पनवेल : वार्ताहर येथील एएससी (आताचे एमपीएएसी) कॉलेजमधील बीएससी 1990 ग्रुपचे स्नेहसंमेलन जेएनपीटी टाऊनशिपमधील मल्टिपर्पज हॉल येथे नुकतेच झाले. या वेळी आशिष चौबळ यांची कविता, गाणी याचबरोबर या ग्रुपमधील हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांचा पन्नाशीनंतरचे आयुष्य यावर कार्यक्रम झाला. 50 वर्षे पूर्ण झालेल्यांना सन्मानित करून भेटवस्तू देण्यात आल्या. या वर्षात ग्रुपमधील …
Read More »पनवेल मच्छीमार्केटमध्ये ग्राहकांची फसवणूक
पनवेल : प्रतिनिधी पनवेलमधील मच्छीमार्केटमध्ये वजनकाट्यात फेरफार करून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यामुळे मांसाहारी खवय्यांत खळबळ उडाली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत अनेक मच्छीमार्केट आहेत. त्यातील गुणे हॉस्पिटलजवळ असलेल्या मच्छीमार्केटमध्ये वजनावर मच्छी घेणार्या ग्राहकांची विक्रेत्यांकडून फसवणूक केली जाते. वजनकाट्याच्या खालील बाजूला प्लास्टिक पिशवीत दगड किंवा …
Read More »पनवेलमध्ये राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा, विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाच्या करंडकाने गौरविले जाणार
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सहाव्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे …
Read More »उरणमध्ये बिबट्याची दहशत; लोक भयभीत
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिर्ले गाव परिसरात एका बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. बिबट्याच्या धास्तीने जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. चिर्ले गावाच्या उत्तर दिशेला असणार्या जंगलात गेल्या काही महिन्यांपूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले होते. एका व्यक्तीने बिबट्याला पाहिले होते, मात्र त्याच्या बोलण्यावर वनखात्याच्या कर्मचार्यांसह पोलीस यंत्रणेनेही विश्वास …
Read More »पनवेल मनपातर्फे संविधान दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात संविधान दिन मंगळवारी (दि. 26) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक, नगरसेविकांसह प्रमुख वक्ते …
Read More »भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भारताचा संविधान दिन साजरा
पनवेल : येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भारताचा संविधान दिन मंगळवारी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, शहर सरचिटणीस …
Read More »अमरदीप बालविकास फाऊंडेशनचा दीपोत्सव सोहळा
पनवेल : रामप्रहर वृत्त तारा येथील आदिवासी विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित दीपोत्सव 2019 या कार्यक्रमाचे आयोजन अमरदीप बालविकास फाऊंडेशन आणि युसूफ मेहेरअली सेंटर तारा यांच्या वतीने तारा तेथील भानूबेन प्रवीण शहा हायस्कूलच्या हॉलमध्ये रविवारी (दि. 24) करण्यात आले होते. या कार्यक्रमात गीत, संगीत आणि नृत्य यांचा अनोखा संगम असलेला ‘करू …
Read More »सीकेटी महाविद्यालयामध्ये संविधान दिन साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संविधान दिन मंगळवारी (दि. 26) उत्साहात साजरा करण्यात आला, तसेच 26 नोव्हेंबर 2008 रोजी शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या रॅलीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. रॅली नंतर महाविद्यालयामध्ये शहीद …
Read More »खांदा वसाहतीत आणखी एक उद्यान होणार
सभापती संजय भोपी यांचे सिडकोला मागणीचे पत्र पनवेल : प्रतिनिधी खांदा वसाहतीत काही उद्याने आहेत, मात्र ती अपुरी पडत आहेत. येथील रहिवाशांची गैरसोय दूर व्हावी याकरिता सेक्टर 8मधील उद्यानाकरिता राखीव असलेल्या भूखंडाचा विकास करावा, अशी मागणी प्रभाग समितीचे सभापती संजय भोपी यांनी सिडकोकडे केली आहे. त्यांनी याबाबत कार्यकारी अभियंत्याला निवेदन …
Read More »गांजा बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक
पनवेल : वार्ताहर गांजा जवळ बागळल्याप्रकरणी तिघा जणांना तक्का परिसरातून विशेष पथकाने आज ताब्यात घेतले आहे. तक्का परिसरातील काही इसमांजवळ गांजा असल्याची खबर अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाला मिळताच या पथकाचे प्रमुख पोेलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्यांनी सदर ठिकाणी सापळा रचून या तिघा इसमांना ताब्यात घेतले आहे व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper