टोकियो ः वृत्तसंस्था भारताचा 91 किलो वजनी गटात खेळणारा बॉक्सर सतीश कुमार टोकियो ऑलिम्पिकमधून बाहेर पडला आहे. उपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानचा गतविजेता आणि विश्वविजेता बखोदिर जलोलोवने सतीशला हरविले. चुरशीच्या झालेल्या या लढतीत तिन्ही फेर्यांत जलोलोव प्रभावी ठरला. उझबेकिस्तानच्या बॉक्सरने सतीशचा 5-0 असा पराभव करून आपले पदक निश्चित केले. तत्पूर्वी त्याने आपला …
Read More »पूरग्रस्त महाडमध्ये साथरोगांचे संकट; लेप्टो, कोरोना, डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा सतर्क
अलिबाग ः प्रतिनिधी पूरग्रस्त महाडमध्ये आता नवे संकट उभे ठाकले आहे. पुरानंतर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये 19 जणांना लेप्टो स्पायरेसीस, तर तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचबराबेर डेंग्यू आणि मलेरियाचे प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत. ही संख्या वाढण्याची भीती असल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महाड आणि पोलादपूर …
Read More »सिंधूचा सेमीफायनलमध्ये पराभव
टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल करणारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा प्रवास सेमीफायनलमध्ये संपुष्टात आला आहे. चीनी तैपेईच्या ताई जू यिंगकडून सिंधूला 18-21, 12-21 अशा सरळ सेटमध्ये मात पत्करावी लागली. रिओ ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती सिंधू उपांत्य फेरीत कठीण आव्हान सादर करू शकली नाही. पहिल्या गेममध्ये ती …
Read More »भारताची थाळीफेकपटू कमलप्रीत अंतिम फेरीत
टोकियो ः वृत्तसंस्था भारताची नॅशनल रेकॉर्ड ब्रेकर कमलप्रीत कौरने आपल्या कामगिरीतील सातत्य आणि लौकिकाला साजेसा खेळ करीत झोकात टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भारताला अजून एका पदकाची मोठी आशा निर्माण झाली आहे, मात्र भारतासाठी दुसरी आशा ठरलेली सीमा पुनिया सोळाव्या स्थानावर राहिल्यामुळे अंतिम फेरी गाठू शकलेली नाही. …
Read More »भारतीय हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल ; वंदना कटारियाची विक्रमी हॅट्ट्रिक
टोकियो ः वृत्तसंस्था भारतीय महिला हॉकी संघाने पूल ‘ए’च्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 4-3 असा पराभव केला. भारतासाठी वंदना कटारियाने तीन आणि नेहा गोयलने एक गोल केला. वंदना ही ऑलिम्पिक सामन्यात हॅट्ट्रिक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. दरम्यान, भारतीय हॉकी संघ पुढील फेरीत जाण्याच्या आशा अजूनही जिवंत आहेत. …
Read More »लवलिनाचा पदकासाठी विजयी ठोसा
टोकियो : वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमधील सातवा दिवस भारतासाठी आनंदी ठरला. बॉक्सिंगमध्ये 69 किलो वजनी गटात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या लवलिना बोरगोहेनने तैपईच्या निएन चिन चेनचा पराभव करत देशाचे दुसरे पदक निश्चित केले. लवलिना बोरगोहेनने निएन चिन चेनवर 4-1 असा विजय मिळवला. ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक ठरले आहे. याआधी …
Read More »जपानच्या खेळाडूला नमवून पीव्ही सिंधूची उपान्त्य फेरीत धडक
टोकियो : वृत्तसंस्था 2018च्या रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकेन यामागुचीचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात सिंधूने यामागुचीवर संपूर्ण दबाव ठेवला. सिंधूच्या आक्रमकतेपुढे ती टिकू शकली नाही. सिंधूने यामागुचीवर 21-13, 22-20 असा विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये सिंधूने 11-7 अशी आघाडी …
Read More »भारतीय नेमबाजांकडून निराशा; एकही पदक नाही
टोकियो : वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमध्ये ज्या नेमबाजीतून सर्वाधिक पदक मिळण्याची आशा होती तेथे भारताला एकही पदक अद्याप मिळवता आले नाही. ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताच्या पुरुष आणि महिला नेमबाजांना मोठे अपयश आले. आज झालेल्या महिलांच्या 25 मीटर पिस्तूल पात्रता फेरीत देखील भारताला मोठी निराशा हाती आली. महिलांच्या 25 मीटर पिस्तूल पात्रता …
Read More »दीपिका कुमारी पराभूत; आव्हान संपुष्टात
टोकियो : वृत्तसंस्था भारताची स्टार महिला तिरंदाज दीपिका कुमारीला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाची सर्वाधिक अपेक्षा दीपिकाकडून व्यक्त केली जात होती. पण ही अपेक्षा पूर्ण करण्यात ती अपयशी ठरली. जागतिक क्रमवारीत 9 व्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या अॅन सॅनने सलग 3 सेटमध्ये दीपिकाचा पराभव केला. …
Read More »भारतीय महिला हॉकी संघाने आयर्लंडला नमविले
टोकियो : वृत्तसंस्था भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमधील आपले आव्हान कायम ठेवले आहे. पूल-ए मधील सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडविरुद्ध सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना गोल नोंदवत बाजी मारली आणि 1-0ने बाजी मारत अंतिम-8 मध्ये स्थान पक्के केले. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध गोल करण्याचा हरप्रकारे प्रयत्न करत राहिले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper