Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

प्रभाग क्र. 1मधील कार्यकर्त्यांनी फोडले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे फटाके

पनवेलः वार्ताहर 188 पनवेल विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सोमवारी सायंकाळी उशिरा महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी प्रत्येक प्रभागात जाऊन कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची भेट घेतली. शहरातील प्रभाग क्र.18 येथे ते भेट देण्यासाठी आले असता उपस्थित असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी फटाके फोडून निकालाआधीच त्यांच्या विजयाची घोषणा केली. प्रभाग क्र. 10चे नगरसेवक व …

Read More »

रायगडात सुमारे 65.57 टक्के मतदान

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यातील सात मतदारसंघात एकूण सुमारे 65.57 टक्के इतके मतदान झाले. तुरळक प्रकार वगळता मतदानप्रक्रिया शांततेत झाली. सुरुवातीला मतदानाचा वेग कमी होता, परंतु सकाळी 10 नंतर मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडले. त्यामुळे ग्रामीण भागात मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी 7 ते …

Read More »

मतदान यंत्रे निघाली केंद्रांवर; आज मतदान

पनवेल ः विधानसभा निवडणुकीला सोमवारी (दि. 21) मतदान होत आहे. निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. रविवारी मतदान यंत्रे त्या-त्या मतदान केंद्रांवर पोहोचली. मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी खास एसटीच्या बसेस, खाजगी वाहने आरक्षित करण्यात आली होती. (छाया ः लक्ष्मण ठाकूर)

Read More »

शिवसेनेचे अभिजित सिंग कोहली, मंगेश सिसोदे यांचा भाजपत जाहीर प्रवेश

पनवेलमधील शिवसेनेचे अभिजित सिंग कोहली आणि मंगेश सिसोदे यांनी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात शुक्रवारी जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, हाजी सय्यद उपस्थित होते.

Read More »

रितेश बाबर यांचा वाढदिवस

भाजपचे खांदा कॉलनी येथील बूथ अध्यक्ष रितेश बाबर यांचा वाढदिवस रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रितेश बाबर यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख उपस्थित …

Read More »

अमिता चौहान यांची भारतीय जनता पक्षात प्रवेश

कामोठे : अमिता चौहान यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कारभाराला कंटाळून समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More »

मतदारांच्या तक्रारीसाठी ‘गार्हाणे’ मतदार यादी, केंद्राची मिळणार माहिती

पनवेल ः बातमीदार पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी गार्‍हाणे, नियंत्रण व मदत पथक कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. हा कक्ष नागरिकांसाठी फायदेशीर ठरत असून हजारो तक्रारी सोडविण्यात आलेल्या आहेत. जिल्हास्तरावरील निवडणूक हेल्पलाईन कक्षातील कामकाज पाहणे, निवडणुकीसंदर्भात नागरिकांकडून येणार्‍या तक्रारींचे निवारण करणे, इतर आनुषंगिक कामे करणे या कक्षाचे काम आहे. या पथकाचे प्रमुख …

Read More »

सोमाटणे, वावेघरमधील कार्यकर्ते भाजपत

पनवेल ः रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाच्या मनमानी कारभाराला कंटाळून सोमाटणेमधील पुंडलिक दिघे आणि वावेघर येथील हेमंत गायकर, दत्ता गायकर यांनी शुक्रवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, वावेघर ग्रामपंचायत सदस्य अशोक गायकर, …

Read More »

कामोठ्यातील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती सुरूच असल्याचे दिसून येत आहे. कामोठे येथील विविध सोसायटीमधील शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये शुक्रवारी जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. कामोठेमधील ग्रीन स्केप रॉयल सोसायटी, नंदनवन पार्क सोसायटी, इंद्रविहार सोसायटी मानसरोवर …

Read More »

मतदान करा, मतदान करा! पथनाट्यातून जनजागृती

पनवेल : जिमाका भारतीय निर्वाचन आयोग, भारत सरकार सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आउटरीच ब्यूरो, गीत व नाटक विभाग-महाराष्ट्र व गोवा क्षेत्र, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या अंतर्गत 188 पनवेल विधानसभा मतदारसंघात मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पनवेल तालुक्यात रोह्यातील स्वयंसिद्धा सामाजिक विकास …

Read More »