महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी (दि. 22) दुपारी रसायन वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी टँकरमधील रसायन रस्त्याकडेला सांडून नुकसान झाले आहे. लोटे औद्योगिक क्षेत्रांमधील विनाती ऑर्गानिक या कंपनीतून रसायन घेऊन मुंबई दिशेने जाणार्या टँकरला बुधवारी मोहरे येथील वळणावर अपघात झाला. त्यामुळे टँकरमधून …
Read More »रोहा तालुक्यात 70 टक्के पेरण्या पूर्ण; बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत
रोहे : प्रतिनिधी तालुक्यात खरीप हंगामाची तयारी पुर्ण होत असताना पाऊस मात्र खोळंबला आहे. रोहा तालुक्यात आतापर्यंत सुमारे 70 टक्के पेरण्या झाल्या असून बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. भात पिकासाठी रोहा तालुका ओळखला जातो.तालुक्यात या वर्षी 9850 हेक्टर क्षेत्रावर भातशेती अपेक्षित आहे. भात बियाणे, खतांची व्यवस्था सुरुळीत सुरू असून औषधेही उपलब्ध …
Read More »रोह्यात होणार यांत्रिक पद्धतीने भात लागवड
रोहे : प्रतिनिधी मजूरांची टंचाई पहाता यापुढे रोहा तालुक्यात यांत्रिक पध्दतीने भात लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या वतीने रोहा तालुक्यात ठिकठिकाणी यांत्रिक पध्दतीने भातलागवड प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. शेतीतील कामे अत्यंत सुलभ व्हावी, या दृष्टीने अनेक अवजारे शेतीच्या कामात उपयुक्त व्होवू लागली आहेत.नांगरणी, फवरणीसह अन्य कामे यांत्रिकी …
Read More »गौरकामत शाळेतील पाणी योजनेचे लोकार्पण; कर्जत ग्रामीण ‘रोटरी’चा उपक्रम
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कर्जत : बातमीदार ग्रामीण रोटरी क्लब या संस्थेने कर्जत तालुक्यातील गौरकामत येथील शाळेसाठी पाणीपुरवठा योजना राबविली असून, या योजनेचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. या वेळी या भागातील पाच जिल्हा परिषद शाळांना संस्थे तर्फे संगणक वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ देवनार शाखेच्या वतीने कर्जत ग्रामीण …
Read More »रायगडकरांना 44 कोटींचा चुना, दीड वर्षात फसवणुकीचे 224 गुन्हे
खोपोली : प्रतिनिधी पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीचा व्यवहारात उपयोग न केल्याने, रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी गेल्या दिड वर्षात दोनशे चोवीस फसवणुकीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यात 44 कोटी रुपये गमावले आहेत. रायगड जिल्ह्यात सन 2021 पासून जून 2022 पर्यंत 224 फसवणूक, अपहाराच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यात नागरिकांची 44 कोटी रूपयांची फसवणूक …
Read More »विविध विकासकामांसाठी निधी मिळावा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कृष्णा कोबनाक यांचे निवेदन माणगाव : प्रतिनिधी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांसाठी निधी मिळण्याकरिता भाजपचे ज्येष्ठ नेते कृष्णा कोबनाक यांनी शनिवारी (दि. 18) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या वेळी कोबनाक यांच्या समवेत भाजपचे माणगाव तालुका …
Read More »खोपोली येथील विश्रामगृह मोजतेय शेवटच्या घटका
सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासिनता खोपोली : प्रतिनिधी एकेकाळी राजकीय, कामगार क्षेत्रातील घडामोडींचे प्रमुख केंद्र असलेले खोपोली विश्रामगृह सध्या पडीक आवस्थेत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या विश्रामगृहाची मोक्याची जागा हडप होण्याची भीती व्यक्त होत आहे. मुंबई, पूणे शहरांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या खालापूर तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग गेला आणि विकासाचा मार्ग …
Read More »पनवेल रेल्वे पुलाची डागडुजी करण्याची मागणी
पनवेल : प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवरून नवीन पनवेलकडे जाण्यासाठी असलेल्या पुलावरील बसवण्यात आलेल्या लाद्या उखडल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामध्ये गर्दीच्या वेळी पाय अडकून एखादा प्रवाशी पडण्याची शक्यता आहे. यामुळे या पुलाची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. मध्य रेल्वेचे पनवेल रेल्वे स्टेशन हे मोठे जंक्शन आहे. …
Read More »पनवेल महापालिकेतर्फे योग दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षकांनी या वेळी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्यांना योगासनाचे विविध प्रकार आणि प्राणायमसाठी मार्गदर्शन केले. या वेळी सहाय्यक संचालक नगररचनाकार ज्योती कवाडे, उपायुक्त विठ्ठल डाके, सचिन पवार, गणेश शेटे, कैलास गावडे, कार्यकारी अभियंता …
Read More »पत्रकार सय्यद अकबर यांना पुरस्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे ज्येष्ठ पत्रकार सय्यद अकबर यांना पत्रकारिता समाजकारण आणी क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जयहिंद फाउंडेशनकडून खारघर येथे भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जयहिंद फाउंडेशनने सैनिक हो तुमच्यासाठी संकल्पना राबवून सीमेवर शहीद झालेल्या कुटुंबीयांना मदत करण्याची अनोखी मोहीम देशभरात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper