उरण : प्रतिनिधी पागोटे-कुंडेगाव खाडीत गुरुवारी (दि. 15) सकाळी हजारो मासे मृत झाल्याचे दिसून आले. मच्छिमारांच्या उपजीविकेचे साधन असणार्या या खाडीमध्ये परिसरातील कंपन्यांचे केमिकलयुक्त पाणी सोडल्यामुळे मासे मृत्यूमुखी पडल्याचा आरोप कोळी बांधवांनी केला आहे. उरण तालुक्यात अनेक लहान-मोठ्या खाड्या आहेत. या खाड्यांमध्ये अत्यंत चवदार मासळी मिळते. अनेक मासेमार या खाड्यांमध्ये …
Read More »पनवेल महापालिका हद्दीत गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू
पनवेल ः प्रतिनिधी गोवर रुबेला लसीकरण मोहीम पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात दोन टप्यामध्ये राबविण्यात येणार असून या मोहिमेची पहिली फेरी 15 ते 25 डिसेंबर व दुसरी फेरी 15 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. 15) पासून 150 जणांच्या टिमच्या साहाय्याने घरोघरी जाऊन गोवर प्रतिबंधात्मक लसीकरणास पनवेल …
Read More »उसर्ली खुर्दच्या माजी सरपंचांवर अटकेची टांगती तलवार
– अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल सत्र न्यायालयाने फेटाळला – बनावट कागदपत्रांद्वारे दिलेली बांधकाम परवानगी भोवणार पनवेल : रामप्रहर वृत्त बनावट कागदपत्रे तयार करून नैना क्षेत्रात बांधकाम परवानगी दिल्याप्रकरणी उसर्ली खुर्द ग्रामपंचायतीचे शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच प्रमिला मोहन भगत आणि विश्वास लक्ष्मण भगत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल येथील सत्र …
Read More »पनवेल महापालिकेच्या स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंजमध्ये विविध महाविद्यालयांचे सादरीकरण
पनवेल ः प्रतिनिधी ‘स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज’ स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयांनी आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण महापालिकेच्या मुख्यालयातील बैठक कक्षामध्ये सादर केले. गुरुवारी (दि. 15) झालेल्या या स्पर्धेमध्ये 10 महाविद्यालयांनी सहभाग घेतला.स्वच्छ भारत अभियानाची पनवेल महानगरपालिका हद्दीमध्य प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याकरिता ‘स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज’स्पर्धेचे आयोजन महापालिकेच्यावतीने करण्यात …
Read More »पनवेल बार असोसिएशन निवडणुकीत अॅड. मनोज भुजबळ पॅनेलचे सुशांत घरत बिनविरोध
पनवेल ः प्रतिनिधी/वार्ताहर पनवेल बार असोसिएशन कार्यकारिणीच्या निवडणुकीत अॅड. मनोज भुजबळ यांच्या पॅनेलचे अॅड. सुशांत घरत हे बिनविरोध विजयी झाले आहेत. पनवेल बार असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक 21 डिसेंबर रोजी होत असून यामध्ये असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ पुन्हा अध्यक्षपदासाठी रिंगणात उभे असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. अॅड. मनोज …
Read More »नेरूळ-उरण मार्गावर 2023मध्ये धावणार रेल्वे
50 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर उरणकरांचे स्वप्न साकार उरण ः वार्ताहर मागील वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या उरणकरांच्या स्वप्नांचा मार्ग आता दृष्टीपथात येऊन ठेपला आहे. 27 किमी लांबीचा आणि सुमारे 1782 कोटी खर्चाच्या नेरुळ-उरण मार्गावरील दुसर्या टप्प्यातील खारकोपर ते उरण हा 14.3 किमी लांबीच्या रेल्वे मार्गावरील काम प्रगतीपथावर आहे. सर्वच अडथळे दूर झाल्यानंतर …
Read More »नवीन शासननिर्णयामुळे काजू फळबागा बहरणार
राज्यातील नवीन शिंदे फडणवीस सरकारने 100 टक्के अनुदानाची फळपिक योजना काजूपीकासाठी लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला आहे. नव्या धोरणामुळे महाराष्ट्रामध्ये काजूप्रक्रिया आणि काजूपिक घेण्यासाठी शेतकर्यांना चांगले दिवस येण्यासोबतच मोठ्या प्रमाणात काजू लागवडीला प्रोत्साहन मिळण्याची लक्षणं दिसून येत आहेत. काही वर्षांपूर्वी कोकणात सुमारे 5000 हेक्टर जमिनीवर काजू फळलागवड यशस्वी झाली …
Read More »दांभिकपणाचा पुरस्कार
वास्तविक जी संस्था पुरस्कार देते, तिला तो मागे घेण्याचा अधिकार असतोच. त्यामध्ये आक्षेप घेण्याजोगे काहीही नाही. या सगळ्या प्रकरणात विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले हेदेखील लोकशाहीला धरूनच झाले असे म्हणावे लागेल. आधी पुरस्कार द्यायचा आणि तो त्वरित मागे घ्यायचा यामध्ये ढिसाळपणा तेवढा दिसून येतो, परंतु हा ढिसाळपणा वगळता कोबाद गांधी …
Read More »कर्जत तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील रस्त्यांचे तसेच नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. ही विकासकामे तीन कोटी 82 लाख रुपयांची आहेत. आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून एमएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून चिंचवली-एकसळ आणि सुमारे एक कोटी वीस लाख रुपये खर्च करून एकसळ-भानसोली हे रस्ते तयार करण्यात येत …
Read More »पेण-नागोठणे मार्गावर एसटीच्या फेर्या वाढवण्याची मागणी
विभाग नियंत्रक दिपक घोडे यांना निवेदन पेण : प्रतिनिधी पेण-पाली-नागोठणे आणि रोहा-पनवेल या मार्गांवर गाड्यांच्या संख्येत वाढ करुन फेर्या वाढवाव्यात, अशी मागणी गडब, कासू प्रवाशी संघटन व विद्यार्थ्यांनी एसटीचे विभाग नियंत्रक दीपक घोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पालखार-पेण, पेण-नागोठणे, पेण-पाली, पेण -रोहा, पालखार-पनवेल या बस फेर्या वाढविण्यात याव्यात. पेण, रामवाडी व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper