Breaking News

क्रीडा

नवी मुंबईची सागरकन्या मंत्रा कुर्‍हेचा धरमतर ते गेटवे पोहण्याचा नवा विक्रम

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील रहिवासी व वाशीच्या फादर आग्नेल हायस्कूलची इयत्ता सातवीत शिकणारी 12 वर्षीय विद्यार्थिनी मंत्रा मंगेश कुर्‍हे या सागरकन्येने धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे 38 किमीचे सागरी अंतर अवघ्या सात तास आणि 54 मिनिटांत पार करून पोहण्यातील एक नवा विक्रम केला आहे. याआधी …

Read More »

माणगाव क्रिकेट संघ प्रथम

माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील श्री समर्थ ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मोर्बा विभाग यांच्या सौजन्याने सचिन इलेव्हन क्रिकेट क्लब निळगुणच्या वतीने कै. सचिन गुगळे यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराणा प्रताप नगर माणगाव संघाने अंतिम सामन्यात खालची वाडी डोंगरोली संघाचा पराभव करीत प्रथम क्रमांक पटकाविला. …

Read More »

खोपोलीतील क्रिकेट स्पर्धेत रायगड राजे संघ विजेता

खोपोली : प्रतिनिधी खोपोली क्रिकेट असोसिएशन आयोजित टी-20 लेदर बॉल स्पर्धेत रायगड राजे संघाने विजेतेपद पटकाविले. अंतिम सामना रायगड राजे व मुंडे स्पोर्ट यांच्यात अटीतटीचा झाला. यामध्ये शेवटच्या क्षणाला रायगड राजेने बाजी मारली. डीपी रोड चिंचोली येथील भव्य पटांगणावर झालेल्या टी-20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नामांकित 16 संघांनी …

Read More »

आजपासून श्रीलंकेविरुद्ध दुसरी कसोटी; टीम इंडियातच चुरस

बंगळुरू ः वृत्तसंस्था भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसाटी मालिकेमधील दुसरा व शेवटचा सामना शनिवार (दि. 12)पासून बंगळुरू येथे खेळला जाणार आहे. गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात होणार्‍या या दुसर्‍या कसोटीसाठी भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यात संघातील स्थानासाठी चुरस असून ऑफ स्पिनर जयंत यादवला वगळण्यात येण्याची शक्यता …

Read More »

आयसीसी महिला वर्ल्डकप 2022; भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

माउंट माउंगानुई : वृत्तसंस्था आयसीसी महिला वर्ल्डकप 2022च्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 107 धावांनी पराभव करून धमाकेदार सुरूवात केली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर विजयासाठी 245 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारतीय गोलंदाजीसमोर पाकिस्तानची डाळ शिजली नाही. गेल्या वर्षी दुबईत झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा पाकिस्तानने प्रथमच पराभव …

Read More »

शोतोकान कराटे असोसिएशनच्या खेळाडूंना रायगड भूषण पुरस्कार

अलिबाग : रामप्रहर वृत्त अलिबाग येथे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या चार खेळाडूंना विविध क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रविवारी (दि. 6) रायगड जिल्ह्यातील मानाचा रायगड भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया ही संस्था गेल्या 30 वर्षांपासून डॉ. मंदार पनवेलकरयांच्या अध्यक्षतेखाली मार्शल आर्टस् मधील विविध …

Read More »

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे निधन

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या 52व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. थायलंडमधील कोह सामुई येथे वॉर्नचा मृत्यू झाला. दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हा दुसरा धक्का आहे. रॉड मार्शच यांचेही गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी निधन झाले होते. शेन वॉर्नने क्रिकेटपटू मार्शच्या …

Read More »

खारघरमध्ये नगरसेविका चषक क्रिकेट स्पर्धा रंगली; मुरबी स्पोर्ट्स संघाला विजेतेपद

खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या खारघरमधील नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने सेंट्रल पार्क मेट्रो स्टेशनजवळच्या मैदानावर टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुरबी स्पोर्ट्स संघाने विजेतेपद पटकाविले. गोल्डन ईगल अ संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग नोंदवला …

Read More »

यश धुलचा डबल धमाका; लागोपाठ शतकांसह नोंदवला नवा विक्रम

गुवाहाटी ः वृत्तसंस्था भारताच्या अंडर-19 विश्वविजेत्या संघाचा कर्णधार यश धुलने यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्ये धमाकेदार कामगिरी सुरू ठेवली आहे. पदार्पणाच्या सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा धुल हा दिल्लीचा पहिला आणि एकूण तिसरा फलंदाज ठरला आहे. यशने गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या रणजी ट्रॉफी सामन्याच्या चौथ्या दिवशी तामिळनाडूविरुद्ध दुसर्‍या डावात नाबाद 113 धावांची …

Read More »

प्रो कबड्डी लीग : यूपी वि. पुणे आज पहिली एलिमिनेटर लढत

बंगळुरू ः वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगमध्ये सोमवारी (दि. 21) यूपी योद्धा आणि पुणेरी पलटण या दोन संघांमध्ये पहिली एलिमिनेटर लढत रंगणार आहे. यांच्यातील विजेता उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात पाटणा पायरेट्सविरुद्ध भिडेल. प्रो कबड्डी लीगच्या अखेरच्या साखळी लढतीत पाटणा पायरेट्सकडून 30-27 अशा पराभवामुळे हरियाणा स्टीलर्सचे आव्हान संपुष्टात आले. याचा फायदा पुणेरी …

Read More »