Breaking News

Ramprahar News Team

कामगार नेते जितेंद्र घरत यांचे अभीष्टचिंतन

पनवेल : रामप्रहर वृत्त जय भारतीय जनरल कामगार संघटना व भाजप रायगड जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते जितेंद्र घरत यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 9) मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या सभागृहामध्ये त्यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेतील कार्यकर्त्यांनी केक कापून वाढदिवस …

Read More »

खारघरमध्ये पे पार्किंग करण्याची मागणी

भाजप नेते प्रभाकर घरत यांचे पमपा प्रशासनाला निवेदन खारघर : रामप्रहर वृत्त खारघर सेक्टर 4मधील रस्त्यावर पे पार्किंग करण्याची मागणी भाजप नेते प्रभाकर घरत यांनी पनवेल महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. घरत यांनी निवेदनात म्हटले आहे की, बेलपाडा खारघर सेक्टर 3 बेलपाडा गाव शेजारी असलेल्या गॅरेजच्या दुकानांमुळे मोठ्या प्रमाणात गाड्या …

Read More »

धोकादायक सिग्नल बदलला; माजी नगरसेवक राजू सोनी यांची तत्परता

पनवेल : वार्ताहर पनवेल येथील शिव शंभो नाक्याजवळील सिग्नलच्या पोलला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे तो पोल अत्यंत धोकादायक झाला होता. तो पोल कधीही वाहनांवर पडून मोठे नुकसान झाले असते, तसेच मोठी जीवित हानीदेखील झाली असती, परंतु ही बाब माजी नगरसेवक राजू सोनी यांना समजताच त्यांनी तत्परतेने पुढील यंत्रणा राबवून …

Read More »

घरोघरी तिरंगा अभियानाची जनजागृती

पनवेल महापालिकेतर्फे मार्गदर्शनपर बैठक पनवेल : वार्ताहर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान घरोघरी तिरंगा फडकविण्यासंदर्भात आवाहन करण्यासाठी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी घरोघरी तिरंगा अभियानाची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी पत्रकारांना दिली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाची …

Read More »

राख्या घेण्यासाठी लगबग वाढली

नवी मुंबई : बातमीदार बहीण-भावाचे नाते अधिक दृढ करणार्‍या रक्षाबंधन सणाची सर्वांना उत्सुकता असते. येत्या 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने विविध बाजारपेठेत राखी खरेदीला सुरुवात झाली आहे. कोरोनाचे सावट दूर झाल्याने यंदा रक्षाबंधन मोठ्या उत्साहात होणार आहे. तर राखी विक्रेत्यांनाही त्यांचा व्यवसाय अधिक काळ करता येणार असल्याने विक्रेत्यांमध्ये आनंद दिसून …

Read More »

उरण महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती

उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी. आणि अ‍ॅन्टी रॅगिंग कमिटी तसेच उरण तालुका विधी सेवा समिती व उरण तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. बळीराम एन. गायकवाड हे होते. तर प्रमुख अथिती …

Read More »

फुंडे हायस्कूलमध्ये वाहतूक विभागातर्फे विविध स्पर्धा

उरण : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील फुंडे येथील तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवारी (दि. 4) नवी मुंबई पोलीस आयुक्तालय वाहतूक विभागाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण भारतात देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. शासनामार्फत …

Read More »

ग्रामस्थ घरांत पोहचवणार तिरंगा

नवी मुंबई : बातमीदार देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन सर्वांना मोठ्या अभिमानाने साजरा करता यावा. यासाठी वाशीगाव, वाशी सेक्टर-30, सानपाडा- सोनखारमधील सर्व सेक्टर्स तसेच जुईनगर सेक्टर 22, 22 मधील प्रत्येक घरोघरी अश्या एकूण 15 हजार घरांमध्ये 13 तारखेपासून राष्ट्रध्वज फडकला जाणार आहे. या 15 हजार घरांमध्ये तिरंगा पोहोचवला जाणार आहे. माजी …

Read More »

उरण महाविद्यालयाचे युवा महोत्सवात यश

उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी, मुंबई विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास विभागाने आयोजित केलेल्या 55व्या सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये रायगड जिल्हा उत्तर विभागाच्या प्राथमिक फेरीच्या विविध स्पर्धामध्ये यश संपादन केले. यात पाश्चिमात्य वादन प्रथम क्रमांक विश्वकर्मा रूपेश, कथाकथन हिंदी तृत्तीय दिपीका सोनी, एकपात्री …

Read More »

असंवेदनशीलतेचे आव्हान

गोंदिया बलात्कार प्रकरणाने वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर हेडलाइनची जागा पटकावली असली तरी अशा घटना या अलीकडे समाजाकडून मात्र एक प्रकारच्या निर्विकारपणेच स्वीकारल्या जाताना दिसतात. अमानुष लैंगिक अत्याचाराची अशी एखादी घटना कुठे आणि कुणाच्या संदर्भात घडली आहे यावरून जनसामान्यांची प्रतिक्रिया किती तीव्र असेल ते ठरते. अन्यथा काही राजकीय पक्षांकडून निव्वळ राजकारणात भांडवल …

Read More »