माणगाव ः प्रतिनिधी येथील सुपर सिलेक्टर्स संघाने आयोजित केलेल्या मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत थळ (अलिबाग) संघाने झुंजार खेळाचे प्रदर्शन दाखवत चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. त्यांनी अंतिम सामन्यात अप्पर तुडील संघाचा दारुण पराभव करीत विजेतेपद पटकाविले. माणगावजवळील निळगुण फाटा येथील मैदानावर झालेल्या या स्पर्धेत ए वन निजामपूर संघाने तृतीय क्रमांक …
Read More »महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकप; भारत-पाकिस्तान 6 मार्चला भिडणार
दुबई ः वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणार्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये भारतीय संघाचा पहिला सामना 6 मार्च रोजी कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. विश्वचषक स्पर्धेची सुरुवात न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 4 मार्च रोजी होणार्या सामन्याने होईल. 31 दिवस चालणार्या …
Read More »खेलो इंडिया अंतर्गत ‘सीकेटी’त कुस्ती सामने
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात जिमखाना समितीच्या वतीने मंगळवारी (दि.14) खेलो इंडिया अंतर-विद्यापीठीय कुस्तीचे निवड सामने आयोजित करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद लाभला. या सामन्यांसाठी मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मोहन अमृले प्रमुख पाहुणे म्हणून …
Read More »राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा; पुण्याला दुहेरी मुकुट
सोलापूर ः प्रतिनिधी महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर अमॅचूर खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने 57 वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा वेळापूर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे झाली. या स्पर्धेत पुण्याने दुहेरी मुकुट मिळवला. यापूर्वी 1995-96 साली कुळगाव (ठाणे) येथे झालेल्या 34 व्या पुरुष- महिला राज्य …
Read More »जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन
पनवेल ः रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या वतीने खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यांच्या कौशल्यात आणखी भर पडावी यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने 10 ते 13 डिसेंबरदरम्यान जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले …
Read More »टीम इंडियाचा ‘विराट’ विजय
द्रविडच्या मार्गदर्शनाखाली मुंबई कसोटीत न्यूझीलंडवर मात मुंबई ः प्रतिनिधी मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगलेल्या कसोटी मालिकेच्या दुसर्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला तब्बल 372 धावांनी नमवले. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडला दुसर्या डावात 167 धावांत गुंडाळले आणि कसोटीतील सर्वांत मोठा विजय नावावर केला. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली विराट कोहलीचा हा पहिला विजय ठरला. न्यूझीलंडला …
Read More »ट्वेन्टी-20 मालिकेतील निर्भेळ यशात गोलंदाजीचे योगदान महत्त्वाचे -रोहित; अश्विनचे खास कौतुक
कोलकाता ः वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेतील 3-0 अशा निर्भेळ यशात गोलंदाजीचे योगदान महत्त्वाचे होते, असे भारताचा नवनिर्वाचित कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे. ट्वेन्टी-20 सामन्यातील मधल्या षटकांत संघाला बळींची नितांत आवश्यकता असते तेव्हा रविचंद्रन अश्विन हा नेहमीच कर्णधाराचा हुकमी पर्याय असतो, अशा शब्दांत कर्णधार रोहितने त्याची प्रशंसा केली. ईडन गार्डन्सवर भारताने …
Read More »‘यलो ब्रिगेड’ जोमात; तामिळनाडूच्या विजयानंतर अनोखी हॅट्ट्रिक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था येथील स्टेडियमवर रंगलेल्या सैयद मुश्ताक अली स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूने विक्रमी विजेतेपद मिळवले. अखेरच्या चेंडूवर तामिळनाडूला 5 धावांची आवश्यकता असताना प्रतिक जैनच्या चेंडूवर शाहरुख खानने उत्तुंग षटकार लगावत संघासाठी विजयश्री खेचून आणली. तामिळनाडूच्या विजयामुळे एक अजब असा योगायोग पाहायला मिळाला. क्रिकेटच्या क्षेत्रात यंदा काही मोजक्या मोठ्या …
Read More »टीम इंडियाला मोठा धक्का; न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतून राहुल ‘आऊट’
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्ध होणार्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला असून स्टार फलंदाज लोकेश राहुल हा दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाला. त्याच्या जागी मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला संघात बदली खेळाडू म्हणून समाविष्ट करण्यात आल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसी आय) ट्विट करून दिली. भारतीय संघाने न्यूझीलंड विरूद्धची …
Read More »अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने कुस्तीच्या खुल्या दंगली (स्पर्धा) आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सोमवारी (दि. 22) दुपारी 1.30 वाजता बेलवली-वारदोली येथील माऊली मैदानात होणार आहे. स्पर्धेचे आयोजक भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील आणि बेलवली अध्यक्ष सतीश …
Read More »