नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयपीएल-12मधील सलामीच्या सामन्याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) सैन्य दलांना 20 कोटी रुपयांची मदत देण्यात आली. त्यासाठी चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये सशस्त्र सेना दलांना सन्मानित करण्याचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भारतीय लष्कराला 11 कोटी, सीआरपीएफला 7 कोटी आणि वायु दल व नौसेनेला प्रत्येकी …
Read More »श्रीलंकेच्या मलिंगाची निवृत्तीची घोषणा
कोलंबो : वृत्तसंस्था श्रीलंकेचा कर्णधार आणि यॉर्कर किंग गोलंदाज लसिथ मलिंगा याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पुढील वर्षी होणार्या ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तो निवृत्त होणार आहे; तर इंग्लंडमध्ये होणार्या विश्वचषक स्पर्धेनंतर तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेत दुसर्या सामन्यात श्रीलंकेचा संघ …
Read More »मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा; काजल, ओजस, विकास विजेते
मुंबई : प्रतिनिधी मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत काजल कुमारी, ओजस जाधव व विकास धारिया यांनी अनुक्रमे महिला, पुरुष आणि कुमार गटात विजेतेपदाला गवसणी घातली. माटुंगा येथील सेंट्रल रेल्वे वेल्फेअर सभागृहात ही स्पर्धा झाली. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात इंडियन ऑइलच्या काजलने जैन इरिगेशनच्या निलम घोडकेचा 25-6, 25-18 असा धुव्वा उडवत …
Read More »अनफिट लिओनेल मेस्सीची माघार; मोरोक्कोविरुद्धचा सामना खेळणार नाही
ब्यूनस आयर्स : वृत्तसंस्था 2018 विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनंतर लिओनेल मेस्सी पहिल्यांदाच अर्जेटिना संघाकडून खेळला, पण या सामन्यात त्यांना व्हेनेझुएलाकडून 1-3 अशा पराभवाला सामोरे जावे लागले. याच सामन्यात मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे मेस्सीला आता पुढील आठवड्यात मोरोक्कोविरुद्ध होणार्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्याला मुकावे लागणार आहे. रशियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर मेस्सीवर आठ …
Read More »सुरेश रैनाचा विक्रम; पाच हजार धावांचा टप्पा ओलांडला
चेन्नई : वृत्तसंस्था चेन्नई सुपरकिंग्जच्या सुरेश रैनाने पहिल्याच सामन्यात आपल्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएलच्या इतिहासात पाच हजार धावांचा टप्पा ओलांडणारा रैना पहिला फलंदाज ठरला आहे. बंगळुरुविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने या अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. पहिल्या सामन्यात फलंदाजीला येईपर्यंत रैनाच्या नावावर आयपीएलमध्ये 4985 धावा जमा होत्या. पाच …
Read More »चेन्नईकडून बंगळुरूचा धुव्वा; विराटच्या संघावर नकोशा विक्रमाची नोंद
चेन्नई : वृत्तसंस्था आयपीएलच्या बाराव्या हंगामात गतविजेच्या चेन्नई सुपकिंग्ज संघाने बाराव्या हंगामाची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्याच सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजीसमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ कोलमडला आणि मोठ्या फरकाने त्यांचा पराभव झाला. बंगळुरुने दिलेले 71 धावांचे माफक आव्हान चेन्नईच्या फलंदाजांनी सात गडी राखून सहज पूर्ण केले. याच सामन्यात बंगळुरुच्या नावावर काही …
Read More »‘तो’ व्हिडीओ बुमरावर झाला बुमरँग
मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यांपासून आपल्या कृत्यांमुळे क्रिकेटपटूंवर टीका होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात अश्लील वक्तव्य केले. त्यामुळे ते दोघेही टीकेचे धनी ठरले होते. त्यांच्यानंतर आता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. सध्या आयपीएलचा ज्वर …
Read More »कबड्डीमहर्षी खंडूमामा बांदल यांचे निधन
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील टाकवे गावचे रहिवासी कबड्डीमहर्षी खंडूमामा महादू बांदल यांचे 90व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. खंडूमामांनी मुंबई महापालिकेत नोकरी करता-करता कबड्डी खेळ जपला. त्यांनी कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांच्याबरोबर लालबागच्या गणेश मित्र मंडळातर्फे कबड्डी …
Read More »कसोटी क्रिकेटपटूच्यांही पोषाखावर येणार नाव, क्रमांक
दुबई : वृत्तसंस्था कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षकांचा ओढा वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर महत्त्वपूर्ण बदलाला मान्यता दिली आहे. यापुढे वन डे आणि टी-20 क्रिकेटप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्येही खेळाडूंच्या पोशाखामागे त्यांचे नाव व क्रमांक लिहिला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात सुरू होणार्या अॅशेस मालिकेपासून हा बदल केला जाणार आहे. 1877 साली ऑस्ट्रेलिया …
Read More »आशियाई विजेत्या जपानला नमवले
इपोह : वृत्तसंस्था भारतीय पुरुष हॉकी संघाने वर्ल्डकप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीचा इतिहास मागे सोडून नव्या दमाने सुरुवात केली आहे. त्यांनी सुलतान अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात आशियाई स्पर्धेतील विजेत्या जपानवर 2-0 असा विजय मिळवला. वरुण कुमारने 24व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना भारताला आघाडी मिळवून दिली आणि त्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper