पनवेल ः रामप्रहर वृत्त – रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, शनिवारी (दि. 28) नवे 121 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 85 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 91 व ग्रामीण 12) तालुक्यातील 103, अलिबाग सात, खालापूर व कर्जत प्रत्येकी तीन, पेण व …
Read More »शरद पवारांच्या घरावर काढणार मोर्चा
मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला अल्टिमेटम नाशिक ः प्रतिनिधी – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न येत्या 2 डिसेंबरपर्यंत मार्गी लावण्याचा अल्टिमेटम मराठा क्रांती मोर्चाने सरकारला दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाची शनिवारी …
Read More »महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत : देवेंद्र फडणवीस
मुंबई : प्रतिनिधी – मुख्यमंत्री संयमी असल्याचे ऐकून होतो, मात्र मुख्यमंत्रिपदाला न शोभणारी वक्तव्ये त्यांनी केली. वर्षभरात या सरकारने काहीच साध्य केले नाही. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत विकासावर चर्चा नाही, तर फक्त धमकावण्यासाठी मुलाखत दिल्याचे वाटते. महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी पाहिले नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »पंतप्रधान मोदींचे ‘मिशन व्हॅक्सिन’
पुण्यात ‘सीरम’मध्ये केली लसनिर्मितीची पाहणी पुणे ः प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 28) देशातील कोरोनाविरोधातील लस विकसित करणार्या प्रमुख कंपन्यांना भेट देऊन ’मिशन व्हॅक्सिन’ पूर्ण केले. पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन कोरोना लस निर्मितीसह उत्पादनाबाबत आढावा घेतला. पंतप्रधान मोदी जवळपास तासभर …
Read More »‘कोरोनावरील लशीचे वितरण पहिल्यांदा भारतातच’
पुणे ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन कोविशिल्ड लशीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ‘सीरम’चे अदर पुनावाला यांनी लशीबाबत महत्त्वाची माहिती दिली. पंतप्रधानांसोबत कोरोनाविरोधातील लशीसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. कोरोना लशीच्या तिसर्या ट्रायलवर आमचे लक्ष आहे. कोरोनावरील लशीचे वितरण पहिल्यांदा भारतातच होईल. लशीच्या तयारीबाबत पंतप्रधान …
Read More »संवेदनाशून्य, परावलंबी वर्ष
विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर निखारा ठेवण्याचा निर्णय असो, मराठा आरक्षणाचा गंभीर प्रश्न असो, कंगना रणौवतच्या घरावर बेकायदा चालवलेला बुलडोझर असो किंवा टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामींच्या अटकेचे प्रकरण असो या सर्वच न्यायालयीन लढायांमध्ये ठाकरे सरकार सपशेल तोंडावर पडले. परीक्षेत कुठलाही प्रश्न सोडवण्यात साफ तोंडघशी पडलेल्या विद्यार्थ्याने कोरी उत्तरपत्रिका ठेवून स्वच्छतेच्या गुणांची मागणी केल्यासारखे …
Read More »गतिमान वाटचाल कोकणाची
कोकण महसूल विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र असे वैशिष्ट्य आहे. सागरी, डोंगरी, शहरी आणि औद्योगिकरणात विभाग पुढे आहे. कोरोनासारख्या महाभयंकर आपत्तीला महाराष्ट्राने समर्थपणे तोंड दिले. कठीण काळ होता. तरीही विकासाचा वेग आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताचा निर्णय घेण्यास शासन कमी पडले नाही. महाराष्ट्र …
Read More »भाजप पनवेल शहर सांस्कृतिक सेलची कार्यकारिणी जाहीर
परेश ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान पनवेल : रामप्रहर वृत्त – भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेलची पनवेल शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नियुक्ती पत्रप्रदान सोहळ्याचे आयोजन गुरुवारी (दि. 26) करण्यात आले होते. त्यानुसार सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांना पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नियुक्तीपत्र प्रदान करून शुभेच्छा …
Read More »रायगड कडेलोटाच्या उंबरठ्यावर?
राज्यात सत्तारूढ असलेल्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. खरे तर महाराष्ट्रातील निवडणूकीपूर्वी एकमेकांचे शाब्दिक कोथळे काढून झाल्यावर नीतीमत्तेची कोणतीच चाड न बाळगता एकत्र येणे यातूनच सरकारमध्ये सामील झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँगे्रस या तीनही पक्षांनी सत्ता मिळविण्यासाठी आपण कुणाचाही विश्वासघात करू शकतो, हे सिद्ध केले. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र …
Read More »जिल्हाधिकारी कार्यालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन
अलिबाग : जिमाका – संविधान दिनानिमीत्त अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात गुरुवारी (दि. 26) जिल्हाधिकारी निधी चौधरी तसेच अधिकारी कर्मचार्यांकडून राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, तहसिलदार विशाल दौंडकर यांच्यासह …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper