मँचेस्टर ः वृत्तसंस्था भारत आणि विंडीज यांच्यात विश्वचषक स्पर्धेतील सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डवर गुरुवारी (दि. 27) झाला. या सामन्यात 50 षटकांच्या अखेरीस 7 बाद 268 धावा करीत भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 269 धावांचे आव्हान ठेवले. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहली याने फलंदाजी घेतली. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर रोहित शर्मा …
Read More »बुमराहने उलगडले भेदक यॉर्करचे रहस्य
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या दोघांच्या साथीने तो भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचा मोर्चा सांभाळत आहे. अंतिम टप्प्यात फलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून बुमराहच्या यॉर्करची ओळख आहे. याच यॉर्करबद्दल जसप्रित बुमराहने काही रंजक किस्से सांगितले आहेत. ‘मी लहानपणी …
Read More »इंग्लंडचा पराभव ‘त्यांना’ आशेचा किरण
लंडन : वृत्तसंस्था यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रथम प्रवेश करण्याचा मान गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने पटकावला. न्यूझीलंड आणि भारत उंबरठ्यावरच आहेत, परंतु चौथ्या स्थानासाठी आता इंग्लंडसह आणखी तीन संघ आहेत. इंग्लंडचा हा पराभव बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना आशेचा किरण दाखवणारा ठरला आहे. श्रीलंकेपाठोपाठ यजमान इंग्लंड संघाला पारंपरिक प्रतिस्पर्धी …
Read More »ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत
यजमान इंग्लंडवर साकारला दणदणीत विजय लॉडर्स : वृत्तसंस्था पाच वेळा विश्वविजेतेपद मिळवणार्या ऑस्ट्रेलियाने विश्वचषक 2019मध्ये यजमान इंग्लंडवर 64 धावांनी विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. कर्णधार अॅरॉन फिंचच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 285 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बेन स्टोक्सने एकाकी 89 धावांची झुंज दिली, पण जेसन बेहेरनडॉर्फने टिपलेल्या पाच …
Read More »भारताचा सामना आज वेस्ट इंडिजशी
साऊदॅम्प्टन : वृत्तसंस्था विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत घोडदौड करणार्या भारतीय संघाची पुढील साखळी लढत गुरुवारी (दि. 27) वेस्ट इंडिजशी होणार आहे. न्यूूझीलंडविरुद्धच्या निसटत्या पराभवामुळे विंडीजच्या उपांत्य फेरीच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत, परंतु उर्वरित सामन्यांत विजय मिळण्याचा त्यांचा निर्धार आहे. दुसरीकडे, विंडीजला नमवून सेमीफायनलमधील स्थान निश्चित करण्याच्या दृष्टीने टीम इंडिया मैदानात …
Read More »सचिन, तू वर्ल्डकप जिंकलास तो धोनीमुळेच
नेटिझन्सकडून तेंडुलकर ट्रोल! साऊदॅम्पनट ः वृत्तसंस्था भारतीय संघाचे सलामीवर अपयशी ठरले की कोणतं संकट ओढावू शकते, याची प्रचिती अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात आली. विराट कोहली व केदार जाधव वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. मधल्या फळीत विजय शंकर आणि महेंद्रसिंग धोनी यांनी निराश केले. अफगाणिस्तानविरुद्ध भारताला केवळ 224 धावाच करता …
Read More »भुवनेश्वर कुमार फिट; भारताला मोठा दिलासा
मँचेस्टर : वृत्तसंस्था मिशन वर्ल्डकपवर असलेल्या भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी असून जायबंदी झालेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज होत आहे. भुवीने आज नेटमध्ये 30 ते 35 मिनिटे गोलंदाजीचा कसून सराव केला. भुवीने पूर्ण रन अप घेऊन गोलंदाजी केल्याने तो गुरुवारी ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर वेस्टइंडिजविरुद्ध होणार्या …
Read More »अर्जेटिना, उरुग्वे उपांत्यपूर्व फेरीत
पोटरे अॅलॅग्रे ः वृत्तसंस्था अर्जेटिनाच्या लॉटारो मार्टिनेझने सामन्याच्या पूर्वार्धात चौथ्या मिनिटाला पहिला आणि सर्जिओ एग्युरोने 82व्या मिनिटाला दुसरा गोल केल्यामुळे रविवारी अर्जेटिनाने कतारवर 2-0 असा विजय मिळवून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले. ब-गटामधून आधीच उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित करणार्या कोलंबियाने पॅराग्वेवर 1-0 अशी मात केली. अ-गटामध्ये …
Read More »पराभवानंतर आत्महत्या करणार होतो : आर्थर
लंडन ः वृत्तसंस्था आयसीसी विश्वचषकात भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्ताचा संघाला जिव्हारी लागलेल्या पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी आत्महत्या करण्याचे ठरवले होते. स्वत: आर्थर यांनीच ही कबुली दिली आहे. 16 जून रोजी झालेल्या भारत-पाक सामन्यात पाकचा 89 धावांनी पराभव झाला. यानंतर पाक संघाला प्रसारमाध्यमे, प्रशंसक, माजी क्रिकेटपटूंकडून मोठी टीका सहन करावी लागली …
Read More »ही कामगिरी आमच्यासाठी लाजिरवाणी -डुप्लेसिस
लंडनः वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेचे यंदाच्या वर्ल्ड कपमधून असे साखळीत गारद होणे लाजिरवाणे असून, संपूर्ण संघाची कामगिरी ही अतिसामान्य होती, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती दक्षिण आफ्रिकेचा नाराज, निराश कर्णधार फाफ डुप्लेसिसने. हा संघ अक्षरशः क्षीण वाटला, तेव्हा या अपयशाची जबाबदारी प्रत्येकाची आहे अन् त्याने ती स्वीकारावी, असे खडे बोलही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper