Breaking News

Ramprahar News Team

उरण-फुंडे रस्त्यावरील पूल कोसळला; दुचाकीस्वार जखमी

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील न्हावाशेवा पोलीस ठाणे हद्दीतील फुंडे -उरण रोडवरील पूल कोसळला असून, यामध्ये दुचाकीस्वार दिपक कासुकर जखमी झाला आहे. येथील नागरिकांच्या व पोलिसांच्या मदतीने संबंधित जखमीला जेएनपीटी वसाहत येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जेएनपीटी आणि जेएनपीटीतील अन्य तीन बदरांकडे जाणार्‍या कामगार आणि तालुक्यातील फुंडे, जेएनपीटी वसाहत, …

Read More »

जासई विद्यालयात डॉ. आंबेडकरांना अभिवादन

उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासईच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेजमध्ये विश्वमानव, ज्ञानसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंतीनिमित्त विद्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला. जयंतीनिमित्त विद्यालयात या महामानवाला मानवंदना देण्यासाठी शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष व …

Read More »

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पनवेल महानगरपालिकेतर्फे अभिवादन

पनवेल : प्रतिनिधी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त पनवेल महापालिकेतर्फे आदरांजली वाहण्यात आली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, आयुक्त सुधाकर देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, तहसीलदार विजय तळेकर उपस्थित होते. या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब …

Read More »

‘रेमडेसिवीर’ची किंमत होणार कमी; काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी गेले काही दिवस रेमडेसिवीर औषध बरेच चर्चेत आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या या औषधाचा तुटवडा जाणवतो आहे, हे औषध वाढीव दराने विकले जात आहे, या औषधाचा काळाबाजार केला जात आहे. दरम्यान, आता याच औषधाबाबत मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. रेमडेसिवीर औषधाचे उत्पादन आणि पुरवठा …

Read More »

भाजप कार्यालयात डॉ. आंबेडकर जयंती

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सानपाडा रेल्वे स्टेशनलगतच्या सेक्टर 3 येथील भाजपचे पांडुरंग आमले यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्थानिक रहीवाशांच्या सहभागाने उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार प्रदान करून या वेळी उपस्थितांना पेढे वाटण्यात आले. रमेश शेटे यांनी उपस्थितांना …

Read More »

पेटीएम अ‍ॅपद्वारे व्यापार्‍यांची फसवणूक करणार्‍यांना अटक

पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील रोडपाली येथील रिलायन्स स्मार्ट पॉईंट मॉल येथून दोन अनोळखी व्यक्तींनी जेमिनी खाद्य तेलाचे व इतर साहित्य खरेदी करून एनइएफटीद्वारे पेमेंट करण्याचा बहाणा करून ट्रान्झेक्शनचा खोटा संदेश दाखवून रिलायन्स मॉलची फसवणूक केली होती. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होताच पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2च्या पथकाने …

Read More »

नवी मुंबईत बेड्ससाठी रुग्णांची धडपड; तब्बल 11,605 जण उपचाराधीन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ ही चिंताजनक आहे. अशातच रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांत बेड्स मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. यामुळे शहरातहील तब्बल 11 हजार 605 इतके रुग्ण उपचाराधीन आहेत, तर एकीकडे पालिका प्रशासन खाटांच्या संख्येत वाढ करत आहे. नवी मुंबईत सध्या दररोज एक हजाराहून अधिक …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यताविरोधी लढा

डॉ. आंबेडकरांचा जीवनप्रवास जन्मापासूनच खडतर आणि वेदनादायी होता. याचा प्रत्यय त्यांना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आला. डॉ. आंबेडकरांची आई भीमाबाई प्रचंड हट्टी, बोलकी आणि जिद्दी होती. ’माझी परिस्थिती सुधारेल तेव्हाच मी माहेरी येईन’ असे एकदा तिने माहेरच्या मंडळीना खडसावून सांगितले होते. आईचा हा बाणेदारपणा डॉ. आंबेडकरांमध्ये पुरेपूर उतरलेला पाहायला मिळतो. डॉ. …

Read More »

चढ्या भावाने वस्तूंची विक्री कराल तर खबरदार!; सुधागड पाली तहसीलदारांची व्यापार्यांना सूचना

पाली : रामप्रहर वृत्त लॉकडाऊनच्या धास्तीने सुधागड तालुक्यातील जनता जीवनावश्यक व गरजेच्या वस्तू खरेदीसाठी बाजारात धाव घेत आहे. त्याचा गैरफायदा घेऊन काही व्यापारी चढ्या भावाने वस्तूंची विक्री आहेत. हे रोखण्यासाठी सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी व्यापार्‍यांना दर्शनी भागात दरपत्रक लावण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी व्यापार्‍यांना व तेथील कामगारांना लसीकरण …

Read More »

मुरूड नांदगावचे अनिरुद्ध खेडेकर यांची रांगोळी आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये

मुरूड : प्रतिनिधी नांदगावचा रंगावलीकार अनिरुध्द संदिप खेडेकर यांनी साकारलेली जगातील सर्वात लहान अंडर वॉटर पोर्ट्रेट रांगोळीची आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. अनिरुध्द खेडेकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची चार बाय चार से.मी.आकाराची रांगोळी 17  मार्च 2021 रोजी 36 मिनिटे 39 सेकंद या वेळेत पाण्याखाली काढून विश्व …

Read More »