Breaking News

Ankit Shah

संकुचितपणाला जागा नाही

जगभरात आजच्या घडीला अनेक कोरोना प्रतिबंधक लसी चाचण्यांच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. आपल्या देशातील या आघाडीवरील प्रगतीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच घेतला. आपल्या 135 कोटी लोकसंख्येतील प्रत्येकापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस पोहचवणे हे जसे आव्हान आहे, तसेच जागतिकीकरणामुळे जगभरातीलही प्रत्येकापर्यंत ती पोहचवणे तितकेच आवश्यक आहे. या लसींच्या संदर्भात निव्वळ पैशाच्या …

Read More »

अनधिकृतपणे पार्क केले जाणारे गॅस सिलिंडरचे ट्रक हटविण्याची मागणी

कळंबोली : प्रतिनिधी – रहिवासी क्षेत्रात अनधिकृतरीत्या पार्क करण्यात येणार्‍या गॅस सिलिंडरचे ट्रक हटविण्यासंदर्भात भाजप नगरसेविका नेत्रा पाटील यांनी मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी खारघरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच खारघरच्या वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणीवजा तक्रार केली आहे. नगरसेविका पाटील यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे पनवेल महानगरपालिकेच्या …

Read More »

भाजप उरण व्यापारी सेलच्या संयोजकपदी हितेश शहा

उरण : रामप्रहर वृत्त – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप उरण व्यापारी सेलच्या संयोजकपदी हितेश शहा यांची निवड करण्यात आली आहे. निवड झाल्याचे नियुक्तिपत्र उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांनी दिले. या वेळी आमदार महेश बालदी, जिल्हा …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पाणजे येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

उरण : वार्ताहर – पाणजे गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सरपंच करिष्मा भोईर यांनी आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली जेएनपीटी बंदराकडे सातत्याने पाठपुरावा केला. जेएनपीटीने आपल्या सीएसआर फंडातून पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला. तालुक्यातील मे. सी. जी. एस. कन्स्ट्रक्शन या कंपनीला जलवाहिनीच्या कामाचा ठेका दिला असून या जलवाहिनीच्या …

Read More »

जमिनीच्या वादातून हाणामारी

आणखी एका आरोपीस अटक कर्जत ः प्रतिनिधी, बातमीदार – कर्जत तालुक्यातील गौळवाडी येथील जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत एका शेतकर्‍याला गंभीर दुखापत करून फरार झालेल्या लोणावळा येथील आरोपीला यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे, तर कर्जतमधील मुद्रे विभागात राहणार्‍या आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 30 नोव्हेंबरपर्यंत …

Read More »

रायगडच्या सुकन्येचा बोलबाला

बनविले भारतातील पहिले ऑटोमेशन अ‍ॅप्लिकेशन पाली ः प्रतिनिधी – डेटा सेंटर, स्मार्ट सिटी आणि ऑटोमेशन क्षेत्रात आतापर्यंत पाश्चात्य कंपन्यांची मक्तेदारी होती. अनेक दिग्गज कंपन्या आपले ऑटोमेशन भारतात महागड्या भावाने विकत, पण आता या शर्यतीत पहिली संपूर्ण भारतीय कंपनी पुढे आली आहे. रायगड जिल्ह्यातील विहिघर येथील 27 वर्षीय पूजा हरड-म्हात्रे या …

Read More »

काशिदच्या समुद्रात बुडवून इसमाचा खून

मुरूड ः प्रतिनिधी – उसनवारी दिलेली रक्कम मागितल्याचा राग धरून रक्कम देणारा गणेश किसन ठोकळ (रा. कामरगाव, जि. अहमदनगर) यास सहा जणांनी मिळून मुरूड तालुक्यातील काशिद येथील समुद्रात बुडवून त्याचा खून केल्याप्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 27 नोव्हेंबरला मुरूड पोलीस ठाणे येथे गु. र. …

Read More »

रिलायन्स प्रकल्पग्रस्त निर्णयावर ठाम

ठोस आश्वासनाशिवाय माघार न घेण्याचा निर्धार; आंदोलनकर्त्या महिला रंगल्या भजनात नागोठणे ः प्रतिनिधी – येथील रिलायन्स कंपनीच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त, ठेकेदारीतील कामगार तसेच सुशिक्षित बेरोजगारांनी शुक्रवारपासून सुरू केलेल्या आंदोलनाबाबत अद्याप निर्णय न झाल्याने तिसर्‍या दिवशीही अखंडपणे आंदोलन सुरू ठेवण्यात आले. प्रकल्पग्रस्तांनी कंपनीसमोरील मोकळ्या जागेत आंदोलन सुरू ठेवले असून आपल्या …

Read More »

चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारत सज्ज

पँगाँग भागात मरीन कमांडो तैनात नवी दिल्ली ः वृत्तसंस्था – भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर क्षेत्रात आपले मरीन कमांडो तैनात केले आहेत. लडाखमध्ये आधीपासूनच तैनात असलेल्या गरूड सैन्य संचलन आणि भारतीय सेनेच्या पॅरा स्पेशल दलाला अधिक मजबूत करण्यासाठी पूर्व लडाखमध्ये मरीन कमांडो …

Read More »

ढगाळ हवामानाचा पर्यटनाला फटका

मुरूडमध्ये पर्यटकांची संख्या रोडावली मुरूड ः प्रतिनिधी – निवार चक्रीवादळ शुक्रवारी (दि. 27) सकाळच्या सुमारास 25 किमी प्रतितास वेगाने मुरूड तालुक्यात धडकल्याने नागरिक भयभयीत झाले होते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या निवार चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता होती. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली होती. त्याप्रमाणे सागरीकिनारी वसलेल्या मुरूडमध्ये शनिवारी …

Read More »