Breaking News

Ramprahar News Team

एसटी कर्मचार्‍यांना हायकोर्टाकडून दिलासा

पुढील सुनावणीपर्यंत शिस्तभंगाची कारवाई न करण्याचे महामंडळाला निर्देश मुंबई ः प्रतिनिधी एसटी कर्मचार्‍यांच्या सरकारी कर्मचार्‍यांमध्ये विलीनीकरणावर 22 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. पुढील सुनावणीत ’हो’ किंवा ’नाही’ यावर राज्य सरकारला स्पष्ट उत्तर देण्याचे निर्देशही हायकोर्टाने जारी केलेत. दरम्यान, या सुनावणीत संपकरी कर्मचार्‍यांची बाजू …

Read More »

केवळ सूडापोटी मला नोटीस; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबई ः प्रतिनिधी भर अधिवेशनात राज्य सरकारचे कट-कारस्थान बाहेर काढणारे राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. स्वतः फडणवीस यांनी शनिवारी (दि. 12) पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती देत केवळ सूडापोटी आपल्याला ही नोटीस पाठविल्याचा आरोप केला. या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधान परिषद …

Read More »

अलिबागकर असल्याचा सार्थ अभिमान -रवी शास्त्री

अलिबाग : प्रतिनिधी 30 वर्षांपूर्वी मी अलिबागला आलो. इथे स्थायिक झालो. इथे येऊन मला जी शांतता मिळते ती जगात कुठेच मिळत नाही. अलिबागकर असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. ते कणकेश्वर फाटा येथे सुशोभीकरण सोहळ्यात बोलत होते. अलिबाग-मांडवा रस्त्यावरील कणकेश्वर फाटा …

Read More »

मुरूडमध्ये भाजपतर्फे रविवारी भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा

मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील हिंदू बोर्डिंग येथील भव्य पटांगणावर भारतीय जनता पक्षातर्फे रविवारी (दि. 13) सायंकाळी 6.30 वाजता शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी तीन वेळा मिस्टर इंडिया व सहा वेळा महाराष्ट्र श्री किताब पटकावणारा शरीरसौष्ठवपटू सुनील जाधव मुख्य आकर्षण असणार आहे. या स्पर्धेस भाजप प्रदेश सरचिटणीस …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा ‘तुंबई’ नाट्यप्रयोग राज्यस्तरीय स्पर्धेत सादर

ठाणे ः प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा ‘तुंबई’ हा नाट्यप्रयोग 60व्या राज्य नाट्य स्पर्धेत गुरुवारी (दि. 10) सादर झाला. त्यास रसिकांनी दाद दिली. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उपाध्यक्ष तथा …

Read More »

विवेक पाटील आता आणखी 10 दिवस कोठडीत

पनवेल ः प्रतिनिधी बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता 21 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा तळोजा तुरुंगातील मुक्काम आणखी 10 दिवसांनी वाढला आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात शुक्रवारी (दि. 11) झालेल्या सुनावणीत सक्तवसुली संचालनालयातर्फे …

Read More »

खारघर, कामोठे वसाहतींना टँकरद्वारे वाढीव पाणीपुरवठा करा

पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांची सूचना पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 11) प्रभाग समिती ’अ’ व ‘क’च्या कार्यालयात बैठक घेऊन सिडकोच्या खारघर व कामोठे वसाहतींना महापालिकेने टँकरद्वारे वाढीव पाणीपुरवठा करण्याची सूचना दिली. खारघर व कामोठे येथे झालेल्या या बैठकांना महापालिका स्थायी …

Read More »

शेकापचे गजानन पाटील व सहकारी करणार भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दापोली येथील शेतकरी कामगार पक्षाचे माजी उपसरपंच गजानन तुळशीराम पाटील आणि त्यांचे शेकडो सहकारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. या प्रवेशातून शेकापला मोठा झटका बसणार आहे. खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या सभागृहात येत्या रविवारी (दि. 13) …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क, नोंदणी फीसोबत स्थानिक संस्था कर रद्द करण्याबाबत तारांकित प्रश्न

मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फीसोबत स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून शासनाचे लक्ष वेधले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आकारण्यात येणार्‍या मुद्रांक शुल्क व नोंदणी फीसोबत आकारण्यात येणारा एक टक्के …

Read More »

महाराष्ट्रात भाजपला स्वबळावर सत्तेत आणण्यासाठी सज्ज व्हा!; देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई ः प्रतिनिधी उत्तर प्रदेशसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. या विजयाने हुरळून न जाता मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आणि महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 11) …

Read More »