पनवेल ः प्रतिनिधी एक एक दिवसाने आपण वाढतोय. या वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक आपल्याला काही आणखी तरी अनुभवावे ही जी भावना आहे, ती फार कमी जणांमध्ये असते. त्याच पद्धतीने जगलेल्या प्रत्येक क्षणात परमेश्वराची व समाजाबद्दल कृतज्ञतेची भावना असावी व त्या भावनेपोटी समाजाला देण्याचा प्रयत्न करावा करणारी फार कमी माणसे असतात. अॅड. …
Read More »पनवेलकरांच्या सेवेसाठी आधुनिक यंत्रणा
गांधी हॉस्पिटलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल ः वार्ताहर पनवेलसह नवी मुंबईतील पहिली अजूरिऑन फिलिप्स कॅथलॅब, फिलिप्स डिजीटल एमआरआय व तोशीबा कॅनॉन 32 स्लाईस सीटी स्कॅन मशिन पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे. त्याचे उद्घाटन सोमवारी (दि. 11) पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व …
Read More »गरीब जनतेला केंद्र सरकारच्या मोफत धान्यवाटपाचा आधार
30 सप्टेंबरपर्यंत मिळणार धान्य पनवेल ः वार्ताहर पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेत मोफत तांदूळ व गव्हाचे वाटप करण्यात येते. सदर योजनेची मुदत मार्च 2022 मध्ये संपणार होती, परंतु त्याला केंद्र सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता गरीब लाभार्थ्यांना सप्टेंबर 2022 …
Read More »मानपाडा पोलिसांकडून अमली पदार्थांचा साठा जप्त
एक लाख 87 हजारांच्या गांजासह तिघे अटकेत पनवेल ः वार्ताहर मानपाडा पोलीस ठाणेचे हद्दीत अवैधरित्या अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी धडक कारवाई करीत एक लाख 87 हजार 310 रुपयांचा गांजा, रोख रक्कम व विक्रीसाठी वापरणयात येणारे वाहन हस्तगत केले आहे. त्याचपमाणे तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. …
Read More »पनवेल-उरण मार्गावरील खड्डे अखरे भरले
उरण : रामप्रहर वृत्त उरण-पनवेल मार्गावरील बोकडविरा ते जेएनपीटी कामगार वसाहतीपर्यंत पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून केली जात होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यात बोकडविरा, महाजनको कामगार वसाहत, फुंडे स्थानक, फुंडे महाविद्यालय, जेएनपीटी कामगार …
Read More »पनवेलचे प्रशासकीय भवन रखडले
राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होईना पनवेल ः वार्ताहर शासकीय कामे एकाच ठिकाणी व्हावी या उद्देशाने पनवेल शहरात उभारलेले प्रशासकीय भवनाचे काम निधीअभावी रखडले आहे. वारंवार येणारे तांत्रिक अडथळे, शासकीय पातळीवर निधी उपलब्ध होत नसल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली इमारत धूळखात पडली आहे. ही इमारत व्हावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »शिवसेनेचे बेगडी हिंदुत्व
एकेकाळी कडव्या हिंदुत्वासाठी ओळखल्या जाणार्या शिवसेनेने महाराष्ट्राची सत्ता आणि मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ धरली. सोबतच आपल्या मूळ भूमिकेला सोयीस्कर बगल दिली. राजकारणात वेगवेगळ्या युत्या-आघाड्या होत असतात, मात्र त्यासाठी थेट विचारधारेला तिलांजली देणे कुणालाही न पटण्यासारखे आहे. एकेकाळी जाज्वल्य हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी राज्यातील महत्त्वाची पक्ष संघटना म्हणून शिवसेना …
Read More »स्वामित्व योजनेंतर्गत पनवेलमध्ये गावठाणांचे ड्रोन सर्वेक्षण
पनवेल : रामप्रहर वृत्त शासन परिपत्रकान्वये गावठाण जमाबंदी प्रकल्प योजनेत भारतीय सर्वेक्षण विभाग (सर्वे ऑफ इंडिया) मार्फत ड्रोनद्वारे गावठाणातील मिळकतींचे सर्वेक्षण करुन जीआयएस प्रणालीवर आधारीत मालमत्ता/मिळकत पत्रक तयार करण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यानुसार पनवेल तालुक्यातील स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोन सर्वेक्षणाकरिता गावठाणातील मिळकतींना चुना मार्किंगच्या कामास रविवार (दि. 10)पासून सुरुवात करण्यात …
Read More »स्वमग्न मुलांसाठी विशेष शिबिर
पनवेल : प्रतिनिधी जागतिक स्वमग्नता जागृती दिनाच्या निमित्ताने नुकतेच पनवेल महापालिका, महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय आणि शनय ऑटिझम रिसोर्स सेंटरच्या वतीने स्वमग्न मुलांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात 25 मुलांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आली. या वेळी पनवेल महापालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.आनंद गोसावी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. …
Read More »खारघरमध्ये भटके विमुक्त आघाडीची बैठक
खारघर : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रेरणेतून व भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनातून शुक्रवारी (दि. 8) खारघर येथे भाजपच्या भटके विमुक्त आघाडीची बैठक झाली. भाजप या राष्ट्रीय पक्षाची वेगवेगळ्या छोट्या छोट्या समूहाच्या प्रति असलेल्या ध्येय धोरण अन राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्यासाठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper