Breaking News

Ramprahar News Team

वाडगाव येथील कुस्ती स्पर्धेत गावदेवी आंदोशी संघ विजेता

प्रथम क्रमांकाची मानाची गदा पारनेरच्या ॠषीकेश हांडे यांने पटकावली रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे हनुमान तालिम संघ व वाडगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत आंदोशी संघ विजेता ठरला, तर टाकादेवी मांडवा द्वितीय आणि जय हनुमान तालिम संघ-पनवेल तृतीय क्रमांकाचा मानकरी …

Read More »

माणगाव तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले; अनेक नद्यांना पूर

माणगाव : प्रतिनिधी गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने माणगाव तालुक्यात अनेक नद्यांना पूर आला असून,  जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा जाणवत आहे. कोणतीही नैसर्गिक आपत्ती घडू नये, म्हणून महसूल खात्याकडून दक्षता बाळगण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. माणगाव तालुक्यात 7 व 8 सप्टेंबर रोजी …

Read More »

द्रुतगती मार्गावर कंटेनरची कारला धडक; एक ठार

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटातील अफकॉन कंपनीजवळ गुरुवारी (दि. 8) दुपारी 3.45  वाजण्याच्या सुमारास कंटेनरने इर्टिगा कारला पाठीमागून ठोकर दिली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला. द्रुतगती मार्गावरून गुरुवारी दुपारी कंटेनर पुणे ते मुंबई असा जात होता. बोरघाटातील अफकॉन कंपनीजवळ ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला …

Read More »

लहरी हवामानाला लागू पडली पेर भाताची मात्रा; कर्जतच्या हरिश्चंद्र ठोंबरे यांचा प्रयोग यशस्वी

कर्जत : प्रतिनिधी यंदा कर्जत तालुक्यात भातपिकाच्या पेरण्या वेळेवर झाल्या होत्या मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने भात रोपे हवी तशी तयार झाली नाहीत. तरीही खचून न जाता तालुक्यातील एका प्रगतशील शेतकर्‍याने पेर पद्धतीने बियाण्याची पेरणी करून भात पिक घेण्याचा निर्णय घेतला आणि तो कमालीचा यशस्वी झाला. यामुळे मुख्य म्हणजे मजुरांची …

Read More »

म्हसळ्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस 

म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा शहरासह संपूर्ण तालुक्यातील विविध भागांत बुधवारी संध्याकाळी ढगफुटीसदृष्य पाऊस पडला. दुपारी आकाशांत ढगांची जमवाजमव झाली, त्यानंतर जोरदार वारा, विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस कोसळत होता. या वेळी महावितरणची बत्ती गुल झाल्याने बहुतांश भागात अंधाराचे सावट पसरले होते. अचानक …

Read More »

रोह्यातील डॉ. देशमुख महाविद्यालयाला राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यापीठ स्तरीय सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

रोहे : प्रतिनिधी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रोहे येथील डॉ.चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालयाला मुबंई विद्यापीठ स्तरीय राष्ट्रीय सेवा योजना सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. शिक्षक दिनानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील फिरोजशहा मेहता भवनात झालेल्या  कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते डॉ. …

Read More »

प्रधानमंत्री आदि आदर्श ग्रामविकास योजना… रायगड जिल्ह्यातील 88 गावांची निवड

अलिबाग : प्रतिनिधी अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या असलेल्या गावांचा एकात्मिक, आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आदि आदर्श ग्रामविकास ही योजना प्रस्तावित केली आहे. राज्यातील ज्या गावांमध्ये किमान 500 व 50 टक्के इतकी आदिवासी समाजाची लोकसंख्या आहे, अशा महाराष्ट्रातील एकूण तीन हजार 605 गावांची निवड केंद्र शासनाने या योजनेकरिता …

Read More »

जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींमध्ये 13 ऑक्टोबरला निवडणूक

अलिबाग : प्रतिनिधी राज्यातील एक हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे.  त्यात रायगड जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील वेश्वी, नवेदर नवगाव, कोप्रोली, कर्जत तालुक्यातील पोटल, पाली तर्फे कोतवाल खलाटी, खालापूर तालुक्यातील चौक, आसरे, लोधीवली, तूपगाव, पनवेल तालुक्यातील …

Read More »

निव्वळ पाणीपुरवठा थकबाकी शून्य; उरणमधील बोकडविरा ग्रामपंचायतीचा आदर्श

उरण : बातमीदार उरण तालुक्यातील बोकडविरा ग्रामपंचायत मध्ये गेली अनेक वर्षापासून असलेली निव्वळ पाणीपुरवठा थकबाकी बिलाचा प्रश्न ग्रामपंचायतमध्ये एकमताने ठराव पारीत करून पाणी पुरवठा वरील थकीत व चालू बिलाचा भरणा करून ग्रामपंचायत बोकडविराने निव्वळ पाणीपुरवठा थकबाकी शून्य करत एक नवीन व चांगला आदर्श सर्व ग्रामपंचायतीसमोर ठेवला आहे. निव्वळ पाणीपुरवठा थकबाकी …

Read More »

खांदा कॉलनीत वाचनालयाचे लोकार्पण

भिमराव पोवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य भिमराव पोवार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून खांदा कॉलनी सेक्टर 12 येथे स्वखर्चातून वाचनालय उभे केले आहे. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र व मोफत पेपर वाचन हेच उद्दिष्ट ठेवून खांदा कॉलनी येथे उभारण्यात आलेल्या या तिसर्‍या …

Read More »