
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोविड 19 लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. प्रशासनाकडून लसींचा पुरवठा न झाल्याने काही दिवस लसीकरण कार्यक्रम बंद करण्यात आला होता, मात्र 5000 कोविशिल्ड लसींची उपलब्धता झाली असल्याने सोमवार (दि.12) पासून लसीकरण कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 21 लसीकरण केंद्र …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेने मानधनात वाढ
नवीन डॉक्टर उपलब्ध होऊन रुग्णांची गैरसोय होणार दूर पनवेल ः प्रतिनिधीकोरोनाच्या जागतिक संकटाला वर्ष झाले तरी ती भयावह परिस्थिती अजूनही तशीच आहे. आपल्या स्वकीयांसाठी बेड उपलब्ध करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. शासकीय व महापालिका रुग्णालयांमध्ये उपचार करताना डॉक्टर व कर्मचारी कमी पडत असल्याने या परिस्थितीत बदल करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »ज्येष्ठ नागरिक, महिलांना लुबाडणारे दोघे अटकेत
पनवेल : वार्ताहर बँकेमध्ये नोटा मोजून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करून लोकांना लुबाडणारे तसेच पोलीस असल्याची बतावणी करून, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या थापा मारून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना लुबाडणार्या दोघा सराईत भामट्यांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. जाहीद अली जावेद अली जाफरी (वय 36) आणि काबुल अली नौशाद जाफरी (वय 54) अशी या …
Read More »उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर्स, कर्मचारी पुरवा
नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेकरीता डॉक्टर व इतर कर्मचारी मनुष्यबळ पुरविण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे. भगत यांनी दिलेल्या …
Read More »गरजवंताना मोफत रिक्षा सेवा सुरू
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्ताने, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने लॉकडाऊनमध्ये गरजवंत नागरिकांना घरी जाण्यासाठी मोफत रिक्षा सेवा देण्यात येत आहे. या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. ही सेवा नागरिकांसाठी सुस् झाली असून गरजवंतांनी या सेवेचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper