Breaking News

क्रीडा

उरणमधील गोशीन रियू कराटेचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

उरण : बातमीदार पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये 10 ते 12 जूनदरम्यान राज्यस्तरीय कराटे अजिंक्यपद स्पर्धा झाल्या. त्यामध्ये उरणमधील गोशीन रियू कराटेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विविध वजनी गटामध्ये रोहित शरद घरत सिल्व्हर मेडल, शुभम परशुराम म्हात्रे ब्रॉन्झ मेडल, …

Read More »

टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषने दुहेरीत जिंकले सुवर्णपदक

पंचकुला : वृत्तसंस्था खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष आणि दिया चितळे या जोडीने हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना अंतिम सामन्यात हरवून सुवर्णपदक पटकाविले. त्यांनी 14-12, 11-09, 11-6 असे तीन सेट जिंकून ही ‘सुवर्ण’ कामगिरी केली. पनवेल तालुक्यातील खारघर येथे राहणार्‍या स्वस्तिकाने लहानपणापासून …

Read More »

अलिबागेतील बुद्धिबळपटू साई बलकवडेचा सत्कार

अलिबाग : प्रतिनिधी पुणे येथे झालेल्या ओपन बुद्धिबळ स्पर्धेत अलिबागमधील आरसीएफ शाळेतील 15 वर्षीय विद्यार्थी साई दीपक बलकवडे याने द्वितीय क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते साईचा सत्कार केला. या वेळी सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, प्राथमिक शिक्षण अधिकारी …

Read More »

उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराची सांगता

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमाने मल्लविद्या कुस्ती संकुल पोलीस मुख्यालय कळंबोली येथे मोफत उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराची सांगता जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड रवींद्र नाईक यांच्या उपस्थितीत झाली. या कार्यक्रमासाठी रेडक्लीपच्या प्राचार्य सौ. अग्रवाल, सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार नाळे, शिवछत्रपती पुरस्कार …

Read More »

पनवेलमध्ये सायक्लोथॉनला प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर केंद्र सरकारच्या पुढाकाराने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आयकर विभाग पनवेल या ठिकाणी सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आयकर विभागातील सुमारे 100 अधिकारी आणि कर्मचारी तसेच सनदी लेखापाल आणि रायगड विभागातील कर सल्लागार सहभागी झाले होते. पनवेल परिक्षेत्र अतिरिक्त आयकर आयुक्त अभिषेक सिंग यांनी कार्यक्रमाची …

Read More »

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा ;पेणच्या आर्यन पाटीलला रौप्यपदक

पेण : रामप्रहर वृत्त हरियाणातील पंचकुला येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पेण तालुक्यातील रावे येथील खेळाडू आर्यन अरुण पाटील याने उंच उडीत रौप्यपदक पटकाविले. याबद्दल त्याचे अभिनंदन व कौतुक होत आहे. अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मंगळवारी (दि. 8) पदकांची लयलूट केली. यात रायगडच्या आर्यन पाटीलने 2.04 मीटर उंच …

Read More »

महिला रायगड प्रीमियर लीगच्या सराव सामन्यांमध्ये खेळाडूंची चमक

कर्जत : बातमीदार महिला रायगड प्रीमियर लीग होऊ घातली आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी रायगड जिल्ह्यातील होतकरू महिला खेळाडूंना प्रत्यक्ष सामना खेळण्याचा अनुभव आणि खेळाचे विविध पैलू शिकण्याची संधी मिळावी तसेच प्रथितयश खेळाडूंचा खेळ जवळून अनुभवता यावा यासाठी रायगड प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे दोन सराव सामने आयोजित करण्यात आले. बेलापूर येथील …

Read More »

रायगड संघाचा नंदुरबार संघावर दणदणीत विजय

नैतिक सोळंकीचे सामन्यात 13 बळी; स्मित पाटीलच्या आक्रमक 111 धावा पनवेल : वार्ताहर   महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुणे येथे सुरू असलेल्या, 16 वर्षांखालील मुलांच्या आमंत्रितांच्या स्पर्धेत रायगड संघाने नंदुरबार संघावर एक डाव आणि 194 धावांनी दणदणीत विजय संपादन केला. नाणेफेक जिंकून नंदुरबार संघाने फलंदाजी स्वीकारली, परंतु त्यांचा संपूर्ण डाव 56 …

Read More »

धाटाव विभागीय कबड्डी लीगमध्ये अनंता इंटरप्रायझेस संघ विजेता

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील धाटाव विभागाच्या वतीने प्रथमच विभागीय कबड्डी लीग नुकतीच बोरघर येथे आयोजित करण्यात आली होती.  या स्पर्धेत अनंता इंटरप्रायझेस संघाने सोनेश्वर निवी या संघावर सहज विजय मिळवून विजेतेपद पटकाविले. स्पर्धा साखळी पद्धतीत खेळविण्यात आली. या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये अनंता इंटरप्रायझेसच्या खेळाडूंनी …

Read More »

राज्यस्तरीय पिंच्याक सिलेट स्पर्धेत पनवेल परिसरातील खेळाडूंचे सुयश

पनवेल ः रामप्रहर वृत्त नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पिंच्याक सिलेट असोसिएशन चषक स्पर्धेत पनवेल परिसरातील खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. पिंच्याक सिलेट असोसिएशन ऑफ पनवेलचे अध्यक्ष निलेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी एक सुवर्ण, तीन रौप्य आणि नऊ रौप्यपदके जिंकली. यामध्ये सोहम सावंतने सुवर्ण, वरद केणी, राजेंद्र कन्हेरे, …

Read More »