पॅरिस : वृत्तसंस्था जगज्जेतेपदानंतर सुमार कामगिरी करणार्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. पाचव्या मानांकित सिंधूने कॅनडाच्या मिशेल ली हिचा सहजपणे अडथळा पार केला. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या सिंधूला गेल्या तीन स्पर्धांमध्ये दुसर्या फेरीचाही अडथळा पार करता आला नव्हता. त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सिंधूने …
Read More »मुंबई शहर कबड्डी निवड चाचणी स्थगित
मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहर कबड्डी असोसिएशनची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा पावसाच्या संततधारेमुळे काही दिवसांकरिता स्थगित करण्यात आली आहे. या स्पर्धेला 4 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरुवात करण्यात येईल. स्पर्धेची नवीन कार्यक्रम पत्रिका लवकरच तयार करण्यात येणार आहे. ती स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना उपलब्ध करून देण्यात येईल. स्पर्धेबाबत अधिक …
Read More »निवृत्तीचा विचार नाही -रोनाल्डो
तुरिन : वृत्तसंस्था वाढते वय यामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या निवृत्तीविषयीच्या जोरदार चर्चा सुरू आहेत, मात्र आपण यापुढेही खेळत राहणार असल्याचे स्पष्ट करीत रोनाल्डोने युव्हेंटस आणि आपल्या चाहत्यांना दिलासा दिला आहे. ‘मी अद्याप निवृत्तीचा विचार केलेला नाही. वाढते वय हे फक्त आकडे आहेत. 34, 35 किंवा 36व्या वर्षी कारकीर्दीचा शेवट होतो, असा …
Read More »प्लेसिस म्हणतो, चूक उमगली!
रांची : वृत्तसंस्था टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत करीत ‘व्हाइट वॉश’ दिला. या दौर्याबाबत आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने मत व्यक्त केले. भारतीय संघ फिरकी गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या चारही विभागांत आमच्या दोन पावले पुढे होता. भारतीय संघाला कोणीही सहजासहजी हरवू …
Read More »प्रामाणिक कर्तव्यपूर्तीची फलप्राप्ती : कोहली
रांची : वृत्तसंस्था समोरील प्रतिस्पर्धी कोणताही असो, परंतु प्रामाणिकपणे प्रत्येक खेळाडूने आपले कर्तव्य निभावल्यामुळेच भारतीय संघ आज यशाची शिखरे सर करीत आहे, अशी प्रतिक्रिया कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच आफ्रिकेला कसोटी मालिकेत 3-0 अशी धूळ चारली. त्यानंतर तो पत्रकार परिषदेत बोलत होता. ‘जोपर्यंत आम्ही प्रामाणिकपणे संघभावनेशी …
Read More »अभिषेक नायर प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त
मुंबई : प्रतिनिधी मुंबई इंडियन्सच्या संघाचे प्रतिनिधित्व केलेला डावखुरा फलंदाज अभिषेक नायर याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 36 वर्षीय नायरने मुंबई रणजी संघात खेळताना उल्लेखनीय कामगिरी केली. टीम इंडियाचेही प्रतिनिधित्व करण्याची त्याला संधी मिळाली होती, तसेच आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सहारा पुणे वॉरियर्स आणि राजस्थान …
Read More »बीसीसीआयमध्ये ‘दादा’पर्व, गांंगुलीने स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था क्रिकेट विश्वातील ‘दादा’ अशी ओळख असलेला सौरव गांगुली याने बुधवारी (दि. 23) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभेतील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विविध राज्य संघटनांनी मुंबईत एक अनौपचारिक बैठक घेतली होती. त्यात अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव …
Read More »सचिन तेंडुलकरला पाहून पोलिंग ऑफिसरने साधली संधी
मुंबई : प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघांमध्ये सोमवारी (दि. 21) मतदान झाले. सर्वसामान्यांपासून राजकीय नेते, बॉलीवूड कलाकार, क्रिकेटपटूंनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही मतदान केले. मतदानासाठी मतदान केंद्रावर आलेल्या सचिनसोबत एक मजेशीर प्रसंग घडला. वांद्रे पश्चिमेतील मतदान केंद्रावर दुपारच्या सुमारास पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनसोबत सचिन पोहोचला …
Read More »नताशाकडून पांड्या ‘क्लीन बोल्ड’?
मुंबई : प्रतिनिधी भारतीय संघातील खेळाडूंच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होत असतात. यातच बॉलीवूड आणि क्रिकेट यांचे संबंध नेहमीच प्रेमाचे असतात. मग यात अनुष्का-विराट यांची जोडी असो किंवा जहीर आणि सागरिका घाटगे असो. आता एका सर्बियन मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्रीच्या प्रेमात भारतीय संघाचा एक स्टार खेळाडू बुडाला आहे. यांच्यातील …
Read More »विजय हजारे क्रिकेट स्पर्धा, पावसामुळे मुंबई संघ बाद
बंगळुरू : वृत्तसंस्था पावसाच्या खेळखंडोब्यामुळे गतविजेत्या मुंबईला विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. यशस्वी जैस्वाल (नाबाद 60) आणि आदित्य तरे (नाबाद 31) या सलामी जोडीच्या भागीदारीमुळे मुंबई विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतानाच पावसामुळे सामना अर्धवटच रद्द करण्यात आला, परंतु साखळीत मुंबईपेक्षा एक जास्त विजय मिळवल्याने छत्तीसगडने उपांत्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper