अलिबाग : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील गुळसुंदे परिसरातील महिलांनी सोमवारी (दि. 25) डोक्यावर रिकामे हंडे घेऊन रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील कार्यालयावर मोर्चा काढला. वारंवार पाठपुरावा करूनदेखील पिण्याच्या पाण्यासारख्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या ग्रामस्थांचा संताप अनावर झाल्याचे या वेळी पहावयास मिळाले. गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील लाडीवली, आकुलवाडी, डोंगरीचीवाडी, स्टेशनवाडी, …
Read More »कलावंत हा जन्माला यायला लागतो; दिलखुलास गप्पांमध्ये शरद पोंक्षे यांनी साधला मनमोकळा संवाद
पनवेल ः रामप्रहर वृत्तमला अभिनयापलीकडे दुसरे काही येत नाही. लहानपणापासूनच नटाखेरिज दुसरे काही व्हायचेही नव्हते. जन्माला आल्यापासून आतापर्यंत जी माणसे भेटत गेली त्यांच्यातून विविध व्यक्तिरेखांचे बेअरिंग सापडले. याचे सारे श्रेय मी परमेश्वराला देतो. मुळात कलावंत हा जन्माला यायला लागतो, अशा शब्दांत सुप्रसिद्ध अभिनेेते आणि लेखक शरद पोंक्षे यांनी आपला जीवनप्रवास …
Read More »आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची डील? ; व्हिडीओतून आरोप
मुंबई ः प्रतिनिधीआर्यन खान ड्रग्जप्रकरणी एक व्हिडीओ समोर आला आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटी रुपयांची डील झाली असून त्यातील आठ कोटी रुपये एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचा दावा साक्षीदार के. पी. गोसावीचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईलने या व्हिडीओत केला आहे. या व्हिडीओत प्रभाकर साईल म्हणतो की, …
Read More »युवा पिढीचा भाजपवर विश्वास; अलिबागमधील राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
अलिबाग ः प्रतिनिधीभारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर आकर्षित होऊन राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस जगदिश घरत, तसेच शिवसेना आणि शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 23) हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास भाजपचे …
Read More »आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा घोळ; पेपर, वेळ, आसनव्यवस्थेत त्रुटी; विद्यार्थ्यांमध्ये संताप
मुंबई ः प्रतिनिधीआरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान होणारा गोंधळ संपायचे नाव घेईना. या परीक्षेत रविवारी (दि. 24) पुन्हा घोळ झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई, पुणे आणि नाशिक येथील केंद्रांवर अनेक विद्यार्थ्यांना पेपर मिळण्यास उशीर झाल्याचे समोर आले, तसेच मुलांच्या आसनव्यवस्थेतही घोळ झाला. पुण्यात एका केंद्रावर परीक्षेची वेळ होऊनही विद्यार्थ्यांना आसन क्रमांक न मिळाल्याच्या …
Read More »पंतप्रधान मोदींकडून आरोग्य कर्मचार्यांचे कौतुक
नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 24) मन की बात कार्यक्रमात बोलताना देशातील कोरोना लसीकरणातील योगदानासाठी आरोग्य कर्मचार्यांचे भरभरून कौतुक केले. आरोग्य कर्मचारी देशवासीयांच्या लसीकरणात कोणतीही उणीव ठेवणार नाही हे मला माहीत होते, असे पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले, तसेच भारतातील लसीकरण कार्यक्रमाच्या यशातून भारताची आणि सर्वांच्या …
Read More »जिम्नॅस्ट निशांत करंदीकरची भारतीय संघात निवड
मुंबई ः प्रतिनिधी जपानमध्ये होणार्या 50व्या जागतिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेच्या सिनिअर गटासाठी व ढाका येथे होणार्या सेंट्रल साउथ आशिया जिम्नॅस्टिक्स स्पर्धेकरिता ज्युनिअर व सिनिअर गटासाठी भारतीय संघाची नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर निवड करण्यात आली. यात आशियाई स्पर्धेत मुंबईतील विलेपार्लेच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडासंकुलचा निशांत करंदीकर याची निवड झाली. निशांतने विशाल …
Read More »मँचेस्टर युनायटेड संघ आयपीएल खेळणार
मँचेस्टर ः वृत्तसंस्था आयपीएल 2022 स्पर्धेत दोन नव्या संघांचा समावेश केला जाणार आहे. यासाठी फुटबॉलमध्ये प्रसिद्ध असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या मॅनचेस्टर युनायटेडने रूची दाखवली आहे. मॅनचेस्टर युनायटेडचे मालक ग्लेजर कुटुंबीयांनी नवी फ्रेंचाइसी विकत घेण्यासाठी पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे. ग्लेजर कुटुंबीयांनी एका खासगी इक्विटी कंपनीच्या माध्यमातून आयपीएल संघ बनवण्याचे दस्ताऐवज विकत …
Read More »ऑस्ट्रेलियाची द. आफ्रिकेवर मात
आबुधाबी ः वृत्तसंस्था ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील पहिल्याच सामन्यात चाहत्यांना थरार अनुभवायला मिळाला. जोश हेझलवूडची (2/19) प्रभावी गोलंदाजी आणि मार्कस स्टोयनिसच्या (16 चेंडूंत नाबाद 24 धावा) निर्णायक फटकेबाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेवर पाच गडी आणि दोन चेंडू राखून सरशी साधली. आफ्रिकेने दिलेले 119 …
Read More »इंग्लंडकडून विंडीजचा धुव्वा
दुबई ः वृत्तसंस्था इंग्लंडच्या आदिल रशीद (4/2) आणि मोईन अली (2/17) या फिरकीपटूंच्या जोडीपुढे गतविजेत्या वेस्ट इंडिजच्या नामांकित फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यामुळे ट्वेन्टी-20 विश्वचषकातील सुपर 12 फेरीच्या सामन्यात इंग्लंडने विंडीजचा सहा गडी आणि 70 चेंडू राखून फडशा पाडला. वेस्ट इंडिजने दिलेल्या 56 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचीसुद्धा एकवेळ 4 बाद 39 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper