Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

रस्त्यातील झाडाचे ओंडके उचलले; भाजपचे विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील यांनी प्रभागाच्या विकासासाठी सतर्कता दाखवत तातडीने येथील रहिवाशांच्या समस्यांचे निराकरण करून दिले आहे. त्यांच्या प्रभाग क्र. 18 मधील रस्त्यावर अतिवृष्टीमुळे पडलेल्या झाडांचे कटाई केलेले ओंडके उचलण्याचेे काम त्यांनी करून घेतले आहे. त्यामुळे आता रस्त्यावरील वाहतूकीस होणारा अडथळा दूर …

Read More »

जेएनपीटीमध्ये वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्र सुरू

उरण ः वार्ताहर भारताचे प्रमुख कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) पर्यावरणासंबंधी उद्दिष्ट प्राप्ती व हरित बंदर बनण्याच्या दृष्टीने पोर्ट ऑपरेशन सेंटर येथे ’सतत वातावरणीय वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्र’ (सीएएक्यूएमएस) सुरू केले आहे. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, भा. प्र. से.  यांनी या केंद्राचे उद्घाटन केले. या वेळी पोर्टचे …

Read More »

मच्छीमार बांधवांना होतोय नाहक त्रास आमदार महेश बालदी यांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट

उरण ः वार्ताहर मच्छीमार बांधवांना होणार्‍या नाहक त्रासाबद्दल आमदार महेश बालदी यांनी नुकतीच पोलीस उपायुक्त बंदर परिमंडळ-2 (मुंबई)चे गणेश शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली व पत्र दिले. उरण मतदारसंघातील करंजा गावात सुमारे 500 मासेमारी यांत्रिकी नौका असून, या मासेमारी यांत्रिकी नौकांनी पकडलेली मासळी ते मुंबईतील ससून डॉक व भाऊचा …

Read More »

भाजपचे ‘मिशन ग्रामपंचायत’; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत आढावा

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने संघटनात्मक आढावा बैठकीचे आयोजन शनिवारी (दि. 9) करण्यात आले होते. या बैठकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाची भूमिका मांडली. पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर …

Read More »

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिका आक्रमक

बेकायदा व्यवसायांवर धडक कारवाई पनवेल ः वार्ताहर तळोजा वसाहतीमधील पदपथ आणि रस्ते अडवून व्यवसाय करणार्‍या अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई करून पनवेल महापालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांनी कब्जा केलेले पदपथ मोकळे केले आहेत. तळोजामधील पाचनंद हाईट्स, कर्नाळा बँक आणि तळोजा पोलीस चौकीसमोरील चौकात बेकायदा फेरीवाल्यांनी पदपथ आणि रस्ते अडवून व्यवसाय थाटल्याने नागरिकांना पदपथ …

Read More »

पनवेलमधील 400 वर्षीय पुरातन लक्ष्मी नारायण मंदिराचा जीर्णोद्धार

मंदिर उद्यापासून दर्शनासाठी खुले पनवेल : वार्ताहर चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजाचे 400 वर्षीय पुरातन असलेल्या लक्ष्मी नारायण मंदिराचा आता जीर्णोद्धार होत असून त्याच्या अध्यात्मिक रुपामुळे पनवेलची शोभा वाढविणारे देवस्थान ठरणार आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज रोडवर लक्ष्मी नारायण मंदिर असून 400 वर्षीय पुरातन असे मंदिर असल्याने त्याचा जीर्णोद्धार …

Read More »

जेएनपीटीच्या ताफ्यात डेझी स्टार टग बोट समाविष्ट

उरण : वार्ताहर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतातील प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)च्या ताफ्यात डेझी स्टार टग समाविष्ट झाला. जेएनपीटीचे अध्यक्ष भा.प्र.से. संजय सेठी यांनी या नवीन टगचे उद्घाटन केले. या वेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष  भा.रा.से. उन्मेष वाघ, डेजी स्टारचे कर्मचारी, पोलेस्टार मेरीटाइमची टीम, जेएनपीटीचे वरिष्ठ अधिकारी आणि …

Read More »

कामोठ्यात तोतया पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याला लुबाडले

पनवेल : वार्ताहर पोलीस असल्याची बतावणी करून दोघा तोतया पोलिसांनी कामोठे भागात राहणार्‍या वृद्ध दाम्पत्याजवळचे 38 हजार रुपये किमतीचे दागिने लुबाडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कामोठे पोलिसांनी या तोतया पोलिसांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.  या घटनेत फसवणूक झालेल्या दाम्पत्याचे नाव वासुदेव कुंभार (66)  आणि …

Read More »

उरणमध्ये भाजपची प्रचारात आघाडी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी घरोघरी संपर्क उरण : वार्ताहर होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उरण तालुक्यात सहा ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी दिसणार आहे. यंदाची लढत भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी अशी असली तरी सर्वच ठिकाणी भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकद पाहता या केगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. …

Read More »

पनवेलच्या ग्रामीण भागात महाविकासपर्व

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नातून 30 कोटींच्या कामांना महापालिकेची मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्त, प्रतिनिधीपनवेलच्या विकासाचा सातत्याने आलेख उंचावणारे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिका हद्दीतील शहर व ग्रामीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पाठपुराव्यातून …

Read More »