Breaking News

Ramprahar News Team

पत्रकारांना फेस शिल्डचे वाटप

पनवेल : वार्ताहर सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक जण घरात सुरक्षित असले तरी डॉक्टर, पोलीस, शासकीय अधिकारी व पत्रकार हे 24 हे रस्त्यावरच आहेत. त्यांच्या कार्याला सलाम म्हणून तसेच त्यांच्या जिवीताची काळजी म्हणून शुक्रवारी (दि. 15) रोटरी क्लब ऑफ पनवेल ईलाईट व रोट्ररॅक्ट क्लब ऑफ पनवेल ईलाईटच्या वतीने पनवेल तालुका …

Read More »

मद्यप्रेमींचा जोर ओसरला; चढ्या भावाने विकणार्‍या विक्रेत्यांना आली मंदी

पनवेल : वार्ताहर पावणे दोन महिन्यापासून पनवेल परिसरात मद्यासाठी धावपळ करणार्‍या मद्यप्रेमींचा जोर आता ओसरला असून अनेकांनी या काळामध्ये दुप्पट ते तीप्पट अशा चढ्या भावाने दारुची खरेदी केली होती. परंतु आता सदर खरेदी सुद्धा आटत चालली असून चढ्या भावाने विकण्यासाठी साठा करून ठेवणार्‍या विक्रेत्यांच्या धंद्याला सुद्धा कोरोनाची मंदी आली आहे. …

Read More »

उरण मोरा येथील एसबीआयचे एटीएम बंद; ग्राहकांना नाहक त्रास

उरण : वार्ताहर कोरोना संसर्ग प्रादुर्भाव होऊ नये या करिता 17 मे पर्यंत लॉकडाऊन असल्याने नागरिक आपल्याला खर्चासाठी लागणारे पैसे बँकेत न जाता एटीएमचा सर्रास वापर करताना दिसत आहेत. पैसे काढण्यासाठी उरण शहरात एटीएमसमोर मोठी रांग लागत आहेत. त्यातच मोरा येथील असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे  एटीएम मशीन गेल्या पाच …

Read More »

वायू प्रदूषण करणार्‍या कारखान्यांवर कडक कारवाई करावी -संजय भोपी

कळंबोली : प्रतिनिधी तळोजा औद्योगिक विभागातील कारखान्यातून मोठ्या प्रमाणात विषारी व विघातक वायू  सोडण्यात येत आहे. त्यामुळे वायु प्रदुषण वाढले असून त्याचा आसपासच्या परिसरातील  नागरिकांना मोठा त्रास होत असून त्यांचे जीवन नरक यातना भोगत आहे त्यांचे राहणे अशक्य झाले आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांना दमा न क्षयरोगांना सामोरे …

Read More »

उलवे येथील चार इमारती कोरोनाबाधित क्षेत्र घोषित

पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यातील उलवे येथील चार इमारतींमध्ये प्रत्येकी एक एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोना बाधित रुग्ण राहात असलेल्या इमारती कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये उलवे येथील प्लॉट नं.64, सेक्टर-5 येथील रेडियन्स स्प्लेन्डर को.ऑ.हौ.सो.,सी …

Read More »

विजेच्या लपंडावाने पनवेलकर हैराण; महावितरण कंपनीचा कारभार अनियमित

पनवेल : वार्ताहर पनवेल शहर व परिसरात गेल्या काही दिवसापासून सुरळीतपणे सुरू असलेला वीज वितरण कंपनीचा कारभार अचानकपणे अनियमितपणा सुरू झाल्याने वीज ग्राहक चांगलेच वैतागले आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक जण घरातच सुरक्षित राहत आहेत. अशा वेळी घरांच्यांना वीजेचा मोठा आधार आहे. टीव्ही, फ्रीज, मोबाइल चार्जिंग, पंखा, एसी व इतर विद्युत …

Read More »

‘संजीवनी’तर्फे कोरोनाची प्राथमिक तपासणी

मुरूड ः प्रतिनिधी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पद्मश्री तात्याराव लहाने यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या संजीवनी आरोग्य सेवेने महत्त्वाचा पुढाकार घेतला आहे. संजीवनीचे सदस्य आरोग्यसेवक कामाला लागले आह्ेत. मुरूड तहसीलदार व नगरपालिकेची परवानगी घेऊन थर्मल स्क्रिनिंगद्वारे कोरोनाची प्राथमिक तपासणी सुरू करण्यात आली. आठ दिवसांत पाच हजर जणांची तपासणी पूर्ण झाली. त्यात एकही …

Read More »

रोह्यात लॉकडाऊनचा फज्जा; नागरिकांची गर्दी

रोहे : प्रतिनिधी कोरोनाचे संकट वाढत असताना नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव गर्दीमुळे होतो. त्यामुळे नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे, परंतु गुरुवारी (दि. 14) रोह्यात नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केल्याने लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. नो सोशल डिस्टन्स, …

Read More »

खालापुरातून मजुरांच्या सहा बसेस रवाना

खोपोली ः प्रतिनिधी पोटाला चार घास देणार्‍या मातीशी कोरोनामुळे घ्याव्या लागणार्‍या फारकतीने ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा घेऊन अनेक मजूर कुटुंबासह बुधवारी (दि. 13) संध्याकाळी खालापुरातून कर्नाटकच्या दिशेने रवाना झाले. या मातीशी असलेले प्रेम जय महाराष्ट्रच्या घोषणा देत सर्वांनी व्यक्त केले. या वेळी उपस्थित सर्वच भारावले होते. खालापूर हा औद्योगिक तालुका आणि …

Read More »

दुचाकीवरून विदेशी दारूची वाहतूक; दोघांवर गुन्हा दाखल

रेवदंडा ः प्रतिनिधी मोटरसायकलने रोहा ते साळाव रस्त्याने विदेशी दारूची वाहतूक करताना चोरढे येथील दोघांना रेवदंडा पोलिसांनी तळेखार गावाच्या हद्दीत सुपेगाव फाटा येथे अटक केली. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवदंडा पोलीस ठाणे अंतर्गत तळेखार गावाच्या हद्दीत सुपेगाव फाटा येथे चोरढा येथील दोघे जण …

Read More »