Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

उरण केगावातील तरुणांचा भाजपमध्ये प्रवेश

उरण : वार्ताहर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन उरण तालुक्यातील केगाव गावातील अनेक तरुणांनी तसेच केगाव ग्रामपंचायतमधील माजी उपसरपंच विलास काठे, अरविंद पवार यांनी रविवारी (दि. 13) उरण भाजप कार्यालयात आमदार महेश बालदी यांच्या उपस्थित …

Read More »

चणेरे ग्रामस्थ जनहित याचिका दाखल करणार

एकात्मिक नवनगर वसाहत रद्द प्रकरण पनवेल : प्रतिनिधी मुंबई आणि  नवी मुंबई वरील ताण कमी करण्यासाठी  रायगड जिल्ह्यात सिडकोच्या माध्यमातून एकात्मिक नवनगर वसाहत उभारण्यात येण्याची युती शासनाची अधिसूचना ऑक्टोबर 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारने रद्द केल्याने रायगड जिल्ह्यातील 40 गावांच्या विकासावर त्याचा परिणाम होणार आहे. त्याविरोधात चणेरे ग्रामस्थ सेवा मंडळ …

Read More »

मराठा आंदोलकांची पोलिसांकडून नाकाबंदी

रसायनी : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 14) मराठा समाज बांधव व भगिनी मुंबईतील आझाद मैदानावर एकत्र येऊन आरक्षणासाठी पुढील दिशा ठरविणार आहेत. त्यामुळे पोलिसांकडून मराठा समाज आंदोलकांची नाकाबंदी करण्यात येत आहे. रविवारी (दि. 13) विविध मार्गांवर पोलीस प्रत्येक गाडीची पाहणी करताना दिसून आले. दरम्यान, स्थानिक पोलिसांच्या मदतीने …

Read More »

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कळंबोलीत रक्तदान शिबिर

पनवेल : वार्ताहर                  कळंबोली येथील मायाक्का देवी मंदिरामध्ये दैवत फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे  यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याठिकाणी 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले. दैवत फाउंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अक्षय आंधळे यांच्या संकल्प संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवण्यात आला. या वेळी त्यांना मंडळाचे सल्लागार …

Read More »

भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी निळकंठ घरत

उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील चिर्ले गावचे निळकंठ घरत यांची नुकतीच भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.  त्यांना राज्याचे माजी शिक्षणमंत्री व आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. शेलार यांनी घरत यांचे अभिनंदन केले. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, …

Read More »

मोहोपाड्यातील सीसीटीव्हींकडे दुर्लक्ष

कॅमेरे बंद अवस्थेत आणि गायब मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परीसर असून या परिसरातील मोहोपाडा ही मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. परंतु जबाबदारी घेतलेल्या संबंधितांकडून कॅमेरांची देखभाल करण्यात आली नाही. परिणामी काही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत, तर काही कॅमेरेच गायब करण्यात …

Read More »

खोपटा-कोप्रोली नाल्यात सोडले केमिकल; शेकडो मासे मृत्युमुखी; आजूबाजूची शेती नापीक होण्याचा धोका

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील खोपटा-कोप्रोलीदरम्यान असलेल्या नाल्यात शुक्रवारी पहाटे मोठ्या प्रमाणात घाण आणि उग्र वासाचे केमिकल कुणीतरी सोडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे शेकडो मासे मृत्युमुखी पडले आहेत. या सोडलेल्या केमिकलमुळे आजूबाजूची शेती नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे केमिकल बाजूला असलेल्या ग्लोबीकॉन कंटेनर यार्डमधून त्यांच्या वेस्ट वॉटर …

Read More »

रायगडात 74 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 12) नव्या 74 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात 74 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 32 व ग्रामीण 12) तालुक्यातील 44, पेण नऊ, रोहा आठ, खालापूर, कर्जत, अलिबाग प्रत्येकी तीन, उरण दोन, मुरूड व महाड तालुक्यातील एकाचा समावेश आहे. …

Read More »

भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते उरण येथील फुलमार्केट आणि समाजमंदिर इमारतीचे भूमिपूजन

उरण : वार्ताहरउरण नगर परिषदेच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या फुल मार्केट व आणि समाजमंदिराचे भूमिपूजन शनिवारी (दि. 12) राज्याचे माजी शिक्षणमंत्री व आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व उरणचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.आपल्या भाषणात …

Read More »

स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

पनवेल : भाजपचे ज्येष्ठ नेते व दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त उत्तर रायगड जिल्हा भाजप व पनवेल भाजपच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, कामगार नेते जितेंद्र घरत, रवींद्र कोरडे यांच्यासह …

Read More »