मोहोपाडा : प्रतिनिधी दैनिक रामप्रहरमध्ये सोमवार (दि.14)च्या अंकात मोहोपाड्यातील सीसीटीव्ही दुर्लक्ष या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच संबंधितांचे धाबे दणाणले आहे. याअगोदर प्रस्तुत प्रतिनिधी यांनी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करुन परीसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते यावर चर्चा केली होती. ‘रामप्रहर’मध्ये वृत्त प्रसिध्द झालेल्या …
Read More »खारघरमधील मैदाने खुली करा
नगरसेविका नेत्रा पाटील यांची मागणी कळंबोली : प्रतिनिधी केंद्र तसेच राज्य सरकारने कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली सार्वजनिक ठिकाणे खुली केली आहेत. त्यानुसार खारघर शहरातील जागतिक पातळीवर ओळख असेलले सेंट्रल पार्क मैदानदेखील सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्तांकडे केली …
Read More »मोर्बी धरण नजीकच्या जंगलात बिबट्याची कातडी, नखे दोघांकडून हस्तगत
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील मोर्बी धरणाजवळील जंगल परीसरात दोन व्यक्तींकडून बिबट्याची कातडी व नखे हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष गुन्हेशाखेने केली आहे. मोर्बी धरणाजवळील जंगल व डोंगराळ भागातील दोन व्यक्तींकडे बिबट्याची कातडी व नखे असल्याची बातमी मध्यवर्ती कक्ष गुन्हेशाखेच्या पोलीस नाईक सविन टिके यांना …
Read More »कमला देशेकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ग्रामसभेकडून नामंजूर
चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कमला देशेकरच पनवेल : रामप्रहर वृत्त सरपंच कमला एकनाथ देशेकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ग्रामसभेने नामंजूर केल्याने चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुन्हा एकदा भाजपच्या कमला एकनाथ देशेकर याच असणार आहेत. चिंध्रण ग्रामपंचायतीचे सरपंच कमला एकनाथ देशकर यांच्या विरोधात आठ सदस्यांनी अविश्वासाचा ठराव मांडला होता. या अनुषंगाने पनवेलचे नायब …
Read More »वैभव देशमुख इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडकडून गव्हाण ग्रामस्थांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल ः प्रतिनिधीआपण समाजाचे देणेदार लागतो, या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत वैभव देशमुख इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड अर्थात व्हीडीआयपीएल’च्या वतीने गव्हाण ग्रामस्थांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका भेट देण्यात आली.या रुग्णवाहिकेचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 16) करण्यात आले. गव्हाण ग्रामपंचायत …
Read More »उरण नगर परिषद विषय समिती सभापती, सदस्यांची निवड
उरण ः वार्ताहर उरण नगर परिषद विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची निवड उरण नगर परिषद सभागृहात मंगळवारी (दि. 15) मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या वेळी निवडणूक निर्णय तथा पीठासन अधिकारी म्हणून उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी काम पाहिले. स्थायी समिती पदसिद्ध सभापती नगराध्यक्ष सायली म्हात्रे, सार्वजनिक बांधकाम …
Read More »ठेवीदारांप्रति विवेक पाटील कृतज्ञता दाखवतील का?
पनवेल : प्रतिनिधीकर्नाळा बँकेतील ठेवीदारांना पैसे परत करायचे नाहीत म्हणून कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील अद्यापही एटीएसच्या, म. स. सं. अधिनियम 1960चे कलम 88 अन्वये चौकशी करणार्या अधिकार्यांपुढे व इतर प्राधीकरणाच्या अधिकार्यांसमोर लेखी जवाब नोंदवत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विवेक पाटील तेवढी तरी कृतज्ञता दाखवतील का, …
Read More »रायगडात 55 नवे कोरोना पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू
पनवेल ः रायगड जिल्ह्यात सोेमवारी (दि. 14) नव्या 55 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, दोघांचा मृत्यू झाला आहे, तर दिवसभरात 109 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 22 व ग्रामीण 15) तालुक्यातील 37, पेण सात, रोहा चार, अलिबाग तीन, पोलादपूर दोन आणि कर्जत व मुरूड तालुक्यातील …
Read More »विद्यार्थी वाहतूकदारांचे लाक्षणिक उपोषण; भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा; कोरोनामुळे बंद असलेल्या व्यवसायासाठी राज्य शासनाकडे भरपाईची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त कोविडच्या महामारीमुळे सर्व शाळा बंद आहेत. परिणामी विद्यार्थी वाहतूकदारांच्या प्रश्नांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विद्यार्थी वाहतूकदारांनी आक्रमक पवित्रा घेत राज्यभर उपोषण केले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ व विद्यार्थी वाहतूक संस्था, पनवेल यांच्या वतीने सोमवारी (दि. 14) पनवेल तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण …
Read More »कृषी कायद्यांच्या आडून देशात अराजक माजविण्याचा विरोधकांचा प्रयत्न
भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांचा आरोप पनवेल : रामप्रहर वृत्तसुधारित कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे, तसेच या आंदोलनाच्या आडून काही विरोधी शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper