Breaking News

Ramprahar News Team

पेण बेकायदा गर्भपातप्रकरणी दोन फरारी आरोपींना पकडले

पेण ः प्रतिनिधी पेणमधील महिलेच्या बेकायदा गर्भपातप्रकरणी दादर पोलिसांनी दोन फरारी आरोपींना अटक केली आहे. देवता भोईर व विनायक भोईर अशी त्यांची नावे आहेत. पेण तालुक्यातील जोहे येथील डॉ. शेखर धुमाळ यांच्या दवाखान्यात विवाहित महिलेचा सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून 16 आठवड्यांचा गर्भ नष्ट करण्यात आला. यामध्ये या विवाहितेचा मृत्यू झाला होता. …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा खारघरमध्ये रहिवाशांसोबत सुसंवाद

दुहेरी करप्रश्नी सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर सेक्टर 11मधील केंद्रीय विहार संकुलातील रहिवाशांसोबत रविवारी (दि. 10) सुसंवाद साधला. या वेळी त्यांनी पनवेल महापालिकेच्या मालमत्ता करासंदर्भात भूमिका मांडत तो कसा योग्य आहे व तो का भरला पाहिजे हे …

Read More »

पंढरपुरात जमला भाविकांचा मेळा!

पंढरपूर ः प्रतिनिधी भगव्या पताकांची दाटी… ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष… टाळ-मृदंगाचा गजर… पावसाची संततधार… चिखलात नाचणारे वैष्णव… अशा भक्तिमय आणि चैतन्यमयी वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, सोपानदेव महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालख्यांसह लाखो भाविक पंढरीत विसावले आहेत. रविवारी (दि. 10) आषाढीनिमित्त आपल्या लाडक्या विठूरायाला डोळे भरून पाहणार आहेत. गेल्या दोन …

Read More »

पनवेलच्या रोहिदास वाड्यात समाजमंदिराची उभारणी

महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल ः रामप्रहर वृत्त रोहिदास वाड्यात उभारण्यात आलेले समाजमंदिर हे महपालिका क्षेत्रातील एक महत्त्वाचे आणि प्रतिष्ठित अशी वास्तू येणार्‍या काळात बनेल, असा विश्वास सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केला. शहरातील रोहिदास वाड्यात नव्याने उभारण्यात आलेल्या समाजमंदिराचा लोकार्पण सोहळा …

Read More »

आषाढीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत माहिती नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौर्‍यावर आहेत. तिथे वरिष्ठ नेत्यासह त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. 18 जून रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक …

Read More »

नवीन पनवेल ते नेरेपर्यंतचा रस्ता लवकरच होणार दुरूस्त

जि. प. सदस्य अमित जाधव यांना अधिकार्‍यांचे आश्वासन पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेल (आदई सर्कल) ते नेरे गावापर्यंतचा रस्ता नादुरूस्त झाला आहे. हा रस्ता दुरूस्त करण्याबाबत राजिप सदस्य तथा भाजपचे पक्षप्रतोद अमित जाधव यांनी पनवेल सार्वजनिवक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केल्यानंतर अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने …

Read More »

कळंबुसरेत वनविभागाचा घरावर बुलडोझर

उरण : प्रतिनिधी भर पावसात उरण वनविभागाच्या अधिकार्‍यांनी कळंबुसरे गावातील एका रहिवाशाच्या अनधिकृत घरावर कोणत्याही प्रकारची नोटीस न बजावता बुलडोझर फिरवला आहे.उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील एका रहिवाशाने गावात कुटुंबाच्या गरजेपोटी वाढीव घराचे बांधकाम केले होते. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी या घरावर भर पावसात बुलडोझर फिरवला. ऐन पावसात संपूर्ण घर उद्ध्वस्त केल्याने ग्रामस्थांनी …

Read More »

स्थायी समितीच्या सभेत अध्यक्षांनी मानले सर्वांचे आभार

पनवेल ः प्रतिनिधी माझ्या कारकिर्दीत महापालिका मुख्यालय, क्रिकेट केडमी, पायाभूत सोयीसुविधांची कामे, समाजमंदिरे अशी कामे होऊ शकली. त्याबद्दल सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो असे स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष नरेश ठाकूर यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात प्रतिपादन केले-महापालिकेची स्थायी समितीची पहिल्या पंचवार्षिक मधली शेवटची सभा शुक्रवारी (दि. …

Read More »

महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते सहाय्यता निधीचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त महापौर सहाय्यता निधीतून महापौर डॉ. कविता चौतमोल यांचे हस्ते दिव्या हेमंत राणे या दहा वर्षीय मुलीला मदतीचा धनादेश देण्यात आला. पनवेल महापालिकेच्या कार्यालयात महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 8) महापौर सहाय्यता निधीची सर्वसाधारण बैठक घेण्यात आली. या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर सहाय्यता …

Read More »

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन उभारावे

भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची मागणी पनवेल ः प्रतिनिधी पनवेल मनपा हद्दीमध्ये  भूखंड राखीव ठेऊन तेथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन उभारावे, अशी मागणी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी आयुक्तांना पत्र लिहून केली आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील महिलांसाठी …

Read More »