मुंबई ः प्रतिनिधी रेमडेसिवीर इंजेक्शनसंदर्भात विलेपार्ले पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या एका अधिकार्याला ताब्यात घेतले. या कारवाईची माहिती मिळताच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड पोलीस ठाण्यात पोहचले आणि त्यांनी पोलिसांनी कारवाईबद्दल जाब विचारला. पोलीस ठाण्यात वाद झाल्यानंतर तेथील अधिकारी आणि …
Read More »कबड्डीपटू मयूर कदमचे जोरदार स्वागत
उरण ः वार्ताहर उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे झालेल्या 68व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या संघातून खेळणारा उरण तालुक्यातील बोकडविरा येथील अष्टपैलू खेळाडू मयूर जगन्नाथ कदम याचे गावात जोरदार स्वागत करून अभिनंदन करण्यात आले. मूळचा अलिबाग तालुक्यातील तळवली गावचा मयूर बालपणापासून बोकडविरा गावचा रहिवासी …
Read More »वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धा : भारताच्या रवीला सुवर्णपदक
अल्माटी : वृत्तसंस्था भारताचा युवा कुस्तीपटू रवी कुमार दहियाने सलग दुसर्या वर्षी वरिष्ठ आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. अनुभवी बजरंग पुनियाला मात्र दुखापतीमुळे सुवर्णपदकावर पाणी सोडावे लागले, तर करन आणि नरसिंह यादव यांनी कांस्यपदकाच्या लढती जिंकल्या. पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात रवीने अंतिम फेरीत इराणच्या अलिरेझा सारलकला 9-4 …
Read More »मुंबईची पुन्हा कमाल!; हैदराबादवर साकारला रोमहर्षक विजय
चेन्नई ः वृत्तसंस्था रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा सन्मानजनक धावसंख्येचा बचाव करीत सनरायझर्स हैदराबादवर 13 धावांनी विजय मिळवला. हैदराबादचा हा यंदाच्या हंगामातील सलग तिसरा पराभव ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 5 बाद 150 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा डाव 137 धावांवर संपुष्टात आला. मुंबईच्या कायरन …
Read More »सुधागडचा लाचखोर दुय्यम निबंधक जाळ्यात
अलिबाग : प्रतिनिधी फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी 20 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सुधागड येथील दुय्यम निबंधक जितेंद्र वाईकर याला अटक करण्यात आली आहे . रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कामगिरी बजावली.तक्रारदार यांच्या मुलाच्या नावे पाली येथे फ्लॅट आहे. या फ्लॅटचे दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्रेशन करायचे होते. या कामासाठी वाईकर याने त्याचे हस्तक …
Read More »व्हॉट्सअॅनपद्वारे नागरिकांच्या शंकांचे निरसन; पनवेल महापालिकेचा अभिनव उपक्रम
पनवेल : प्रतिनिधी कंटेन्मेंट झोन किती दिवस राहील, कंटेन्मेंट झोनमधून कोणास वगळण्यात येते, कंटेन्मेट झोनमध्ये येण्या-जाण्यास कोणास परवानगी आहे, असे अनेक प्रश्न, शंका नागरिकांच्या मनात येत असतात, या नागरिकांच्या शंकाचे निरसन, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे महानगरपालिका व्हॉट्सअॅपवर तयार केलेल्या ग्रुपच्या माध्यमातून देत आहे. या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून महानगरपालिका व कंटेन्मेंट झोनमधील …
Read More »पनवेलहून गोरखपूर, लखनऊसाठी विशेष गाड्यांचे ऑनलाइन आरक्षण
पनवेल : प्रतिनिधी पनवेलहून गोरखपूर आणि लखनऊसाठी पनवेहून विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या गाड्यांसाठी ऑनलाइन आरक्षण सुरू असून जागा असल्यास करंट बुकिंग ही उपलब्ध आहे. महाराष्ट्रात कडक निर्बंधांसह संचारबंदी जाहीर केल्यावर परप्रांतीय मजूर मागील अनुभवाने आपल्या गावाला जाण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे पनवेल रेल्वे स्टेशनवर सकाळपासून रांग लावून बसतात. रेल्वे …
Read More »उरणमध्ये आरोग्य यंत्रणेचा बोजवारा; राज्य शासनाचे दुर्लक्ष एक डॉक्टर, एक नर्सच्या बळावर कोरोनाशी लढा
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरणच्या एकमेव डेडिकेटेड कोविड हेल्थकेअर सेंटरमध्ये डॉक्टर्स, नर्स, वार्ड बॉय आणि अन्य कर्मचार्यांची मोठ्या प्रमाणावर उणीव भासत आहे, मात्र दररोजच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सध्या उपलब्ध असलेल्या दोन डॉक्टर, दोन नर्स आणि अन्य सहा कर्मचार्यांवरच कोविड सेंटरचा भार येऊन पडला आहे. याकडे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष …
Read More »महाराष्ट्रासह देशात थैमान!; सलग तिसर्या दिवशी हजारांहून अधिक कोरोनाबळी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांत कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव होत असून, दररोज झोप उडवणारी आकडेवारी समोर येऊ लागली आहे. सलग तिसर्या दिवशी देशात एक हजारांपेक्षा जास्त कोरोना बळींची नोंद झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेने अक्षरशः थैमान घातले असून, शुक्रवारी (दि. 16) सकाळी संपलेल्या 24 तासांत …
Read More »मुरूडमध्ये लसीकरणासाठी गर्दी
मुरुड : प्रतिनिधी येथील ग्रामीण रूग्णालयात कोरोना लस घेण्यासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. आतापर्यत मुरूड ग्रामीण रूग्णालयात सुमारे दोन हजाराच्यावर नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. मुरूड ग्रामीण रूग्णालयात 7 मार्चपासून 60 वर्षांपुढील आणि 1 एप्रिलपासून 45 वर्षापुढील नागरिकांना लस देण्यास सुरूवात झाली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे भीतीपोटी अनेकजण लस घेण्यासाठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper