Breaking News

Ramprahar News Team

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास संकटकाळात मदतीचा हात

माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात माणगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतर्फे  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन रायगड यांना मदतीचा हात पुढे करण्यात आला. माणगाव तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांच्याकडे 51 हजार रुपयांचा धनादेश बुधवारी (दि. 13) पतसंस्थेचे चेअरमन विद्यमान नगरसेवक आनंदशेठ यादव, संचालक दिलीप जाधव, नरेश राजपूत, दिलीप अंबुर्ले, अरुण प्रभाळे यांनी सुपूर्द केला. …

Read More »

महाडमधील परिचारिकेला कोरोना; रुग्णाकडून संसर्ग; ग्रामीण रुग्णालयात उपचार

महाड ः प्रतिनिधी महाडमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णसेवेत असलेल्या एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. या परिचारिकेवर ग्रामीण रुग्णालयातच उपचार करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. महाड तालुक्यातील कोकरे तर्फे नाते येथील मोरेवाडीतील कोरोना झालेल्या व्यक्तीला 4 मे रोजी महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले होते. त्या वेळी सदरची परिचारिका कोकरे …

Read More »

मोदींनी फुंकले प्राण

लॉकडाऊनच्या ताणातून देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी मोदी सरकार पुढे सरसावले आहे. एकविसावे शतक हे भारताचे असेल. देश एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, हे मोदींचे उद्गार निराशेचे मळभ दूर करून देशाच्या अर्थव्यवस्थेत चैतन्याचे प्राण फुंकणारे आहेत. मंगळवारी रात्री आठ वाजता मोदी बोलू लागले आणि त्यांनी देशाने आजवर कधीही न पाहिलेल्या अभूतपूर्व अशा 20 …

Read More »

माणगावकरांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून कोरोनाला दूर ठेवावे; भाजप नेते संजयआप्पा ढवळे यांचे आवाहन

माणगाव : प्रतिनिधी संपूर्ण जगभर हैदोस घालणार्‍या कोरोना संसर्गजन्य विषाणूला दूर ठेवण्यासाठी माणगाव तालुक्यातील जनतेने सोशल  डिस्टन्सिंगचे (सुरक्षित अंतर) पालन करा, असे आवाहन माणगाव तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी केले आहे. प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात ढवळे यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. या …

Read More »

कोविड 19 रुग्णांसाठी सुधारित डिस्चार्ज पॉलिसी

पनवेल : प्रतिनिधी कोविड-19 रुग्णांसाठी केंद्र शासनाने सुधारित डिस्चार्ज पॉलिसी जाहीर केली आहे. केंद्र शासनाच्या  मार्गदर्शक सूचनांनुसार त्रिस्तरीय संस्थात्मक रचनेनुसार ही सुधारित पॉलिसी तयार करण्यात आली असून ही रूग्णांच्या लक्षणाच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे. 1. सौम्य, अति सौम्य  व लक्षणे नसलेले रुग्ण :- ज्या रुग्णांना आरोग्य संस्थांमध्ये दाखल करण्यात आले …

Read More »

‘मासळी विक्रीकरिता वाहनांना परवानगी द्यावी’

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोळी बांधवाना अलिबाग, उरण व तळोजा बंदरावरुन मच्छी विक्रीकरीता ये-जा करण्याकरीता वाहनांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल तहसिलदार यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन जारी केले …

Read More »

एसटी डेपोविना प्रवाशांचे हाल; नवी मुंबईतील समस्येची राज्य शासनाने दखल घेण्याची मागणी

नवी मुंबई : बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 17 तारखेपर्यंत आंतरराज्य परिवहन सेवा सुरू केल्याने अनेक नागरिकांनी गावी जाणे पसंत केले आहे. त्यासाठी एसटी डेपोत अर्ज करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र यात नवी मुंबईकरांची एसटी डेपो नसल्याने मात्र वाताहत सुरू आहे. परराज्यात जाणार्‍या मजुरांना व राज्यातील इतर जिल्ह्यांत जाणार्‍या …

Read More »

रोह्यात सुसज्ज रुग्णालय उभारा; नागरिकांची मागणी; उपचारासाठी गाठावे लागतेय मुंबई, पुणे, पनवेल

रोहे : प्रतिनिधी रायगड जिल्हयाचे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रोहा तालुक्यात वाढते नागरीकरण व तालुक्यात असलेले दोन औद्योगिक क्षेत्र पहाता तालुक्याचा आर्थिक विकास झपाट्याने होत आहे. या सर्व बाबीला पुरक असलेले नागरिकांचे व कामगारांचे आरोग्य मात्र रामभरोसे आहे. प्राथमिक उपचाराच्या व्यतिरिक्त अन्य उपचारासाठी नागरिकांना मुंबई, पुणे, पनवेल गाठावे लागत आहे. विकासाच्या …

Read More »

कैद्यांचे विलगीकरण शाळेत

पनवेल : वार्ताहर नव्याने येणार्‍या कैद्यांसाठी खारघरमधील एका शाळेत विलगीकऱण केंद्राची व्यवस्था कऱण्यात आली आहे. या केंद्रात 40हून अधिक कैदी असल्याने कारागृह पोलिसांचा परिसराला जागता पहारा आहे. खारघर येथील तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची क्षमता 2,124 असून सध्या कारागृहात 2500 हून अधिक कैदी शिक्षा भोगत आहेत. नव्याने येणार्‍या कैद्यांसाठी खारघर येथील …

Read More »

‘नवी मुंबईकरांना मालमत्ता कर, पाणी देयक माफ करावे’

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांचा सहा महिन्यांचा मालमत्ता कर व पाणी देयक माफ करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भगत यांनी आयुक्तांना पत्र देऊन केली आहे. भगत यांनी दिलेल्या पत्रात म्हटल्याप्रमाणे, मार्च 2020च्या सुरूवातीपासून नवी मुंबईत कोरोनाचे अस्तित्व पहावयास मिळाले असून आता कोरोनाचा नवी मुंबईत …

Read More »