कळंबोली : प्रतिनिधी कळंबोली सेक्टर 1 येथील मोकळ्या भूखंडावर सफाई कर्मचार्यांच्या वतीने सुशोभित असे रंगरंगोटी करून तिथल्या परिसराला एक वेगळच सौंदर्य निर्माण करून दिले आहे. त्यामुळे सफाई कर्मचार्यांचे कौतुक येथील रहिवाशांनी केलेले आहे. कळंबोली सेक्टर 1 याठिकाणी असलेल्या मारुती मंदिराजवळ असलेल्या क्रिकेट मैदाना शेजारील एका जाग्यावर नेहमीच मो्या प्रमाणात कचरा …
Read More »खारघरमधील भुयारी मार्गाची डागडुजी करा; भाजप नेते प्रभाकर घरत यांची सिडकोकडे मागणी
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर रेल्वे स्टेशन बाहेरील भुयारी मार्गामधील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते प्रभाकर घरत यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या खारघर मधील कार्यकारी अभियंतांना निवेदन दिले आहे. घरत यांनी निवेदना म्हटले आहे की, खारघर रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्गामधील रस्ता खराब झालेला आहे. …
Read More »उरणच्या टीपटॉप मार्केटचे नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
उरण : वार्ताहर उरण येथील स्वामी विवेकानंद चौकजवळ असलेल्या टीप टॉप सुपर मार्केटचे नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते बुधवारी (दि. 23) उद्घाटन झाले. टीप टॉप सुपर मार्केटचे मालक हिरजी शिवजी चंदात व रणछोड शिवजी चंदात यांनी सर्व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले व आभार मानले. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष तथा …
Read More »पाणी कपात करण्यापेक्षा पाणी चोरी थांबवा; आमदार मंदाताई म्हात्रे नवी मुंबई महापालिकेकडे मागणी
नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी नवी मुंबईतील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नवी मुंबईमध्ये विविध विकास कामे सुरू आहेत. सध्या पुनर्विकासाची कामेही सुरू झाली असून यापुढे मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीची अनेक कामे सुरू होणार आहेत. सद्यस्थितीत कामांना, प्रकल्पांना होणारा पाण्याचा वापर पाहता भविष्यात पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासोबत …
Read More »क्रिकेट स्पर्धेत नवी मुंबई वॉरिअर्स संघ विजेता
पनवेल ः रामप्रहर वृत्त बँक ऑफ महाराष्ट्राने नुकताच आपला 87वा व्यवसाय प्रारंभ दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्ताने बँकेच्या नवी मुंबई झोनने आपल्या कर्मचार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल येथे क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत नवी मुंबई वॉरिअर्स संघाने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत नवी मुंबई झोनच्या वतीने नवी मुंबई वॉरिअर्स, वाशी …
Read More »एक सुडाचा प्रवास
आमचे हिंदुत्व म्हणजे सुडाचे राजकारण नव्हे अशी शेरेबाजी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष विरोधकांशी सुडाचे राजकारण करत असून हा सुडाचा प्रवास थांबवायला हवा अशी अपेक्षाही त्यांनीच व्यक्त केली होती. तथापि, सुडाचे राजकारण नेमके कोण करते आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला सोमवारी कळून चुकले असेल. सोमवारचा …
Read More »पाली फाटा येथे गोदामाला भीषण आग
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी खोपोली-पेण मार्गावरील पाली फाटा येथील प्लास्टिक साठवण गोदामाला रविवारी (दि. 20) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. खोपोली आणि औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलांच्या जवानांनी पाच बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. हे गोदाम पालीफाटा येथील अरिहंत अर्शियाच्या समोर आहे. या आगीचे कारण समजू शकले नाही.
Read More »ममदापूर गावात सिलिंडरचा स्फोट; घर जळून खाक
कर्जत : बातमीदार नेरळ जवळील ममदापूर गावातील वरच्या आळीमधील एका घरात रविवारी (दि. 20) सायंकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात संपूर्ण घराचे नुकसान झाले. सुदैवाने घरात असलेल्या सीताबाई रामा डांगरे या आजी थोडक्यात बचावल्या. ममदापूर गावात सीताबाई रामा डांगरे यांचे घर आहे. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सीताबाई जेवण बनवत …
Read More »पत्रकारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण; आरोपीला अटक, पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
अलिबाग : प्रतिनिधी नेरळ येथील पत्रकार अजय गायकवाड यांच्यावर हल्ला करणार्याला तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने सोमवारी (दि. 21) अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षणिक उपोषण करण्यात आले. पत्रकारांच्या शिष्टमंडळाने रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांची भेट घेतली. आरोपीला ताब्यात घेतले आहे, त्याला न्यायालयात हजर केले जाईल. न्यायालयाच्या …
Read More »शिक्षक पतपेढीत आरटीजीएस, एनईएफटी सुविधा
अलिबाग : प्रतिनिधी शिवजयंतीचे औचित्य साधत रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अलिबाग येथील मुख्यालयात शनिवारी आरटीजीएस आणि एनईएफटी सुविधा सुरू करण्यात आल्या. याचा लाभ पतसंस्थेच्या सभासद ग्राहकांना होणार असून व्यवहार करणे अधिक सुलभ होणार आहे. एखाद्या सभासदाचा मुलगा, मुलगी शिक्षणासाठी परदेशी अथवा इतर ठिकाणी असेल किंवा सभासद व त्याचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper