Breaking News

Ramprahar News Team

रानगव्याच्या हल्ल्यात गुराखी जखमी

पोलादपुरातील कुडपण खुर्द येथील घटना पोलादपुर : प्रतिनिधी तालुक्यातील कुडपण खुर्द येथे शनिवारी (दि. 27) दुपारी रानगव्याने केलेल्या हल्ल्यात एक गुराखी गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी पोलादपूर, महाड, अलिबाग आणि आता मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये हलविले आहे. सचिन रघुनाथ शेलार असे रानगव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गुराख्याचे नाव आहे. तो शनिवारी …

Read More »

आघाडीत राहिलो असतो, तर तिन्ही आमदार पुन्हा निवडून आलो नसतो -आमदार महेंद्र दळवी

मुरूड तालुका बौद्ध समाज संघाकडून जंगी सत्कार मुरूड : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात फक्त राष्ट्रवादीलाच विकासनिधी मिळत होता. त्यामुळे आमच्या आमदारकीला धोका निर्माण झाला असता. त्या आघाडीत राहिलो असतो, तर आम्ही रायगडमधील शिवसेनेचे तिन्ही आमदार पुन्हा निवडून आले नसतो, असे प्रतिपादन शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी मुरूड येथे …

Read More »

माणगाव कुणबी समाज संघटनेतर्फे गुणगौरव सोहळा, वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

माणगाव : प्रतिनिधी माणगाव शहर कुणबी समाज संघटनेची सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. 27) येथील कुणबी भवन सभागृहात झाली. तालुका कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष महादेवराव बक्कम यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत गुणवंत विद्यार्थी, कृषिनिष्ठ शेतकरी आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या कुणबी बांधवांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे …

Read More »

संजयआप्पा ढवळे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तळाशेत (इंदापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांना अविष्कार फाउंडेशनच्या रायगड जिल्हा शाखेतर्फे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार 2022 जाहीर झाला आहे. अविष्कार फाउंडेशनतर्फे दरवर्षी  विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. 2022च्या समाजभूषण पुरस्कारासाठी संजयआप्पा ढवळे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती फाउंडेशनचे …

Read More »

पराग बोरसेंच्या चित्र कार्यशाळेला सिंगापूरमध्ये लाभला उदंड प्रतिसाद

कर्जत : प्रतिनिधी सिंगापूर येथील माय आर्ट-स्पेस, ईस्ताना पार्क या प्रसिद्ध कलादालनामध्ये नुकतीच कर्जतचे विख्यात चित्रकार पराग बोरसे यांची व्यक्तिचित्रणाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दर दिवशी सहा तास या प्रमाणे तीन दिवस ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला भारतीय आणि सिंगापूरकर विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली. कार्यशाळेदरम्यान पराग बोरसे यांनी …

Read More »

सुधागडात चिखलामध्ये स्पोर्ट कारचा थरार

अभिनेता सुनील शेट्टीला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर गावाजवळ बॉलिवूड सुपरस्टार सुनील शेट्टीच्या उपस्थितीत मड स्कलच्या दोन दिवसीय तिसर्‍या सीझनला सुरुवात झाली. शर्यतीच्या सुरुवातीपासून अंतिम फेरीपर्यंत सुनील शेट्टीने या शर्यतीत भाग घेतला होता. या वेळी अभिनेता सुनील शेट्टीला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. गोविंद बन्सल यांच्या …

Read More »

सर्वांच्या सहकार्याने रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी नावारूपास -सुर्वे

माणगाव : प्रतिनिधी सर्वांच्या सहकार्यामुळे आपली सहकारी पतपेढी नावारूपास आली असून पतपेढीची शतक महोत्सवाकडे वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे चेअरमन राजेश सुर्वे यांनी रविवारी (दि. 28) माणगाव येथे केले. रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी-अलिबाग या पतसंस्थेची 98वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी दुपारी चेअरमन राजेश …

Read More »

बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना मुख्यमंत्री शिंदे पुढे नेताहेत -ना. सामंत

कर्जतमध्ये शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा कर्जत : प्रतिनिधी आरोग्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे याची घोषणा आपल्या शिंदे सरकारने केली. आता स्थानिकांवर अन्याय होणार नाही. बाळासाहेबांची खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढवित, पुढे नेत आहेत. ते सर्वांना निश्चित न्याय देतील, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. कर्जत-खालापूर …

Read More »

उरण नाका येथील मातीचा ढिगारा स्वखर्चाने उचलला

माजी नगरसेवक राजू सोनी यांची सामाजिक बांधिलकी पनवेल : वार्ताहर उरण नाका येथील यश हॉस्पिटलच्या खाली तसेच न्यू गणेश स्वीट मार्ट दुकानाच्या समोरच रस्त्यावरच फेव्हर ब्लॉक बसविताना काढलेली माती गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून रस्त्यावरच पडून होती. याबाबत माजी नगरसेवक राजू सोनी यांनी दखल घेऊन त्यांचे सहकारी मंदार देसाई यांनी …

Read More »

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा एचआयएल कामगारांना दिलासा

खोपोली ः प्रतिनिधी रसायनी येथील हिंदुस्थान इन्सेक्टिसाईड लिमिटेड (एचआयएल) कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतल्याने कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भाजप महाराष्ट्र प्रदेश चिटणीस व कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे यांच्यासह कामगार प्रतिनिधींनी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. रसायनी येथील हिंदुस्थान …

Read More »