दुबई ः वृत्तसंस्था टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-12 टप्प्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर सात गडी राखून विजय मिळविला. मागील काही कालावधीपासून टीका होत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला अखेर सूर गवसला आणि त्याने लंकेविरुद्ध दमदार अर्धशतकी खेळी केली. दुबईच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पॉवरप्लेमध्ये चरिथ असलंका, कुसल परेरा …
Read More »बीटकॉईनच्या किंमतीचा विक्रम, पण जे टिकतील त्यांच्यासाठीच!
बीटकॉईनचा अवतार जगात येऊन आता एक तप पूर्ण झाले आहे. सरकारचा पाठिंबा नसलेले हे आभासी चलन कसे चालेल, त्याच्यावर लोक कसा विश्वास ठेवतील, असे अनेकांना वाटत होते. त्यामुळे त्यात भाग घेणार्यांची संख्या या काळात कमीच राहिली. पण ऑक्टोबरमध्ये काही घटना अशा घडत आहेत की बीटकॉईन किंवा क्रीप्टोकरन्सी नावाने माहिती झालेली …
Read More »पनवेल महापालिका हद्दीत कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले
पनवेल : वार्ताहर कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यात पनवेल महानगरपालिकेला यश आले आहे. पालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्क्यांवर पोहचले आहेत. महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेला कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. सध्याच्या घडीला पालिका क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी …
Read More »एसएससी बोर्डात पनवेल तालुक्यातून गणेश दुबे प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्रजी माध्यम स्कूल अॅण्ड कॉलेजचा गणेश विनोदकुमार दुबे हा विद्यार्थी इयत्ता दहावीमध्ये तालुक्यामधून प्रथम आलेला आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनी दहावीमध्ये शाळेतून प्रथम आल्याबद्दल गणेशचा सत्कार भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला होता. …
Read More »पोलीस खात्यात नोकरी मिळवून देतो सांगून फसवणूक
पनवेल : वार्ताहर सीपी ऑफिसमध्ये नोकरीस असल्याचे सांगून पोलीस खात्यात नोकरी मिळवून देतो असे सांगून 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कामोठे येथे घडला आहे. सेक्टर 14, कामोठे येथे सुहासिनी घोरपडे या राहतात. त्यांच्या इमारतीमध्ये भाडेकरू म्हणून राहणारा व्यक्ती मिलिंद कदम हा त्यांच्याकडे आला व तो सीपी ऑफिसमध्ये नोकरीला असल्याचे …
Read More »मेट्रो सेंटर कार्यालयाला पावसाचा फटका
पाणी घुसल्याने कागदपत्रे, फाईल्स भिजल्या पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल येथील सिडको इमारतीतील असलेल्या मेट्रो सेंटरला गेल्या तीन दिवस सुरू असलेल्या पावसाचा फटका बसला. इमारतीतील स्लॅबमधून पावसाचे पाणी जोरात कार्यालयात पडल्याने सर्व ठिकाणी पाणीच पाणी साचले होते. या वेळी या कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे, फाईल भिजल्या. गेल्या पाच ते सहा दिवस …
Read More »आणखी किती बळी हवेत?
रोज मरे त्याला कोण रडे ही म्हण सर्वसामान्यांच्या जणु पाचवीला पुजली आहे. विशेषत: पावसाळ्यात ठिकठिकाणी नित्य नेमे ओढवणार्या महासंकटांना जनता आता सरावली आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. कोरोना महासाथीसारखे संकट असो किंवा महापुरासारखी आपत्ती अथवा दरड किंवा इमारत कोसळून गेलेले हकनाक बळी…अवघी संकटे सर्वसामान्य जनता हताशपणे सोसत राहते …
Read More »तिसर्या लाटेला थोपविण्यासाठी उरणमध्ये सज्जता
शहरासह तालुक्यात कोरोनाच्या नियंत्रणासाठी जनजागृती उरण : वार्ताहर कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना शासनाच्या आकडेवारीनुसार पुढील काही आठवड्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. उरण तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोना विषय नागरिकांमध्ये जागृकता वाढविण्यासाठी उरण येथील तहसील कार्यालय, उरण पंचायत समिती, डीओएचसी तसेच उरण मेडीकल असोसिएशन यांचेमार्फत जनजागृती …
Read More »नवी मुंबईत पुन्हा होणार निर्बंध लागू
कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर निर्णय; दुकानांच्या वेळांतही बदल नवी मुंबई ः प्रतिनिधी कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कहर कमी होत असतानाच नवी मुंबई शहरातील दैनंदिन रुग्णसंख्याही 50पेक्षा कमी झाल्याने शहरातील कोरोना निर्बंध उठविण्यात आले होते, मात्र मागील आठ दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णवाढ होत आहे. त्यात डेल्टा प्लसचा संभाव्य धोका असल्याने राज्य शासनाच्या सूचनेनुसार …
Read More »पुन्हा एकदा अयोध्या
भारतीय लोकशाहीच्या मागे लागलेला वादंगांचा ससेमिरा रामराज्य अवतरले तरी थांबणार नाही हे जणु नक्की झाले आहे. अर्ध्या शतकाहून अधिक काळ सुरू असलेला अयोध्येतील रामजन्मभूमीचा तिढा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे लीलया सुटला. त्यानंतर यासंदर्भातील अवघा वाद संपुष्टात येईल आणि अयोध्येत उभारण्यात येणारे श्रीरामप्रभूंचे भव्य मंदिर भारतीयत्वाचे प्रतीक बनून राहील अशी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper