Breaking News

Ankit Shah

नवी मुंबई महापालिका निवडणूक : आघाडीतील सहभागाबाबत काँग्रेसची भूमिका तळ्यात मळ्यात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली असून आघाडीकरून निवडणुका लढवण्याबाबत एकमत झाले असले तरी काँग्रेस या संदर्भात भूमिका काहीशी तळ्यात मळ्यात दिसत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची मने जुळणार का? …

Read More »

गव्हाण विद्यालयात संत गाडगेबाबांना अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेजमध्ये लोकसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या हस्ते पूजन अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलितोद्धार कार्याने आणि पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या गोरगरीब बहुजनांच्या …

Read More »

पोलीस पाटील संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी संजय पाटील

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर येथील पोलीस पाटील संजय गजानन पाटील यांची नुकतीच महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पनवेल येथे नुकत्याच झालेल्या रायगड जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या मेळाव्यात संजय पाटील यांना भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात …

Read More »

अवकाळीची भरपाई द्यावी; रब्बी पीक नुकसानग्रस्त शेतकर्यांचे शासनाला साकडे

उरण : प्रतिनिधी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने रायगड जिल्ह्यात भाजीपाल्यासह रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. त्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी त्याने राज्य शासनाकडे मागणी केली आहे. उरणमधील शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांवरही अवकाळीचे संकट कोसळल्याने त्यांनीही शासनाकडून भरपाई मिळावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले आहेे. अवकाळी …

Read More »

भूपेंद्र पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

  पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून सोमवारी (दि. 13) साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचत्य साधून जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्यांचे वाटप, तसेच पंचायत समिती शेष फंडातून करण्यात येणार्‍या पेव्हर ब्लॉकच्या कामाचे उद्घाटन पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते …

Read More »

महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेतर्फे पनवेल पालिका आयुक्तांना निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेतर्फे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.  पनवेल महानगरपालिकेंतर्गत राहणार्‍या कुष्ठपीडित नागरिकांच्या विविध समस्यांसंदर्भात हे निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील कुष्ठपीडितांना महापालिकेने प्रतिमहा रु. 2500 विशेष अनुदान मंजुरी देण्यात आलेली आहे, परंतु सध्याच्या वाढत्या महागाईमुळे मिळणार्‍या अल्प …

Read More »

नवीन पनवेल येथे आंतराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्राचा वेगाने विकास होत आहे. त्याअंतर्गत नवीन पनवेल येथील राजीव गांधी मैदानात महापालिकेच्या माध्यामतून राजीव गांधी मैदानात ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र’ सुरू होणार आहे. या कामाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 12) भूमिपूजन झाले, तसेच या वेळी …

Read More »

मजनू चित्रपटात पनवेलची स्वेतलाना नायिकेच्या भूमिकेत

पनवेल : प्रतिनिधी सोनाई फिल्म क्रिएशनच्या मराठी मजनू या चित्रपटात पनवेलची स्वेतलाना नायिकेच्या भूमिकेत चमकणार आहे. पोस्टर प्रसिध्द झाले असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे पनवेलच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. नवीन वर्षात एक हटके प्रेमकथा पेक्षकांच्या भेटीला येत असून सोनाई फिल्म क्रिएशनच्या मजनू या …

Read More »

कळंबोलीतील नेत्रचिकित्सा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कळंबोली : रामप्रहर वृत्त लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कळंबोली येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये झालेल्या मोफत नेत्रचिकित्सा शिबिर व अल्पदरात चष्मे वाटप कार्यक्रमाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील उपाध्यक्षा बायजा बबन बारगजे, सरचिटणीस दिलीप …

Read More »

म्हाडाच्या परीक्षा रद्द झाल्याने भाजयुमोतर्फे आंदोलनाचा इशारा

पनवेल : वार्ताहर म्हाडाच्या परीक्षा अचानकपणे रद्द झाल्याची माहिती रात्री उशिरा दिली. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या गोष्टीचा तीव्र निषेध करीत प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे वाटोळे करणारी भेट विद्यार्थ्यांना दिली …

Read More »