लाइफ लाइन हॉस्पिटलला तत्काळ ऑक्सिजन पुरवठा पनवेल ः वार्ताहर पनवेल येथील लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्या रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा अचानकपणे कमी झाला होता. अशा वेळी नवी मुंबई गुन्हे शाखेची पोलीस यंत्रणा त्यांच्या मदतीला धावून आली. काही तासांतच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत केल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत. पनवेलच्या लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये …
Read More »पनवेल उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन गळती
त्रिस्तरिय व्यवस्थेमुळे अनर्थ टळला, रुग्ण सुरक्षित पनवेल : प्रतिनिधीयेथील महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि. 27) दुपारी पाइपलाइनच्या व्हॉल्वमधून ऑक्सिजन गळती झाली. ही बाब लगेच लक्षात आल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात प्रशासनाला यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, यामुळे रुग्णांना कोणताही त्रास झाला नसल्याचे समजते.पनवेल उपजिल्हा …
Read More »कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यसंस्काराचा खर्च महापालिकेमार्फत करण्यात यावा : परेश ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोनाबाधित मृत पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च पनवेल महानगरपालिकेमार्फत करण्यात यावा, अशी मागणी व स्मरणपत्र सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिले आहे.या संदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिलेल्या स्मरणपत्रात म्हटले आहे की, सध्या देशभर सर्वत्र कोरोना (कोविड-19) या विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असून, …
Read More »‘रेमडेसिवीर’ तातडीने उपलब्ध करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील विशेषतः पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोविड रुग्णांना उपचारासाठी अत्यावश्यक असणारे रेमडेसिवीर इंजेक्शन सहजरित्या मिळावे याकरिता नेमणूक केलेल्या घाऊक विक्रेत्यांना ते उपलब्ध करून देण्याची तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे अन्न व औषधे प्रशासनमंत्री …
Read More »कोविड सेंटरमधील समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन
उरण ः प्रतिनिधी कोरोनाने देशात व राज्यात हाहाकार माजविला आहे. उरणमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उरणमध्ये असलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने रुग्णांचा आकडा वाढत आहे. या समस्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उरणमधील पत्रकारांनी ई-मेलद्वारे पाठविले आहे. याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना …
Read More »उरणमध्ये कडकडीत बंदला नागरिकांचा प्रतिसाद
उरण ः वार्ताहर कोरोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जारी केलेल्या दोन दिवसांच्या कडकडीत बंदला उरण तालुक्यामधील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे चित्र उरण बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. उरण तालुक्यात शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन ठेवण्यात आला होता. त्यामुळे उरण शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ …
Read More »आधी विकसित भूखंड व नागरी सुविधा द्या ः सुरेश पाटील
उरण : प्रतिनिधी उरण-बेलापूर रेल्वेची पाहणी करण्यासाठी सिडकोचे व रेल्वेचे अधिकारी जासई येथे आले असता, जासई संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, यशवंत घरत, नरेश घरत तसेच ग्रामस्थांनी पाहणी अधिकार्यांना 12 टक्के विकसित भूखंड तसेच गावाच्या नागरी सुविधा आधी द्या. नंतर तुमचे काम सुरू करा, अशी मागणी केली. या वेळी सिडको …
Read More »रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारा जेरबंद; गुन्हे शाखेची कारवाई
पनवेल ः वार्ताहर सध्या देशभरात कोविडच्या उपचारासाठी लागणार्या रेमडेसिवीर या अत्यावश्यक इंजेक्शनचा तुटवडा असून, काही लोक त्याची चढ्या भावाने विक्री करीत आहेत. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष-2 (पनवेल)चे पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे यांना मिळालेल्या माहितीनुसार रेमडेसिवीरचा काळाबाजार करणार्या लॅब टेक्निशियनला गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. काही जण रेमडेसिवीरचा काळाबाजार करीत …
Read More »नवीन पनवेलमध्ये लसीकरण केंद्र वाढवा, खांदा कॉलनीत सुरू करा!
सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तयेथील महानगरपालिका हद्दीतील नवीन पनवेलमध्ये कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र वाढविण्यात यावीत, तसेच खांदा कॉलनीत लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.नवीन पनवेल येथे लसीकरण केंद्र वाढविण्याबाबत प्रभाग समिती ’ड’ …
Read More »तालुकास्तरीय ऑनलाइन स्पर्धांचा निकाल जाहीर
पनवेल ः प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त तालुका स्तरावर मराठी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी चांगू काना ठाकूर मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वेशभूषा, चित्रकला आणि पोस्टर मेकिंग (तक्ता बनवणे) आदी स्पर्धांचा यात समावेश होता. या स्पर्धांचा निकाल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper